ती किमया केवळ दसपटकरांची, वरळीत दसपटकर सुनिलराव शिंदें मुळे अदित्य, तर दसपटी विभागातील चिपळुणमध्ये आयारामांचे सौदागरी मतदान वगळता NOTA पहिल्या नंबरवर ?

डिजीयुगंधरा (DgYugandhara)
0

आमदार श्री. सुनिलराव शिंदे, दसपटी

डिजीयुंगंधरा चिपळूण दिनांक २४ नोव्हेंबर २०२४, Maharashtra  Politics: ऐतिहासिक दसपटी विभागतल्या चिपळुण तालुक्यातून विद्यमान आमदार शेखर निकम विजयी, तर मुंबईतील   मुळचा दसपटकर सुनिलराव शिंदेंचा मतदार संघ असलेल्या वरळी मतदार संघातून अदित्य ठाकरे विजयी झाले. हि किमया दसपटकरांचीच. कारण आता एकाच कुटुंबात आमदार, खाजदार होण्याचा पायंडा पडत असताना, दसपटीच्या सुनीलराव शिंदे या सुपत्राने मात्र आपली राजकीय भुमी, प्रतिष्ठा केवळ जाणीवेपोटी आपल्या नेत्याला बहाल करावं यासारखं वैराग्य नव्हे.  

Office Furniture on Amazon

तर दुसरीकडे त्यांचीच म्हणजे सुनिलराव शिंदेंची मुळ भुमी, दसपटी विभागातील चिपळूण तालुक्यात मविआ व महयुतीच्या प्रशांत यादव व शेखर निकम यां दोन आयरामांमध्ये  फार शर्थीची लढत झाली. असं म्हंटलं जात दोन्ही कडून अक्षरशः पैस्यांचा पाऊस पाडला असला तरी ते स्वाभाविक होत, कारण भुमिपुत्रांऐवजी चिपळूण विधासभेत दोन्ही राष्ट्वादींनी आयारामांना प्राधान्य दिलं असल्याने, दोन्ही आयारामांपैकी एकाच्या विजयासाठी  दाम  काम करणारच होतं. परंतु दाम विरहीत मतदानामध्ये सगळ्यात जास्त मतदान हे NOTA ला पडलं. महाराष्ट्रात अद्याप NOTA विषयी लोकांमध्ये अज्ञानता असताना व जाग्रुकता नसताना, चिपळूण सारख्या बहुलोक विभाग हा ग्रामीण असताना NOTA ला एकूण मतदाणाच्या एक टक्का पेक्षा अधिक मतदान होणं, म्हणजे हे दाम करी काम, अश्या विजयी व इतर पराजित    उमेदवारांना नाकारल्या सारखंच आहे. ती किमया दोन दिववसाच्या श्रीं संतोषराव शिंदे दसपटकर यांनी चिपळूणच्या सुजान मतदाराला केलेल्या आव्हाणाने साध्य झाली असावी असं म्हंटलं जात. यावर त्यांच्या सोबत आमचे प्रतिनीधीनी संवाद साधला,  ज्या त्या राजकीय पक्षांच्या प्रमुखांनी, जानकारांनी   आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचं डिजीयुंगंधरा चे मुख्य संपादक व चिपळूण विधानसभेतून  उमेदवारी अर्ज काही तर्कविसंगत त्रुटी दाखवून रद्द केला गेल्यामुळे, चिपळूण विधानसभेतून निवडणूक लढवण्यापासून वंचीत केले गेलेल्या भुमिपुत्र संतोषराव शिंदे यांनी सांगितले. पुढे ते म्हणाले ज्या बीजेपी पक्षाच्या कार्यकरत्यांना उभं करण्यासाठी आणि पक्ष वाढीसाठी सर्वतोपरी ताकद उभी केलेली असताना,  केवळ स्वार्थापाई आयारामांचे मांडीवर जाऊन बसलेल्या त्या अवसरवादी महाभागांना आणि आयारामांना भुमिपुत्रांच्या गळ्यात मारणा-या प्रस्थापित राजकीय पक्षांचे वतीने, जो हा खेळ खेळला गेला तो आपल्या दसपटी विभागासाठी काटेरी बनू नये. चंग रुपयांसाठी लाचार बनलेल्या, आणि आयारामांच्या तालावर नाचणा-या त्या दिशाहीन भुमिपुत्रांनी यावर आत्मपरीक्षण कराव.  लाचारीने हलाल होता येते, विकास होत नाही. कारण दसपटीच्या विकासाचं रहस्य अद्याप एकाही आयारामाला कळलेलं नाही, ते कळणं शक्य नाही कारण त्या मातीशी आणि तेथील सभ्यता, संस्कृती, संस्कार यांचेशी नाळ मुलतः जोडलेली असावी लागते आणि त्याचं भान असाव लागतं, पुर्वजांचे कर्तुत्वाचा अभिमान असावा लागतो. तो या आयारामांमध्ये येणार कुठून ?  मग ते तुमच्या या सगळ्या पुर्वापार विरासतीचा विकास करतील? किंवा त्यांनी तस़ं   का कराव?  ही स्वाभाविक वस्तुस्थिती आमचे भुमिपुत्रांना अद्याप कळू नये ? यासारखे दुर्दैव नाही.

आणि म्हणून गेले तीस पस्तीस वर्षात  चिपळुण विधानसभेच  हेच सत्य   असताना, हि निवडणूक  गेले अनेक वर्षांपासून दसपटकरांचा गड असताना, तीस पस्तीस वर्षापासून शिवसेना आणि आता राष्ट्रवादी या राजकीय पक्षांचे सौदागरांचे बाजारात लढवली गेली असली तरी,   NOTA ला मत करून,  या सौद्याला अपवाद असणारी जनता चिपळूणात अद्याप  असल्याच समाधान आहे. जी उद्या पुनः सुराज्य निर्माण करेल. २०२४ ची ही सबंध महाराष्ट्रातील   निवडणूक ज्या प्रकारे लढली गेली, हे महाराष्ट्रातील जनता नसमजण्या इतकी अज्ञान नक्कीच नाही. हे प्रस्थापित राजकिय पक्षांनी जानावं. ज्यांचे हात बरबटले असतील त्यांचे हात देखील आता त़ोडाल  तुम्ही परंतु जे या सर्वापासून दुर राहून स्वतःच्या भुमिला आबाद राखण्यासाठी आपली हयात कामी लावतात, त्यांच्या माना तुम्ही वाकवू शकत नाही. राजकारणात साम, दाम, दंड, भेद असायलाच हव, परंतु जनतेची प्रताडना??   आजवर  कोणतीही अशी सत्ता तरलेली नाही यावर. आम्ही देखील एक सवयंसेवक आहोत.. असं बोलून आपली नाराजगी त्यांनी व्यक्त केली. 

 शेवटी फडनवीसच एक शायरी वाचून सांगतात, "मेरा पाणी उतरता देख मेरे किनारे पर घर मत बसा लेना। मै समंदर हुँ लौटकर वापस आऊंगा"। हे काळचक्र आहे फडणवीस साहेब, कोणालाही चुकलं नाही. भुमिपुत्रांना डावलून तुम्ही देखील आयाराम व भ्रष्टाचा-यांवर मेहरबान झालात. काळ   चक्र  कोणलाही चुकत नाही.  ते तुम्हालाही चुकणार नाही. तुमचं अभिनंदन. अशी प्रतिक्रिया देखील त्यानी डिजीयुंगंधराचे प्रतिनिधी सोबत बोलताना व्यक्त केली.  डिजीयुंगंधरा चिपळूण दिनांक २४ नोव्हेंबर २०२४, Maharashtra  Politics.




एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

If you have any query, please let me know.

एक टिप्पणी भेजें (0)