चिपळूणचा सर्वांगीण विकास, भुमिपुत्रांच्या आधिकार, न्यायहक्कसाठी, भ्रष्ट, आयाराय नेते, मनमानी करणारे राजकीय पक्ष यांना धडा शिकविण्यासाठी शेवटचं बटन NOTA दाबा.

डिजीयुगंधरा (DgYugandhara)
0

चिपळुण विधानसभा २०२४ निवडणूक रिंगणातून संतोषराव शिंदे बाहेर, प्रस्थापित पक्षातील बिनकामी आणि भ्रष्टाचारी उमेदवारांचे विरोधात छेडली मोहीम No Work..! No Vote..! Just NOTA.  साठी जनतेला करणार जाग्रुक.

DgYugandhara प्रकाशित, बुधवार १३ नोव्हेंबर २०२४ः महाराष्ट्राच्या राजकारणात राजकिय पंक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची मनमानी आणि जनतेला ग्रुहित समजन्याची मानसिकता, त्यामुळे राजकारणाचा दर्जा रोडावत आहे. आणि संबंध महाराष्ट्राच्या राजकारणाची खिचडी झाली. वनभक्षांनी शिकार पकडण्यासाठी झुंबड करावी आणि स्वतःला अधिक मिळाव यासाठी एकमेकाचेच लचके तोडावे, तशी काहीशी अवस्था आज माहाराष्ट्राच्या राजकारण्यांची आहे. समाज आणि सामाजाचा उद्धार, विकास हे साधण्यासाठी राजकिय व्यवस्था असते, हेच मुळी हे राजकारणी विसरले असल्याने, महाराष्ट्राची दुर्दशा होत आहे आणि याला इथेच जर का लगाम लागला नाही, तर बाकी परिस्थिती चिंताजनक आहे. सत्ता ही उपभोगाच साधन नसून, प्रजेच्या उद्धाराचं तंत्र असावं. जर हे तंत्र योग्य हातात आणि कुशल व्यवस्थेनं सुसज्ज असेल तर राज्य सुशासीत राहत. आद्याप तरी काही बिघडलेलं नाही, हे जरी सत्य असलं तरी भविष्यात काहीही घडण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्याचं कारण राजकीय पक्षांनी नजदिकच्या काळात स्वतःच्या स्वार्थाकरीता  घेतलेले अनैसर्गिक युतीचे  निर्णय आणि जनतेला ग्रुहित धरल्याची केलेली चेष्टा. 

 महाराष्ट्राच्या राजकारणात नजदिकच्या काळात जे राजकारण घडलं, हे राजकारण कमी आणि सत्तेसाठी केलेला जुगार अधिक होता आणि या सगळ्या जुगाराला जबाबदार भाजपाचे महाराष्ट्रातील काही विद्वान नेते मंडळी असून, झालेल्या अनैसर्गिक युतीमुळे जनता तर दुखावली परंतु आमच्यासारखे कार्यकर्त्यांना देखील पक्षाला अखेरचा राम राम ठ़ोकावा लागत आहे.


आता चिपळुण विधानसभेचंच बघा. लोकसभेत चार पाच नव्हे, तर तब्बल २० हजार मतानी महायुतीचा  विद्यमान आमदार असताना आमचा उमेदवार   पिछाडीवर जातो?? हे होणारच होत आणि यासंदर्भात  पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना घडत असलेल्या पक्षातील अंतर्गत कलह व कुरघोडी विषयी वारंवार अवगत करून देखील दुर्लक्ष केला गेला, संघटन कौशल्य आणि संघटन बांधनी यांचा दुरूनही स़बंध नसलेल्या आणि ज्या त्या विभागात कोणतीही पोच नसलेल्या आगंतुकांच्या हातात येथील बाहुबली आणि प्रस्थापित दसपटकरांना डावलून  तालुका आणि जिल्ह्याची धुरा देएण्याचा घाट ज्या महाभागांनी घातला, त्यामुळेच वाढत असलेल्या पक्षाच्या वाटचालीलाच अचानक ब्रेक लागावा, हे मुख्य कारण पक्षश्रेष्ठींना कळवून देखील संघटनेत बदल न करता घोंगड भिजतं ठेवणं हे कोणत्या राजकीय प्रगल्भतेच़ं दर्शन होत? अथवा   कोण्या एक्का दुक्का   मंत्री महोदयांसोबत विकासाच्या नावावर करण्यात येणारे करोडोंचे व्यवहार होते ?? हा जरी संशोधनाचा विषय असला तरी यात तथ्य असायला जागा आहे. नाहीतर चिपळुण एस टी स्टँड चे काम गेले दहा वर्षाहून अधिक वर्षे अर्धवट ठेऊन, घाईघाईने चिपळूण रेल्वे स्टेशनचे काम चालू करुन, ते एवढ्या मोठ्या बजेट मध्ये काही दिवसांत उरकणे, यात निश्चीतच काहितरी मोठ्या व्यवहाराची उलाढाल झाली असलेल्या बातमीत तथ्य आहे. यावर प्रकाश टाकला जाऊन, कोण आहे तो वजीर आणि कोण प्यादं हे देखील आता बाहेर येईल. 

त्यात कमी होती की काय म्हणून जनतेच्या भावनेची आणि जमिनीवर कार्य करणा-या कार्यकर्त्यांच्या मेहनतीची पर्वा नकरता, भ्रष्टाचार आणि जनतेची दिशाभूल करणा-या आयाराम नेत्यांच्या विरोधात आवाज उठवून, त्यांना हद्दपार करण्यासाठी कार्यकर्त्यांनी कंबर कसावी आणि पक्ष वाढत असताना, ज्यांच्या विरोधात मतदार तयार करुन पक्ष संघटनेला उभारनी देत असताना, त्याच विरोधकांना युतीच्या नावावर गळ्यात बांधण्याची आणि नंतर येथील भुमिपुत्राना सोडून, काल परवा आलेल्या आयारामाला डोक्यावर बसवण्याची चेष्टा भाजपा पक्ष श्रेष्ठीनी केली. ती कधीही आमच्या दसपटी विभागाच्या म्हणजे आजच्या चिपळुण संगमेश्वर मतदार संघाच्या हीतावह न्हवती. त्या अगोदर देखील विधान परिषदेला बहुलोकाभिमुख मतदार असणा-या आणि कोकण विभागातून वात्सव्य असणारा भुमिपुत्र, उच्चशिक्षित पदवीधर उमेदवार म्हणून आम्ही पक्षाकडे विचारणा करून देखील केवळ, राष्ट्रवादीतून प्रवेश केलेल्या, पश्चिम महाराष्ट्रातील मुळ वात्सव्य असणा-या, केवळ स्वतःच्या घरातले आणि हाताच्या बोटांवर मोजण्याइतकी स्वतःच्या समाजाची मत असणा-या निऱंजन डावखरे सारख्या, ठाणे जिल्हा सोडला तर, कोकणाशी काहिही संबंध नसणारा केवळ फडणवीसांचा जवळचा किंवा पक्षातील इतर सोम्या गोम्यांशी मैत्री असणारा उमेदवार म्हणून पक्ष विचार करत असल्यास, ते विभागाच्या विकासाशी तडज़ोड तर केलीतच परंतु पक्षाच्या मुळावर घाव घालण्याच़ं पातक पक्षश्रेष्ठीं करत आहेत यात कोणतीही श़ंका नाही. परिणामी पक्षश्रेष्ठींच्या या मनमानी आणि राजकीय विचाराला बगल देणा-या क्रुत्यामुळे नाराजगी वश मी आणि माझे अनुयायी यांनी पक्ष सभासद व पदाचा राजीनामा दिला आणि "समाज विकास क्रांती" या राष्ट्रीय पक्षात प्रवेश करून, 'समाज विकास क्रांती पार्टी' च्या पाठींब्यावर, चिपळुण विधासभा २०२४ चा उमेदवारी अर्ज दाखल केला, तो केवळ आयारामांना त्यांच्या   परतीच्या प्रवासाला लावण्ययासाठी आणि विभागाच्या सर्वांगीण विकासांच राजकारण साध्य करण्यासाठी. हि सुरवात आहे कारण दसपटकर भुमिपुत्र आता जागा होत आहे. 

Amazon Office Furniture

आयरामांच्या गर्दित भुमिपुत्रानी निवडणूक लढाव्या असं प्रस्थापित पक्षांना कदाचित रुचत नसावं किंवा भुमिपुत्रांचा विकास त्यानी स्वतः करावा या संकल्पनेची विचारधारा त्याना मान्य नसावी, म्हणून कि काय भुमिपुत्रानी भरलेले अर्ज अवैध कसे होतील यावरच निवडणूक अयोगाच्या आधिका-यांचा कल दिसून आला. खरेतर एखादा उमेदवार जेंव्हा उमेदवारी अर्ज दाखल करतो तेंव्हा तो आपल्या हयातीची पुंजी तिथे लावत असताना, अश्या वेळी तो अर्ज अवैध होवू नये म्हणून संबंधित आधिका-यांनी प्रयत्न करावयास असायला हवे पऱतु इथे प्रस्थापित सोडले तर इतर उमेदवारांचे अर्ज अवैध ठरेल यावर आधिका-यांचा कल दिसून यावा?? जे लोकशाही करीता घातक आणि धोक्याची घंटा आहे. आधिका-यांच्या या नियम आणि क्रुतीदक्षतेमुळे आणि वेळेच्या बंधनामुळे आमचा अर्ज अवैध ठरवल्याने, आम्ही २०२४ च्या चिपळुण विधानसभा निवडणूक रिंगणातुन माघार घेतली असली तरी, आयारामांच्या विरोधात भुमिपुत्रांनी सुरू केलेली ही नादी आहे.

   चिपळुण विभागातील    दोन्ही आयाराम, प्रस्थापित पक्षांचे उमेदवार एकमेका विरोधात, जे कधी काळी एकाच पक्षाचे, युतीचे होते. ते एकमेका विरोधात निवडणूक लढवत असतानाच़ चित्र चिपळुण विधानसभेत दिसतयं. उमेदवार आयाराम असले तरी मतदार मात्र इथला भुमिपुत्र, ज्यांना पाचशे वर्षापासूनचा इतिहास आहे. ज्या इतिहासाबाबत, निवडणूक लढवणारे आयाराम अनभिज्ञ, अज्ञान असल्याने, त्यांच घेण़ं देण़ त्यांना नाही. कारण ब्रिटीशांसारखे व्यापार करावयास आलेले हे आयाराम, भुमिपुत्रांच्या जिवावर मोठे होतात आणि नंंतर त्यांना सत्तेची स्वप्न पढू लागली की, ज्यांचे जिवावर  माया कमवली, त्यांनाच हे मतदानाचे दिवशी चिरिमिरी देऊन विकत घेतात?? सत्तेत आल्यावर सगऴ कसं सहज होतं आणि मग संस्था उभ्या होतात, भुमिपत्रा़कडून पैसा वसूलला जातो. त्याचे उदाहरण म्हणजे पाचशे वर्षांचा इतिहास असलेलं दसपटी, त्यांच्या केवळ चार ते पाच शैक्षणिक स्ंस्था आणि काल परवा येऊन, भुमिपत्रांच्या मदतीने सत्तेत प्रवेश करून, हेच आयाराम अनेेेक संस्था उभ्या करतात आणि त्यालाच विकास संबोधिल जाव, यासायखं त्या भुमिपुत्रांच दुर्देव नाही. हे घडतं केवळ राजकीय पक्षांचे मनमानी आणि दिशाहीन धोरणामुळे, भुमिपुत्रांना ग्रुहित धरल्याने धोरणात्मक विकासाच्या राजकारणाचे अभावामुळे.

आमची उमेदवारी अवैध केली गेली, म्हणून आम्ही काही निवांत बसणार नाही, चिपळुण व चिपळुण व्यतिरिक्त महाराष्ट्रात अश्या प्रकारे राजकीय पक्षांचे मनमानी आणि भुमिपुत्राना बगल देणा-या माणसिकते विरोधातील शस्त्र ‘नोटा’ उचलल असून, सबंध महाराष्ट्रात अश्याप्रकारे भुमिपुत्राना बगल देणा-या राजकिय पक्षांचे विरोधात आवाज बुलंद करणार. कारण ‘नोटा’ मधून मतदारांची नाराजगी उघड होईल तेव्हाच असे राजकीय पक्ष वटणीवर येतील. त्यामुळे “नो वर्क..! नो वोट..! जस्ट नोटा.” या संकल्पनेला 'डिजीयुंगंधरा' द्वारा प्रकाशित करून, भुमिपुत्रांचा आवाज बनत या युद्दाचा शंखनाद आदिप्रवर्तकांची भुमी, दसपटीतून होत असुन, महाराष्ट्राच्या राजकारणाला नवीन दिशा देण्यासाठी, दसपटकर Come back, करतील. 

कारण त्या भुमीतील भुमिपुत्र जर सत्तेत आणि व्यवस्थेत येऊ शकला तरच त्या भुमिचा आणि तेथील विभागाचा उद्दार, विकास शक्य आहे. कोणत्याही आयारामांचे भरोस्यावर विकास शक्य नाही. अन्यथा गेल्या तीस वर्षात, भास्कर जाधवा पासून आता शेखर निकम, प्रशांत यादव पर्यंत विकास घडू शकला असता. तेंव्हा विभागाच्या विकासासाठी, उमेेेदवार हा केवळ भुमिपुत्रच असावा ज्यांचेकडे उद्योग, व्यवसाय, नोक-या संदर्भात नियोजन, योग्य दिशा, दुरद्रुष्टी असावी. DgYugandhara प्रकाशित, बुधवार १३ नोव्हेंबर २०२४.

चिपळूणचा सर्वांगीण विकास, भुमिपुत्रांच्या आधिकार, न्यायहक्कसाठी, भ्रष्ट, आयाराय नेते, मनमानी करणारे राजकीय पक्ष यांना धडा शिकविण्यासाठी शेवटचं बटन NOTA दाबा.










Maharashtra vidhansabha nivadnuk, Chiplun vidhansabha, vidhansabha campaign, chiplun  nivdnuk, rajkiya batmi, Chiplun politics, Maharashtra politics. 

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

If you have any query, please let me know.

एक टिप्पणी भेजें (0)