स्वकियांचा स्वकीयांशी रंगणार सामना.. लोकमत चा जावई शोध..! असे असले तरी आयारामांचे लढतीत भुमिपुत्र मात्र संभ्रमित.. चिपळुण विधानसभा २०२४ NOTA ची एन्ट्री.

डिजीयुगंधरा (DgYugandhara)
0

चिपळूण मध्ये स्वकियांचा - स्वकीयांशी रंगणार सामना. संवेदनशील मतदारसंघात यंदा वैचारिक लढत. 'लोकमत' चा जावई शोध? 

डीजीयुगंधरा प्रकाशितः  आयारामांचा आयारामाशी होणार सामना.. भुमिपुत्र मात्र संभ्रमित.. चिपळुण विधानसभा २०२४ NOTA ची एन्ट्री.

डीजीयुगंधरा, चिपळुण दिनांकः १७ नोव्हेंबर २०२४:  एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस अशा मित्र पक्षात कार्यरत असलेले कार्यकर्ते व पदाधिकारी या निवडणुकीच्या निमित्ताने आमने-सामने उभे राहिले आहेत. मात्र आताची निवडणूक ही काँग्रेसच्या वैचारिक बैठकीत घडलेल्या शेखर निकम व प्रशांत यादव यांच्यात थेट होत आहे. हे दोन्ही समाजवादी विचारसरणीच्या मुशीत तयार झालेली नेतृत्व आहे. त्यामुळे सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, अशी धादांत बनावट बातमी लोकमत ने प्रकाशीत करणे म्हणजे (दसपटीतील) आत्ताचा चिपळूण विधानसभा या निवडणूक लढतीचे, सत्यतेला बगल देणारी, आयारामांचे ढोल बडवण्यासाठी ख-या खोट्याचा मागोवा न घेता, रात्रीच्या बैठकीत मदिरेच्या ग्लासातून उतरलेल्या आस्वादी नशेचा आणि ओठातून निघणा-या काळ्या धुराच्या सोबत निघणा-या तथ्यहीन विचारांना, बातमीच्या स्वरुपात लोकमत सारख्या न्युज पोर्टलवर छापून आणने, म्हणजे पत्रकाररीतेची विद्वत्ता आणि विश्वासार्हतेचा उच्चांगच आहे. 

Amazon office Furniture

परंतु हकीगत अशी असावी, विद्यमान आमदार आणि प्रशांत यादव हे दोघेही काँग्रेसच्या मुशित आणि शरद पवार यांचे कुशित वाढले असल्याने, ते दसपटी म्हणजे चिपळूण तालुक्याच्या हितावह कधीच न्हवते आणि पुढे देखील होऊ शकत नाही. ऐतिहासिक दसपटी सुभा म्हणजे आजचा चिपळूण विधानसभा हा दूरदृष्टी, समर्पित नेतृत्व अभावी, संधीसाधू आयारामांचे हातात गेला.  राजकीय पक्षांचे याच स्वार्थकारण मुळे हा विभाग  दिशाहीन झाला असून, खऱ्या अर्थाने दसपटी विभाग म्हणजे चिपळूणचा विकास हा याच स्वार्थकारणामुळे रोडावला आहे. पंचवार्षीक योजना राबविणे म्हणजे विकास नव्हे, त्यात ही भ्रष्टाचार.   हे देखील येथील पत्रकारांनी समजून घ्यावे. यावर संशोधन करावे आणि मगच अशा आयारामांचे ढोल बडवावे हे एक मी इथला भूमिपुत्र, त्याच बरोबर एक पत्रकार म्हणून आपणास सांगू इच्छित आहे.


पूर्वी आमचे लोक, म्हणजे आमचे पूर्वज आमचे विभागाच्या विकासासाठी किंवा मोहिमेवर जाण्यासाठी विभागातील सावकारांकडून कर्ज घ्यायचे आणि ते कर्ज मोहीम फत्ते झाल्यावर ती त्यांना परत केले जायचे. हे सावकार म्हणजे विभागातील व्यावसायिक होते परंतु आता परिस्थिती बदलली. राजकीय पक्षांचे स्वार्थ कारणांमुळे हे सावकारच भूमिपुत्राचे नेत्रुत्वाला मदत करण्याऐवजी त्यांनाच सत्तेची स्वप्न पडू लागली आणि व्यावसायिक सत्ताधीश बनण्याचे शर्यतीत आले   आणि त्यामुळे त्या त्या विभागाचा विकास, उद्धार रोडावला. अशीच परिस्थिती चिपळूण तालुक्याची, विधानसभेची झाली. ज्याना राजकीय, सामाजिक व्यवस्थेची जाणच नाही किंवा ज्ञान नाही असे लोक राजकीय पक्षांच्या मदतीने सत्तेत आले आणि आणि स्वतःचा विकास करून घेतला. त्या त्या राजकीय पक्षांना फायदा करून दिला. भूमिपुत्र मात्र या सगळ्यापासून वंचित राहिला, दूरच राहिला. अश्याच व्यवस्थेचं चिपळूण हे देखील शिकार झालेलं, हे सत्य खुद्द येथील पत्रकारांना जाणवू नये किंवा त्यांनी दुर्लक्ष करावा यासारखं त्या विभागाचं दुर्भाग्य नाही.

विद्यमान आमदार शेखर निकम आणि प्रशांत यादव हे दोघेही याच मुशीतले उमेदवार आहेत, ते जरी एकाच पक्षातले असले तरी सामाजिक आणि राजकीय दूरदृष्टीचा अभाव असलेले हे अपघाती नेतृत्व भुमिपत्रांना आणि इथल्या शेतक-यांना त्यांचा हक्क देऊ शकत नाही, किंबहुना भुमिपुत्रांना कडेलोटाचे कगारवर आणून सोडेल. कारण चिपळूणचा बहुतांश भौगोलिक प्रदेश हा शेतीप्रधान असून तो एका विशिष्ट समाज, म्हणजे मराठा समाजाचे पुर्वापार वर्चस्वाखाली असून, येथील इतर बहुजन समाज हा आज देखील मराठा समाजाशी सुसंगत आहे. यांची कुशल, सशक्त सामाजिक आणि व्यावसायिक कटीबद्धता एकत्रित राखल्यानेच शेती आणि पुरक व्यवसाय आजवर काहीसे टिकून आहेत. मधल्या काळात शिवसेनेतील भास्कर जाधव, आनंत गिते सारख्या राजकीय संधीसाधूंनी येथील समाजा समाजात तेड निर्माण करून स्वतःची राजकीय पोळी भाजली आणि शेतीप्रधान असलेल्या या भुमीत, भुमिपुत्र मात्र शेतीविकासाचे अभावामुळे वंचितच राहीला. 

आताचे हे दोन्ही आयाराम जे किंवा त्यांचे बापजादे विभिन्न तालुक्यातून व्यवसाय नोकरी करण्यासाठी म्हणून आले राजकीय पक्षांचे पाठबळ घेऊन सत्ता उपभोगण्यासाठी उतावीळ झाले. पंचवार्षीक योजनेला विकासाचं स्वरूप देऊन, भुमिपुत्रांना मात्र दिशाभूल करीत आहेत. येथील सामाजिक, उद्योगिक, भौगोलिक आणि ऐतिहासिक पार्श्वभूमीशी अनभिज्ञ असलेले हे दोन्ही आयाराम शेखर निकम आणि प्रशांत यादव, विभागाचा सर्वांगिण विकास करू शकत नाही. ही काळ्या दगडावरची सफेद रेघ आहे, कारण येथील राजकारण हा त्यांचा पिंड नव्हे. दसपटीचां विकास हा, येथीलच अभ्यासू, दुरद्रुष्टी, सामाजिक, व्यावसायिक भान असलेल्या भुमिपुत्राशिवाय शक्य नाही. हे या आयारामांना विचारणारा एकही पत्रकार, विचारवंत चिपळुण मध्ये नसावा?? किंबहुना चहा बिस्कुट वर समाधानी होऊन, हाताच्या बोटांवरचे सोडले तर, त्यांचींच बोली बोलणारे काही पत्रकारांचे मात्र या आयारामां मुळे सुगीचे दिवस आले आहेत यांत शंका नाही. हे जर असत्य आहे, तर विकासाचा धांडोरा पिटणा-या शेखर निकमाना कोणी पत्रकार हे विचारेल का?

आजवर विद्यमान आमदारांनी काय केलं विभागाचे विकासासाठी? 

जिल्हा परिषद शाळांचा उद्धार कोणी केला ?? ज्यामुळे तालुक्यातील बहुतांश शाळा बंद पडण्याचे कगारवर..

पाठबंधारे विभागतील भ्रष्टाचाराचा धनी कोण?

अद्याप राँयल्टी जमा होऊन देखील, जमीन मालकांचे पैसे कुठे गेले??

शेतीचे नुकसान झालेल्या शेतक-याना महसूल मधून २०२१ ते अद्याप पर्यंतचे नुकसान न मिळता, ते कोणी खाल्ले??

क्रुषीने अहवाल दिला असताना, ती नुकसान भरपाई अद्याप शेतक-यांचे खात्यात वर्ग न होता, कोणाच्या खात्यात वर्ग झाली?

पंचायत समिती आणि सार्वजनिक बांधकाम खात्यातील टक्केवारी चे म्होरके कोण आहेत?? सार्वजनिक व विकास बांधकामांचे सिटिझन इनफाँर्मेशन बोर्ड, कामाचे सुरुवातीला न लागण्याचे कारण काय आहे ?

भुमिपुत्रांच्या गरीब मुलांना आपले शाळांमधून इबीसी सारख्या शासनाच्या सवलती असताना, त्याना सवलत का मिळत नाही?

भुमिपुत्र शेयक-याचे उद्योग उभे रहावे, त्यांचे जमिनी वाचाव्यात म्हणून आजवर काय प्रयत्न केलेत?

खेर्डी, सती ग्रामपंचायती येथील २००५ अगोदरचे महसूल रेकाँर्ड कोणी गायब केले. त्याचे मुळ मालक व कुळांचे सत्य प्रती, दस्ताऐवज कोणी व का नष्ट केले ?? व का बदलले गेले?

भुमिपुत्र कामगारांचे हक्क का मारले जात आहेत? त्यांचे प्रश्न एक लोकप्रतिनिधी म्हणून अद्याप ऐरणीवर का ठेवले?

आरोग्य खाते, महसूल, पंचायत समिती या खात्यातील भ्रष्टाचार आणि आधिकारी यांची मुजोरी कोणाचे वरदहस्ताने राजरोस चिपळुणात चालू आहे??

एम आयडीसी तील कंपण्या भुमीपुत्रांना डावलून बाहेरील कामगार भरती करत असताना आपण कामगारांना न्याय मिळवून देताना कुठे असता??

असे आणि अनेक प्रश्न आज चिपळुणातील जनतेसमोर असताना तुम्हाला का मत द्यावे??

Sheeshai Temple 
प्रशांत यादवाला  राजकीय जमिन करून देण्यासाठी, दसपटीचे महानुभव माझी आमदार रमेशभाई कदम आणि प्रतापराव शिंदें, या सारख्या दसपटीच्या पुढा-यांनी आपली राजकीय आणि सामाजिक प्रतिष्ठा एका आगंतुक आणि सामाजिक घातपातासारखे गुन्हे दाखल असलेल्या, बनावट नोटांंची   उलाढाल करणारे म्होरके, ज्या पतसंस्थेत होते  जिथे यांचे धागे जोडलेले आहेत अश्या   व्यवसायकाचे कामी लावावी आणि विकासासाठी कित्येक वर्षे आस लावून असलेली दसपटी विभाागाातील सामान्य जनता, येथील भुमिपुत्र मात्र स्वतःचे उद्धारासाठी तडफडत रहावा किंवा स्वथतःचे पुर्वापार हक्क विकून पोटापाण्यासाठी शहराचे ठिकाणी स्थलातरीत होऊन आपल्या जन्मभूमी पासून दुर कुठेतरी अस्त व्हावा यासारखी दुर्भाग्यवश परिस्थिती उपस्थित होणे, म्हणजे सामाजकारण आणि राजकारणात वावरणा-या या मंडळींची ही पुन्हा आत्महत्याच म्हणावी लागेल..! तेव्हा भुमिपत्रांनो भानावर या स्वतःच्या भल्यासाठी आणि आयारामांना कायमचं हद्दपार करण्यासाठी NOTA ला जिंकून द्या. डिजीयुंगंधरा प्रकाशित, चिपळुण.
चिपळुण विधानसभा, आयारामाना परतवण्याची NOTA चं सगळ्यात शेवटी सात नंबरच बटन दाब.




chiplun politics, Maharashtra nivadnuk 2024, Maharashtra vidhansabha election 2024




एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

If you have any query, please let me know.

एक टिप्पणी भेजें (0)