भाजपा कोविआ चिपळुण संपर्क प्रमुख संतोषराव शिंदे यांचा, भाजपा पद व पक्षाचा राजीनामा. समाज विकास क्रांती पार्टी वतीने चिपळुण संगमेश्वर विधानसभा निवडणुकीच्या रिंगगणात..

डिजीयुगंधरा (DgYugandhara)
0

  

शनिवार दिनांक २६ नोव्हेंबर २४, डिजीयुंगंधरा प्रतिनिधी:    भाजपा कोविआ चिपळुण संपर्क प्रमुख श्री. संतोषराव शिंदे यांनी आपल्या भाजपा पद व पक्षाचा राजीनामा देत, समाज विकास क्रांती पार्टीत प्रवेश केला. 'समाज विकास क्राती पार्टी' वतीने चिपळुण संगमेश्वर विधानसभा निवडणुक रिंगणात उतरत असून,  भुमिपुत्रांच्या व कष्टक-यांच्या न्यायहक्कसाठी व विभागाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करणार असल्याचे ते म्हणाले. माझं राजकारण हे  बहुजन समाजाच्या उदधार व विकासाच स्त्रोत असून, चिपळुण ग्रामीण व शहर येथील उद्योगांची झालेली दुरावस्था, शेती व्यवसायासाठी मुबलक मदत व  योग्य   मार्गदर्शन न मिळाल्याने तरुणांचे शेती व्यवसायाकडे होत असलेले दुर्लक्ष, व्यसनाधीन झालेला तरुण अश्या विवीध समस्यानी आज माझा हा विभाग होरपळत असताना, यातील समस्यांचे निवारण करणे हे माझे मुख्य लक्ष व जबाबदारी असून, त्या सोडवण्यासाठी, तरुणांना उद्योग व त्याला लागणारे भाग भांडवल उभं करुण देणं, होतकरु तरणांना उद्योजकतेसाठी सकारात्मक वातावरण व व्यासपीठ उभं करत येणा-या पाच वर्षात, भुमिपुत्रांसाठी उद्योग व   नोक-या उपलब्ध करण्याच्या उद्दैशाने, जे आजवर तालुक्यात कधीही न झालेले काम “आम्ही दसपटकर” ब्रँड वतीने चालू केले असून,  लवकरच त्याची घोषणा आम्ही कुलस्वामिनी श्रीरामवरदायिनी ला साक्षी माणून करणार असल्याचे श्री. संतोषराव शिंदेनी नवीन पक्षात प्रवेश केल्यानंतर  प्रथमच डिजीयुंगंधरा च्या प्रतिनिधीला दिलेल्या आपल्या मुलाखतीत सांगितले. व्यसनाधीन झालेले तरुण व आयाराम राजकारण्यांच्या खोट्या  अमिशाला बळी पडणारे विभागातील नागरीक यावर अचूक व गुणकारी तोडगा आम्ही काढला असून, आयारामानी आजवर जनतेची केलेली दिशाभूल, यापासून भुमिपुत्राना जाग्रुक करण़ं हे कठीण असलं तरी अशक्य नसल्याने, लवकरच ही परिस्थिती आपण बदलू व विभागाच्या सर्वागीण विकासासाठी रात्रंदिवस मेहनत व श्रम घेऊन विभागाचा उद्धार करण्यासाठी त्याची ब्लुँ प्रिंट देखील आमच्या संस्थांच्या वतीने तयार झाली असल्याचे ते म्हणाले.. त्या द्रष्टीने आमची वाटचाल चालू असून, सक्षम व स्वदेशी राजकीय व्यवस्था निर्माण करणे हे त्याचं पहिल़ पाऊल असल्याचं सांगत, त्यासाठीच चिपळुण संगमेश्वर विधानसभेच्या सक्रिय राजकारणात आपण प्रवेश केला आहे. त्यामुळे भुमिपुत्रानों आयारमांच्या क्षुद्र अमिशाला बळी न पडता विभागातील जनतेने, भुमिपुत्रांनी, कष्टक-यांनी मला विधायक कार्यासाठी आशिर्वाद द्यावा हिच चिपळुण संगमेश्वर विधानसभा मतदारांना प्रार्थना करतो असे आव्हान त्यानी मतदारांना केले. हि भुमी माझ्या महान पुर्वजांच्या पुण्याईने आणि पराक्रमांने पावन झाली असुन, सध्या स्थितीत आयारामांच्या राजकीय स्वार्थाने तीची हि अशी दुर्दशा आहे. शिक्षण सम्राटांच्या लोभापाई जिल्हा परिषद व दसपटी विभागातील अनेक शाळा डभघाईला आल्या, शासनाने पैसा ओतून सुद्धा त्या जाणून बुजून अद्यावत करण्याचे वेळोवेळी टाळले गेले. कोणतं कारण होत त्यामागे? शेती विकासासाठी पाठबंधारे बांथले गेले आणि शासनाकडे शेतक-यांच्या जमिनीची राँयल्टी वर्ग करण्यात आली परंतु भुमिपुत्रांना त्यांचा  मोबदला दिला गेला नाही अद्याप. कोणाच्या इशा-याने  हे चालू आहे? त्याचं उत्तर महसूल आणि पाठबंधारे विभागांने द्याव. आमच्या विभागात एका पेक्षा एक इजिनीअरींग चे विद्वान असताना कोणाच्या इशा-यावर भुमिपुत्रांना ठेके न देता, बाहेर काँट-याक्ट देण्याचं कारण काय?   आज वर भुमिपुत्रानी तुम्हाला डोक्यावर घेऊन सत्ता दिली असताना, भुमिपुत्रां सोबत हे भेद कशापायी??   

कारण आजवर, चिपळुण संगमेश्वर विभागात भुमिपुत्रांची दिशाभूल करून, काही राजकीय  पक्षांनी आयारामांना स्विकारणं हे भुमिपुत्रांची आणि त्यांच्या सहनशक्तीची प्रताडनाचा म्हणावी लागेल. याच आयारामांनी भुमिपुत्रांचा कष्टक-यांचा वापर स्वतःच्या स्वार्थासाठी करून आपले जुमले उभे केले आणि भुमिपुत्राना विकासाच्या नावावर पंचवार्षीक योजनांचं गाजर देत ठेकेदारी स्वतःच्या नातेवाईक किंवा बडव्यांचे नावावर घेऊन करोडोंचा मलीदा लाटला. चिपळूण संगमेश्वर विधानसभेचा हाच तो विकास?? ठिक ठिकाणी कच-याचे ढिग, रस्त्यांची अवस्था अशी की एका पाऊसात ते वाहुन जाऊन खड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे याचा थांगपत्ता भल्याभल्याना लागू नये?? कारण जाणून बुजुन कायद्याच्या विरोधात ठेकेदार, आधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांचे संगनमताने कामाचे माहीती फलक न लावता, जनतेच्या डोळ्यावर पट्टी बांधून, बिंदास्त जनतेच्या पैशांवर अश्याप्रकारे गल्ला मारणा-यांची तुमची नियत जनतेला कळली असून, आता यांची उलटी गिणती चालू झाली आहे. त्यामुळे जनतेने जाग्रुक होऊन आता मतदान कराव असे आव्हान संतोषराव शिंदेंनी चिपळुण संगमेश्वर मतदारानाल केले असून, चंग हजार - पाचशे रुपयांसाठी आपली मत विकू नयेत, कारण आज हे तुम्हाला हजार पाचशे देऊन, उद्या तुमच्या तिजोरीवर कररोडोंनी गल्ला मारणार, ह्याच भान आपल्यापैकी प्रत्येकाने ठेवाव आणि मतदान करावं..! डिजीयुंगंधरा द्वारा प्रकाशित


एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

If you have any query, please let me know.

एक टिप्पणी भेजें (0)