डिजीयुंगंधरा संपादकीयः Chiplun political news, दिनांक ०१ आक्टोंबर २०२४. तुमचा बाप जर श्री. शरदजी पवार?? तर मग तुम्ही इथे दसपटीत कोणाच्या बापाच्या आधिकारावर उद्द्योग उभे केलेत?? आणि कोणाच्या राजकीय वारसावर स्वतःची राजकिय पोळी शेकता आहात?? दसपटकरांची माफी मागा प्रशांत यादव..! दसपटकर संतोषराव शिंदेंचा आयारामांना सवाल.
भुमिपुत्रांना दिशाभूल करून गेल्या पस्तीस वर्षात आयारामानी दसपटकरांची सत्ता गिळंक्रुत केली परंतु हीच सत्ता एक हाती, आयारामांच्या तोंडाला फेस आणून ती पुनः मिळविण्याचं सामर्थ्य आज देखील दसपटकरांमध्ये आहे कारण दसपटकरांनीच या मंडळींना तथाकथित पक्षांच हित जपण्यासाठी, पक्षांच्या फायद्यासाठी आयात केलं, त्यामुळे ज्यानी जन्माला घातले, तेच या आयारामांचे राजकिय बाप नव्हेत का?? ज्यांचे विभागात आज देखील यांच्या हवेल्या, यांचे बंगले यांचे साम्राज्य, ज्यात भुमिपुत्रांना टोप्या घालून उभ़ केलेलं व्यावसायिक साम्राज्य देखील आहे, ते आयाराम विसरत आहेत. यांची अवस्था चोरून दुध पिणा-या मांजरासारखी झााली नाही का?? कारण भुमिपुत्र निद्रीस्त राहीले आणि आमचे पुढा-यांची राजकीय समज या विषयाची दरिद्रता मुख्य कारण, जे आज हा विभाग विकासापासून वंचित राहीला आणि आमच्या भुमिपुत्र कष्टकरांचे लोंढे मुंबई पुण्या सारख्या शहरांकडे पोटापाण्यासाठी वळले. परिणामी जमीनी ओसाड राहील्या. शेती आणि शेती पुरक व्यवसाय बंद झाले. याला कारण देखील हेच आयाराम आणि त्यांचे दसपटी विभागाविषयी असलेले अज्ञानत्व, दिशाहीन आणि अपघाती नेत्रुत्व, हेच दसपटी विभागाच्या अविकासाचं मुळ कारण आहे.
आमचा बाप शरद पवार हे बोलताना प्रशांत यादव या आयारामाला हे भान हवं होत, ज्या भुमीत उभा राहुन तु ही भाषा केलीस त्या दसपटीचा बाप, मी आहे हे बोलण्याची हिम्मत कधी बाळासाहेबांची पण झाली नाही. कारण दसपटीचा इतिहास फार जुना आहे, हि भुमी आदिप्रवर्तकांची आहे, त्या दसपटीला जर हे काल परवा आलेले आयाराम, नेते बणून आमचे बाप बदलण्याची भाषा करीत असतील. तर नक्कीच भुमिपुत्र तुला तुझी जागा दाखवतील कारण तो आमचा आणि आमच्या महान पुर्वजांचा, आदिप्रवर्तकांचा अपमान आहे आणि दसपटी आणि त्यांच्या इतिसासाची असमज असणा-या आयाराम प्रशांत यादवाने ते स्पष्ट कराव, कोणाचा बाप बदलून तूम्ही निवडणूका लढत आहात??
रमेश भाई, निकम महोदय जर साता-यावरून आले आणि त्यांना दसपटकरांनी स्वतःच्या गोदीत बसवलं, मग त्यावेळी तुम्ही कुठे होतात? आजून तुमचा एक कंठस्थ, जिवलग मित्र भासकर जाधव याला जेव्हा आपल्या विद्वान म़डळींनी स्वतःच्या बापाजाद्यांचे विरोधात जाऊन इथे प्रस्थापित केला, तेंव्हा तुम्ही कुठे होतात?? जेव्हा आपल्या तंगड्या त्याने आपल्याच गळ्यात घालून स्वतःच स्वार्थकारण साधल, तेव्हा तुम्ही कुठे होतात रमेशभाई?? समाजाला, इथल्या भुमिपुत्राना जेंव्हा वा-यावर सोडून तुमच्यासारखी मंडळी पक्षीय राजकारण खेळत असतील, तर विभागाचा विकास आणि उद्धार कसा होणार?? आणि आजवर चिपळूणचा विकास या आयारामांपैकी किती आणि कोणी केला ?? मुळात त्यांना दसपटीचा विकास नकोच आहे. विकास म्हणजे सरकारी पंचवार्षीक योजना होत नाही. ते कोणतही सरकार त्यांचे धोरणानुसार राबवीत असतात. हे आयाराम विभागाच्या विकासासाठी नव्हेत तर स्वतःची पांघरूण घालण्यासाठी आणि गडगंज माया जमवण्यासाठी आलेले बगलबाज आहेत. नाहीतर काल परवा प्रशांत यादवाने जी सभा भरवली त्यात किती दसपटकर भुमिपुत्र होते आणि किती कराड, सातारा, इतर जिल्ह्यातून पैसे देऊन आणलेले भाडेकरु प्रवासी होते हे येथील संमंजस जनता न जाणन्या इतकी बुद्धू नक्किच नसावी. चहा बिस्कुट पात्रेकाराना खुश करून खोट्या बनावट बातम्या बणवून जनमाणस वळविता आला म्हणून जनतेला दिशाभूल करण्यांच आयारामांसाठीची ही तुमची तळमळ दसपटकर भुमिपुत्र जास्त दिवस सहन नाही करू शकणार. कारण तुम्हाला जाब विचारणारी दसपटीच्या भूमिपुत्रांची नवीन पिढी ऊभी होत आहे, हे आमच्या पुढा-यांनी देखील समजावं आणि आयारामानी देखील. आयारामांचा हिशोब चुकता करून त्यांना त्यांच्या मायदेशी परतवण्याची तयारी दसपटकर भुमी पुत्रांनी चालू केली असून, चिपळूण संगमेश्वर विधानसभेसाठी आयारामांनी स्वप्न बघू नयेत आणि आमच्या भुमिपुत्राना आजवर जसं पक्षांच्या नावे गाजर देऊन दिशाभूल केलंत असे उद्योग पुनः करू नयेत.
ज्या भास्कर जाधवाला दसपटीने मोठा केला त्याने आजवर दसपटीसाठी पंचवार्षीक योजनेच गाजर विकास म्हणून दाखवून किती माया स्वतःसाठी आणि स्वतःच्या मुलाबाळांसाठी गोळा केली?? आज स्वतः सोबत स्वतःच्या मुलाला प्रस्थापित करणा-या भास्कर जाधवाना दसपटकरांच आव्हान आहे, एकदा तरी हिम्मत असेल तर कबूल करा की दसपटकरांमुळे आज त्यांची राजकिय कारकीर्द फळली नाही, हे सत्य आहे तर आता पुढील चिपळुण संगमेश्वरचा आमदार हा दसपटीचा भुमिपुत्र होण्यासाठी तुम्ही स्वतःच्या मुलाबाळा आणि गोतावळ्या ऐवजी दसपटी जो उमेदवार देईल त्याला तुमच सहकार्य द्याल का??, दसपटीने तुमच्यावर केलेल्या उपकारांची जान ठेवाल?? नाहितर हे जाहीर करा की दसपटीचा आणि गुहागरातून पोटापाण्यासाठी आलेले तुम्ही, तुमचा कधीही संबंध दसपटीशी न्हवता. जे मिळवलत ते तुम्ही तुमच्या बलबुत्यावर मिळवलंत, त्याचा दसपटीशी काहीच संबंध नव्हता. एवढं कबूल कराण्या इतकी राजकिय समज नेते म्हणून दाखवाल श्रीमान भासकर जाधव?? नाहितरी दसपटीच्या पाठींब्यावर, डुबणा-या जहाजातून उंदीर जसे जागा बदलतात, तसे तुम्ही पक्ष बदललेत. आता जाहीर कबुली द्या दसपटी तुमची तारणहार होती. अशीच जाहीर कबुली शेखर निकम, प्रशांत यादवांनी दसपटकरांना द्यावी आणि एथील भुमिपुत्राना चिरीमिरी आमिंश द्यायचे सोडून, ज्या संस्था तुम्ही उभ्या केल्या, त्यात भुमिपुत्रांना स्थान द्याल?? अन्यथा ज्य्या आमचेे भुमिपुत्रांच्या बलबुत्यावर निवडणूक लढवून, स्वतःची पोळी भाजत आहाात, त्यांना 'अखेेेरचा राम..राम'..! करण्याची हिच ती वेळ आहे. भुमिपुत्रहो जागे व्हा..! संतोषराव शिंदेंचीी दसपटकरा भुमिपुत्रांना हाक. Chiplun political news by DgYugandhara.
If you have any query, please let me know.