दिशाभूल दसपटकर.. आपल्या विवेक बुद्धिला कोणत्या अद्रुष्य पिशाच्चांचा बाधा ? ..

डिजीयुगंधरा (DgYugandhara)
0


डिजीयुगंधरा संपादकीय प्रस्तुत ..  

धन्यवाद दसपटकर..! 

बरेच प्रयत्नांती हा कार्यक्रम आपल्या   तालुक्यात उद्योग आणि एम्प्लॉयमेंट उपलब्ध करण्यासाठी घेतला होता. अवैध जंलतोडी सारख्या बेकायदेशीर घटनांवर रोख आणल्यावर,  जी मडळी विलाप करत, अवैध जंगलतोडीला उद्योग समजत होते. त्यांचेवर    रोख लावल्यानंतर, त्यांना पुनःर्स्थापित करण्याकरिता, सामान्यांच्या उद्य़ोग धंद्या करीता,  हे दसपटी आणि मराठा महासंघाचे वतीने हे दालन आपण उघडलं होत. पर्वणी होती त्यांच्यासाठी परंतु   आपले तेच लोक, जे अवैध जंगल तोडीला उद्योग मानणारे आणि पोटा पाण्याची व्यवस्था समजणारे, त्याचबरोबर चिपळूणात उद्योगाची गरज असणारे या बाबतीत फार उदासीन दिसले. जे आयाराम आणि स्वार्थी नेत्यांचे मागे धावण्यात आणि त्यांचीच उदोउदो करण्यात भुषण समजून   वेळ वाया घालवताना दिसताहेत.  

बँक, सहकार, अण्णासाहेब पाटील महाम़ंडळाचे मंत्री प्रत्यक्ष आपल्या घरात आले असताना, आपले काही सद्वीवेकी आणि उद्योजक व चिपळुणातील प्रतिष्ठीत व्यक्ती सोडले, तर आमदार महोदय आणि त्यांचे चिरंजीव यांना महासंघाचे वतीने निमंत्रीत केले असताना, साहेब गैरहजर होते. एका लोकप्रतिनिधीची जनतेच्या, भुमीपुत्रांच्या कल्याणासाठीची ही उदासिनता होती, की आयोजकां बाबतचा हा द्वेश?? भले काहीही असलं तरी आमदार महोदयांनी, प्रोटोकॉल प्रमाणे हजर असणं जरुरी होतं परंतु साहेब गैरहजर.  त्यापलीकडचे डेरी आणि हाँटेल उद्योजक, कोण्या मण्यात कोकण.. अतिथी.. देवा भवः..     एकांना काल परवा येऊन, सध्या सत्तेची स्वप्न पडू लागली आहेत. तर दुसरे   भुमिपुत्रांच्या, समाजाच्या विकासात स्वतःचा  विकास साधू इच्छित आहेत??  चहा भिस्कुट वाले पात्रेकार यांच्या दिमतीला, मग सारं कसं एकदम रंगवून लोकांसमोर मांडलं जातं, लोक भूलतात यांच्या भलभुलैयाना. असे रंगास्वामी देखील मराठा समाजाच्या या मेळव्यासाठी  मराठा महासंघाचे वतीने  निंमंत्रीत होते की, कारण खऱोखर हे समाजासाठी काहीतरी करत असतील, तर प्रत्यक्ष चिपळुणात मराठा समाजाच्या सक्षमी करणासाठी उतरलेल्या या यंत्रणेला यांचा हातभार लागला तर अजून कार्य जोरात होईल, परंतु हे देखील गैरहजर. हा दसपटकरां विषयीचा द्वेश? की मराठा समाजाला दिशाभूल करण्याचे षडयंत्र ?  उदासिनता? हे येणा-या काळात स्पष्ट होईलच. नाही आम्ही   जनतेसमोर यांचे पडदे उघडूच.. (दसपटकर म्हणजे केवळ १३ गांव शिंदे, कदम नसून, संपुर्ण कुंभार्ली ते दाभोळ हा ऐतिहासिक सुभा होतो. ज्यात सर्व जात, धर्म, आणि पंत येतात, जे गेली पाचशे वर्षेहून अधिक काळपासून येथील स्थानीक रहीवाशी होत.) 

यावरून स्पष्ट होतय,  अश्या या मंडळींना तालुक्याच्या विकासाशी, चिपळुणातील जनतेच्या प्रश्नाशी काही घेणं देणं नाही.  भुमिपुत्रांनी यांचेवर चंग गोष्टींसाठी   अवलंबून रहावे, यांचे मागे यावे, म्हणून यांचे प्रयत्न असल्याचे,  या मंडळींच्या एकंदर  सामाजिक बांधिलकी वरून कळून येतं. अश्या या  चतुरंग मंडळीना फक्त निवडणूक काळात जनतेच्या मतांशी संबंध आहे. मतादानाच्या वेळेस चारसे पाचशे द्यायचे आणि थातूर मातूर रस्ते त्यात पन यांचे आणि याच्या बडव्यांचं कमिशन, हा सध्या चिपळूणातील विकास. यांचे दिमतीला यांचे ढोल बडविणारे काही चहा भिस्कुट पात्रेकार. 
 

 महाराष्ट्राच्या राजकारणात ऐतिहासिक योगदान असलेल्या,  दसपटीच्या बाबतीत याच कारणास्तव आमचेच  काही अस्तनीतील निखारे आणि आयाराम  मंडळींनी स्वतःच्या स्वार्थासाठी बनवलेला अजेंडा, जो दसपटीचा इतिहास बदलवून   यां आयाराम नेत्यांच्या पथ्यावर पडत आहे आणि  भुमिपुत्र या इतिहासा बाबतीत अनभिज्ञ असलेले, याच तथ्यहीन व बनावट इतिहासावर  रट्टा मारून, अप्रत्यक्षपणे इतिहास बदलण्याची चेष्टा करत या आयारामांना प्रस्थापित करण्यास मदत करीत आहेत का? हे सत्य असेल तर या जाळ्यात दसपटकर पुरते अडकले असून,  या अडकल्यामुळेच,  आपल्या लोकांमध्ये उद्योग, व्यवसाया करीता असलेली मरगळ, उदासिनतेच़ मुख्य कारण आहे. यातून दसपटींने बाहेर पडाव. अन्यथा बाहेरचे आयारामांकडे हात पसरावे लागतील, मतदानाच्या वेळेस चार पाचशे हे आपल्या तोंडावर मारतील आणि    त्यांच्याच मागे फिरण हे कोणतं शहाणपण?? आणि पुढली पिंढी  मात्र आंधारात जाईल. दसपटीला दाबण्याचा पुर्ण प्रयत्न आयायामांचा चालु आहे आणि त्यात हे यशस्वी होत आहेत. हे आपल्या लोकानी समजाव. नुसतच जमिनी बाहेर विकल्या जात आहेत म्हणून विलाप करून, घरात बसून प्रश्न संपणार नसून, स्वतः नाही तर, दुसरा आपला भाऊ ते रोखण्यासाठी पुर्ण यंत्रणा जोडून सर्व श्रम लावून, सपशेल यंत्रणेला तुमच्या दारात आणलेल़ असताना तुम्ही मंडळी घरात बसता? हा काय प्रकार?? काय साध्य करायचंय तुम्हा मंडळींना?? हे आयाराम आपले हेतू तथाकथीत पक्षांच्या नावावर आपली झोळी भरून, परतीच्या प्रवासाला जातील, जसे सध्या एक गुहागरवाले गेले. म्हणून जे घडतंय त्याला असंच घडून देणार असाल, तर माफ करा आपल्याला आपले पुर्वज माफ नाही करणार आणि कुलस्वामिनी साथ नाही देणार.

दसपटी म्हणजे दहा किंवा तेरा गांव शिंदे, कदम नसून कुंभार्ली ते दाभोळ हा ऐतिहासिक सुभा, ज्यात प्रत्येक समाज येतो. ज्यात चिपळुण सोबत संगमेश्वर, गुहागर, दापोली, खेड या तालुक्यातील देखील काही गांव येतात. काही मंडळी   केवळ एक विशिष्ट समाज आणि त्यांचे  खाजगी वतनातील गावं म्हणजे दसपटी समजत आहेत. ती पण २८ गावे आहेत रेकॉर्ड वर. यासंदर्भातल आपल्याकडे त्या काळातील सनदी आणि दस्ताऐवज उपलब्ध आहेत. त्यामुळे देवस्थानशी निगडीत १३ गावे म्हणजे केवळ दसपटी समजून आपण आपल्याला मर्यादित आणि संकोचित करून घेतलंय, ते त्यावेळचा असंमज आणि राजकिय दरिद्रता असलेल्या  काही तथाकथित पुढारी आणि हौश्या नौश्या मंडळींमुळे. याच ऐतिहासिक दसपटी विभागाच्या जोरावर आयाराम आणि ज्या पक्षांनी दसपटीच्या  राजकारणात स्वतःला प्रस्थापित केलं त्यांचेच उदोउदो करून, त्यांचे मागे चपला घासून जर काही मोठं काम केलं किंवा करीत आहोत असं कोणाला वाटत असेल, तर तो काळ आता    संपलाय. तर आता विभागाच्या, स्वतःच्या बापजाद्यांच्या भुमीला वाचविण्यासाठी आणि तीच्या विकासासाठी तरी उंबिरठ्याच्या बाहेर पडा. आणि केवळ गप्पच बसणार असू तर,   आपण  काय साध्य केलंय आणि भविष्यात काय साध्य करणार आहोत?? याची उत्तर विचारवंतानी शोधा. कारण विभागाचचे राजकीय वारसदार,  बहु समाजाच्या विकासाची नाळ ज्यांच्या  हातात, जबाबदारी आपल्या खांद्यावर असताना, आपण मात्र आयारामांच्या विश्वासावर??  

  फार गंभीर अवस्थेतून आपला विभाग चालला आहे. आयाराम नेते आणि त्यांचे बडवे यांनी विभागाला दिशाभूल करत, स्वतःची पोळी भाजण्यासाठी  प्रयत्न चालू केले आहे आणि दुर्दैवाने आपल्या मंडळींच्या डोळ्यांवर पट्या लागल्या मुळे मराठा समाज आणि दसपटीतील इतर समाज देखील फरपटत आहे. जो कोणे एके काळी एकत्र येऊन दसपटीच्या राजकीय आणि सामाजिक व्यवस्थेचा निर्णय घेत असे. आज चंग स्वार्थासाठी की काय, आपल्या पुर्वजांनी गरजेचं राखून ठेवलं असून सुद्धा, आपले लोक या आयाराम मडळींचे मागे आपल्या हक्कासाठी फिरताना दिसतताहेत, कस्तूरी म्रुगासारखी ही अवस्था, शेवटी  वनभक्षीचे शिकार बणन्याशिवाय पर्याय नाही..  हे फार लाजिरवाण आणि दुर्देवी आहे. सुट्टिचा दिवस असताना मराठा समाज  अश्या स्वतःच्या     सक्षमीकरणाच्या उपक्रमांसाठी घरातून बाहेर पडू शकत नसेल, तर नक्कीच  यांच्या सद्वीवेकी बुद्धीला अद्रुश्य पिशाच्चांचा बाधा झाला असावा, असं मला विचारवंत आणि विष्लेशक म्हणून वाटतं.


एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

If you have any query, please let me know.

एक टिप्पणी भेजें (0)