भाजपा कोविआ चिपळूण संपर्क प्रमुख श्री. सतोषराव शिंदे यांची चिपळुण स्थानिक तालूका कार्यकारीणी वर नाराजगी. |
काही नसताना पुणे जिल्हा आणि नऊ मंत्रिपद देणं हेच समस्त भाजप समर्थकांना पटलं नव्हतं पण येत्या लोकसभेकडे पाहून ते पचवलं गेलं. पण अजित पवारांचा फुगा लोकसभेत भयंकर जोरात फुटला. आणि आता त्याचं अपचन होऊ लागलंय, कारण त्यांना केंद्रात आता कॅबिनेट हवंय. कशाच्या जोरावर?
जर अजितदादांनी जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना दुजाभावाची वागणूक दिली नसती तर हा असंतोष उफाळलाच नसता. हा असंतोष काही नॉमीनेटेड नेत्याचा नव्हता तर हा असंतोष त्या एका सामान्य भाजपच्या कार्यकर्त्याचा होता ज्याने स्वतः रस्त्यावर उतरून, विरोधकांच्या शिव्या खाऊन, स्वतःच्या हिमतीवर पक्षकार्य अविरत करण्याचा वसा पत्करलाय.
हा आवाज कोण्या एका कार्यकर्त्याचा नसून जमिनीवर अहोरात्र पक्षासाठी तळमळीने काम करणा-या असंख्य भाजपा कार्यकरते आणि स्वयंसेवकांचा आहे. आज महाराष्ट्राच्या विवीध जिल्ह्यात असंच काहीसं चालू आसतानांच चित्र आहे.
तसाच एक तालुका म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळुण तालुका. एक काळ असा देखील होता की चिपळूण तालुक्यातील पुर्वेकडील विभाग म्हणजे दसपटी विभाग ज्याच तालूक्याच्याच नह्वे तर राज्याच्या राजकारणात फार मोठ ऐतिहासिक योगदान होत आणि हे दस्तूर खुद्द शिवसेना प्रमुख बाळासाहेबानी देखील दिलेल्या मुलाखतीतून कळतं. येथील कारभारी ठरवतील तोच उमेदवार निवडून येणार याची खात्री असायची. आज देखील काही वेगळी स्थिती येथे नाही. चिपळुणचं राजकारण हे आज देखील पक्षीय विचारधारे पेक्षा तेथील स्थानिक कारभा-यांंच्याच मतावर चालत. हे आजपर्यंत भाजपाच्या आमच्या पक्ष श्रेष्ठीना उमगल नाही हे दुर्दैव. कारण राष्ट्रवादी च्या अजितदादा गटाचे आमदार शेखर निकम असतताना देखील लोकसभेमध्ये नारायणराव राणेना वीस हजार मतानी पिछाडी पत्करावी लागली, म्हणजेच या आमदार महोदयांचा सपशेल पराभवच म्हणावा लागेल. संपूर्ण रसद, बुथचे व्यवस्थापन आमदार महोदयांकडे दिलेले असताना देखील विरोधक आघाडीवर जातो. बर मा. देवेंद्रजीनी लावलेला तर्क इथे लागू होत नाही कारण संविधान विरोधक प्रचार चिपळुण मध्ये विरोधकानी केलेला आम्हाला तरी आढळलेला नाही. असे श्री. संतोषराव शिंदे यांनी "डिजीयुगंधराला" दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
ते पुढे म्हणाले भाजपाचीच स्थानिक चिपळुण तालुका कार्यकरीणी ज्याना सुरवाती पासूनच चिपळुण ग्रामीण मध्ये विरोध होता कारण हे चिपळुण शहर किंवा शहराच्या आजूबाजूचे काही गावं यांच्या पलिकडे इतके वर्षात फिरकलेच नव्हते किंवा त्यांच धाडसच नाही. याना आमच्या सारख्यानी विचारणा केली तर ते नेहमीच आम्ही आऊट आँफ रेंज जात नाही किंवा ते इतर ठिकाणी व्यस्त असल्याचे जबाब यायचे, पक्षाकडून आलेलली मदत, रसद कुठेही वाटायची आणि दिशाभूल करायची, असे अनेक प्रसंग आहेत, त्यामुळेच एवढे वर्षे मुळ भाजपाचाच चिपळुण हा गड असताना देखील सामाजिक आणि राजकीय समज नसलेल्या आगंतुकांकडून हा डाव पक्षश्रेष्ठी आणि प्रभारीनी कोणाच्या भरोस्यावर खेळला? आज एवढ्या पिछेहाटी नंतर देखील त्यांना उमजू नये? काल परवा प्रवेश केलेल्या दसपटीतील काहींंचा भरना याच ताम्हणकरने स्वतःच्या स्वार्थासाठी करून घेतला खरा परंतु त्यांची अवस्था देखील भोक पडलेल्या जहाजातील उंरांसारखी आहे. ते कधी जहाज बदलतील याचा पत्ता कधीच लागणार नाही. पक्षश्रेष्ठी आणि भाजपा पक्षाच्या प्रभारीनी थोडी तरी राजकीय समज असल्यास ओळखावं. हे आलेले पाहुणे, देखील यावेळी लोकसभा आणि कोकणपदवीधर निवडणूकीत सावकारी मुनीमजीच्या भुमिकेत आपलं काम चोक करीत होते. परंतु पक्षसाठी कित्येक वर्षे झटणारा कार्यकर्ता बाकी दुर्लक्षीत राहीला. त्याची किंम्मत यावेळी थोडक्यात तरी मोजली परंतु हे चित्र असंच राहीलं तर नक्कीच रत्नागिरीत याची किम्मत मोजावी लागेल. अस देखील गंभीर विधान संतोषरावांनी दीलेल्या मुलाखतीत केले.
चिपळुण ग्रामीण भाजपा पक्ष वाढला तो काही मुळ दसपटकरांनी भाजपा मध्ये असताना त्यांचे योगदान दिल्यामुळेच. मग ते माजी रत्नागिरी जिल्हाउपाध्यक्ष श्री. सुभाषराव शिंदे असोत किंवा माजी आमदार श्री रमेशराव भाई कदम, जे आता शरद पवार गटाचं नेत्रुत्व करीत आहेत. चिपळुण नगरपालिका निवडणुकीत भाजपाचे नगरसेवक, नगराध्यक्ष निवडून देण्यात दसपटकर रमेशराव भाई, तसेच इतर दसपटकरांच योगदान होत हे कोणीही नाकारू नये. कारण नुकत्याचं झालेल्या लोकसभा निवडणूकीतून हे सिद्ध झाल आहे. दसपटी आणि दसपटी उपविभागातील ३०% ते ३५% मतदार हे सध्या चिपळूण शहरात वास्तव्यास आहे. त्यानंतर हे नेते पक्षातील अंतर्गत कुरघोडीमुळे बाजू झाले. पुढे पुनः चिपळुणात आमच्या मेहनतीने, भाजपा कोकण विकास आघाडीच्या चिपळुणातील कार्याने येथील सामान्य जनता जोडली गेली आणि "भाजपा पुनः कोकण विकास आघाडीचे" कार्यकर्ते, दसपटीचे भुमिपुत्र यांच्या पुढाकाराने, चिपळूण शहर व ग्रामीण मध्ये जोर धरू लागली. आणि जे कधीतरी कोकण विकास आघाडी च्या मदतीसाठी मुंबईत फे-या मारत आणि पक्षात कोणीही लक्ष देत नाही, असं ओरडत मुंबईला मदतीची हाक मागत, त्यांना चिपळुणच्या तालुका अध्यक्षपदाची स्वप्न पडू लागली, ज्यांच्या विषयी गुहागरचे माजी आमदार श्री. विनयजी नातू यांनी अनेक वेळा नाराजगी दाखवली आणि फटकारले देखील होते. श्री . विनयजी नातू यांचे सहकार्यांने चिपळुण पंचायत समिती शेजारी भाजपा कार्यालय देखील सुरु झालं, जे दसपटकरांच्या वतीने स्वखर्चाने एक वर्ष काहीही तक्रार नकरता चालविण्यात आलं होतं आणि अनेक लोक त्यांच्या समस्या घेऊन तिथे येत व त्याच निवारण देखील श्री. संतोषराव शिंदे यांचे वतीने व त्यांचे कार्यकर्ते वतीने होत. चिपळूणकर जनता खुष होती परंतु ते देखील बंद करण्यात आलं त्याचं कारण अद्याप श्री . विनयजी नातूनी दिलं नाही. आम्हाला न कळवता ते कोणाच्या इशा-यावर मा. आमदार विनयजी नातूनी बंद केलं? यांना आता कोणता साक्षात्कार व्हावा की, पक्ष यांच्या भरोस्यावर पुनः दौड करेल? मा. आमदार डाँ विनयजी नातूनी आत्मपररीक्षण करावं, ते तेव्हा योग्य होते की आता ? अन्यथा याचा जवाब आपणास जनतेकडून मिळेल.
स्थानीक भाजपा ताम्हणकर प्रणीत कार्यकारीणी चिपळुणच्या बहुलोकाभिमुख जनतेने नाकारलली असताना श्री. सतोषराव शिंदे यांचे नेत्रुत्वाखाली लोकभिमुख भाजपाची चिपळुणात स्थापना करण्यात आली, ते पक्ष चिपळुणात वाढावा म्हणून आणि या सर्व घडामोडीची कल्पना प्रदेश भाजपाला दसपटकर भाजपा कार्यकर्त्यांच्या वतीने देण्यात आली होती परंतु तिथे देखील कदाचित प्रदेश कार्यालयाकडून दुर्लक्ष झाला व सध्याच्या ताम्हणकर प्रणीत कार्यकारीणी ने गुपचूप रात्रीत किंवा अमीश दाखवून, दिशाभूल करत आमचे, लोकाभिमुख भाजपा कार्यकर्ते फोडून, असं भासवलं की जो काही पक्ष वाढतोय तो यांच्या योगदानाने.
दुसरीकडे अजित दादा राष्ट्रवादी युती झाल्यावर यांना मुंगेरीलाल स्वप्न पडु लागली की आता आम्हाला घबाड मिळणार आणि आम्ही जो बोलू सो कायदा परंतु कार्यसम्राट आमदारांवर डाव लावणा-या सर्व महायुतीच्या महारथींची रणनिती, स्वप्न व दसपटकरानी रक्तांच पाणी करून ग्रामीण मध्ये वाढविलेला पक्ष, संतोषराव शिंदे यांनी भाजपा कोकण विकास आघाडी वतीने केलेले पक्ष वाढीचे कार्य, ताम्हणकर व आमदार शेखर निकम यांचे महायुतीला केलेल्या दिशाभुलते मुळे धुळीस गेलंं आणि स्थानिक आमदार असताना देखील वीस हजार मतानी चिपळुणात महायुतीला पिछाडीवर जावं लागलं. भाजपा पक्षवाढीसाठी सच्चाईने काम करणाऱ्या ग्रामीण कार्यकर्ते यांचे कडे पक्षाने केलेला दुर्लक्ष आणि स्थानिक पातळीवर प्रभारी आणि पक्ष समन्वयक यांची ताम्हणकर प्रणीत कार्यकरीणी कडून होणारी दिशाभूल यामुळे चिपळुणात भाजपाची पिछेहाट झाली. त्यात आता उरला सुरला पक्ष अजितदादा राष्ट्रवादी पक्षाच्या मायाजाळात अडकवून भाजपाला नष्ट करण्याची कटकारस्थान होत आहे, हे बाकी मा. फडणवीस साहेब व पक्ष प्रमुखानी ओळखावं, असं देखील श्री. संतोषराव शिंदे यांनी दिलेल्या मुलाखतीत पक्षश्रेष्ठींना सुचीत केलं. श्री. संतोषराव शिंदे हे उच्च शिक्षीत व संघाचे स्वयंसेवक असून अखिल भारतीय मराठा महासंघ, रत्नागिरी उपाध्यक्ष व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, कोकण विभाग प्रमुख म्हणून कार्यभार संभाळीत असून कोकण तसेच चिपळूणच्या सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रीय आहेत.
त्यांनी पक्षाच्या वरिष्ठानां आपली नाराजगी व्यक्त करत विंंनंती समज देताना हे देखील सुचवलं की, पक्षात अंतर्गत होणा-या षडयंत्राची, पक्षनेतृत्व नक्की दखल घेईल आणि सुदर्शनजीं सारख्या कार्यकर्त्यांचा तेजोभंग करण्याऐवजी, काल परवा भाजपा पक्षात आलेल्याना समज देऊन, पात्रता समजून उगाचच पदाची खैरात वाटण्यावर रोख आणावी, अन्यथा ४२ वरून ९ वर आलेल्या भाजपाला आपल अस्तित्व टिकविण्यास भविष्यात मोठी जद्दोजहद करावी लागेल, याचं देखिल पक्षाच्या वरिष्ठाना स्मरण रहाव. असे देखील त्यांनी डिजीयुगंधराला दिलेल्या मुलाखतीत बोलताना आपलं परखड व स्पष्ट मत मांडलं, जे राजकारणात धोकादायक असतं परंतु पक्ष वाचवण्यासाठी हे असं कराव लोगतं असं देखील ते म्हणाले.
समाप्त..
,
If you have any query, please let me know.