Click here for amazon discounted Products |
“अखिल भारतीय मराठा महासंघाच्या” वतीने रविवार दिनांक ११ ऑगस्ट २०२४ रोजी नाशिक येथील लंडन पॅलेस सभागृहात राष्ट्रीय प्रतिनिधी - २०२४ अधिवेशन मोठ्या दिमागात आयोजित करण्यात आले होते.
अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष श्री. राजेंद्रजी कोंढरे हे या अधिवेशनाचे अध्यक्ष स्थानी होते. त्यांनी या अधिवेशनाला संबोधीत करताना अनेक विषया संबधी मराठा समाजाचा लेखा जोखा व अभ्यासपूर्ण माहीती मांडली. तसेच श्री. प्रकाशजी देशमुख, सरचिटणीस श्री. जाधव अश्या दिग्गजांनी अधिवेशन यशस्वी करण्यासाठी मोठे योगदान दिले. हे अधिवेशन दोन सत्रात घेण्यात आले असून, पहिल्या सत्रात कृषी उद्योग, पर्यटन, क्षेत्रातील संधी आणि मराठा समाज या विषयावर आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे वित्त सल्लागार व छत्रपती शिवाजी महाराजांवर लिहिलेल्या पुस्तकांचे लेखक डॉक्टर गिरीश जाखोडीया, कोकणामध्ये ग्लोबल कोकण म्हणून उद्योजकतेची चळवळ चालवणारे श्री. संजय यादवराव, ‘सह्याद्री फार्मसी’ चे अध्यक्ष श्री. विलास शिंदे, त्याचबरोबर निमा संघटनेचे त्याचबरोबर निमा संघटनेचे माजी अध्यक्ष, उद्योजक शशिकांत जाधव आणि प्रगतशील शेतकरी, द्राक्ष बागायतदार संघाचे उपाध्यक्ष कैलासी भोसले आदी मान्यवर उपस्थित होते. त्यांची मुलाखत भाषण, कला संवाद प्रशिक्षक शशांक मोहिते यांनी घेतली. या प्रसंगी शशिकांतराव जाधव यांनी आपल्या कार्यशाळात 300 उद्योजक बनविल्याचे सांगून यापेक्षा अधिक उद्योजकांना प्रशिक्षणाची गरज असल्याचे सांगितले. अगदी छोट्या छोट्या स्किल पासून, मोठे उद्योजक तयार करण्यात आपण पुढाकार घेतल्याचे त्यानी सांगितले. तर राज्यस्तरीय आणि केंद्रस्तरीय योजनांची माहिती देऊन युवा उद्योजकांनी त्याचा लाभ घ्यावा असे आव्हान त्यांनी केले. आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे वित्तीय सल्लागार डॉक्टर गिरीश जाखोडिया यांनी उद्योजक जडणघडण आणि उद्योजकांना येणाऱ्या आर्थिक अडचणी आणि त्यावर मार्गदर्शन केले. प्रगतशील शेतकरी द्राक्ष बागायतदार संघाचे उपाध्यक्ष कैलास भोसले यांनी शेतीसंबंधीच्या अडचणी आणि शेती यावर भाष्य केले. शेती ही एक इंडस्ट्री असून, याची योग्य अशी निगा राखून कुशल नियोजनाने त्यावर मार्ग काढावा असे त्यानी सांगितले. शेतीमधील रोजगार आणि रोजगार विषयक रोजगारभिमुख संधी, ही एक द्राक्ष पिक व रोजगार वर्षभर देते. यासाठी सरकारने बागायती शेतक-यांना योग्यत्या सवलती देऊन शेतकऱ्यांना जगाचा पोशिंदा असल्याचे भान करून दिले पाहिजे अशी अपेक्षा त्यानी व्यक्त केली. जगभरात प्रसिद्ध असलेल्या सह्याद्री फार्मचे संस्थापक श्री. विलास शिंदे यांनी सामूहिक शेतीतून प्रगतशील शेतकरी निर्माण केल्याचे सांगून १ लाख गुंतवणूक भांडलातून १५००/- कोटीची उलाढाल सध्या त्यांची कंपनी करत असल्याचे सांगितले आणि त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती ही सध्या झपाट्याने बदलत असल्याचे बोलले. आज त्यांचे सोबत चोविस हजार शेतकरी जुडले आहेत. सह्याद्री फार्मचा हा आर्थिक अहवाल सादर करून त्यांनी सूक्ष्म नियोजन, आर्थिक नियोजन आणि सामूहिक प्रयत्नाचे हे फळ असल्याचे देखिल त्यानी सांगितले. संजय यादवराव यांनी कोकणातील उत्पन्न आणि खर्च याविषयी सांगताना, कोकणातील परिस्थिती वर्णन केली. कोकण विभागासाठी निवडलेल्या शेतकरी प्रगतीसाठी दहा योजनांची माहिती त्यांनी त्या ठिकाणी दिली. मराठा समाजाची साखळी तयार करून आपल्या जमिनीचा वापर त्यानी करावा. ना की ती बाहेर कोणालाही विकावी, असे आव्हान देखील त्यांनी मराठा समाजातील बांधवाना केले.
या अधिवेशनात छत्तीसगड, हरियाणा, कर्नाटक, गोवा हैद्राबाद त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे सर्व जिल्ह्यातून पदाधिकारी प्रतिनिधी उपस्थित होते. मंडणगड तालुक्यातून रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष श्री. लक्ष्मण बामणे तर चिपळूण तालुक्यातून रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष श्री. संतोषराव शिंदे तर संगमेश्वर तालूक्यातून श्री. संजय कदम यांनी या आधिवेशनात प्रतिनिधी म्हणून हजेरी लावली.
याच धरतीवर रविवार दिनांक २५ ऑगस्ट रोजी चिपळूण येथे होणाऱ्या मराठा शक्ती व संस्कृती - २०२४ या उद्योग सत्राचे, दसपटी व अखिल भारतीय मराठा महासंघ यांच्या संयुक्त विद्यमानाने अयोजन करण्यात आले असून, उद्योग क्षेत्रातील विवीध मान्यवरांना निमंत्रित केले आहे. या उद्योग सत्रा द्वारे रत्नागिरी जिल्ह्यातील तरुण, तरणीना उद्योजक मार्गदर्शन देखील देण्यात येणार असल्याचे श्री. संतोषराव शिंदे यांनी कळविले. चिपळुण इथे घेण्यात येणा-या या उद्योग सत्रात विवीध संस्था, बँक व उद्योजक इ. निमंत्रित करण्यात आले असून, निमंत्रित मान्यवरासोबत चर्चा व संवादाचे माध्यमातून उद्योगसंबंधी त्यांचे अनुभव व मार्गदर्शन पर संवाद हे या सत्राचे वैशिष्ट्य राहणार असल्याचे श्री. संतोषराव शिंदे यांनी प्रतिनीधीना सांगितले. रत्नागिरी जिल्ह्यातील मराठा तरूण, तरूणी नव उद्योजकांसाठी घेण्यात येणा-या या “मरठा शक्ती आणि संस्क्रुती” - २०२४, या नाविण्यपूर्ण उद्योग सत्रात सहभागी होऊन त्या क्षणाचे साक्षीदार बणन्याचे आव्हान “डिजीयुगंधरा” चे मुख्य संपादक व “अखिल भारतीय मराठा महासंघ”, रत्नागिरी उपाध्यक्ष श्री. संत़ोषराव शिंदे यांनी समस्त मराठा बांधवाना केले आहे. प्रतिनिधी डिजीयुगंधराः
Click here for amazon Baby Products |
If you have any query, please let me know.