"मराठा शक्ती आणि संस्कृती २०२४" चे नियोजन करताना श्री. संजयजी कदम, श्री. लक्ष्मणजी बामणे आणि श्री. संतोषराव शिंदे. |
डिजीयुगंधरा प्रतिनिधी द्वारा प्रकाशितः दिनांक ११ आँगस्ट २०२४ रोजी नाशिक येथे झालेल्या मराठा समाजाच्या यशस्वी आधिवेशनानंतर, मराठा समाजाच्या उद्योगिक विकासाचं ध्येय लक्षात घेऊन इंदीरा गांधी सांस्क्रुतीक केंद्र, चिपळूण इथे रविवार, दिनांक १ सप्टेंबर २०२४ रोजी “अखिल भारतीय मराठा महासंघ” व “आम्ही दसपटकर” यांचे संयुक्त विद्यमानाने मराठा समाजातील शिक्षीत, होतकरु युवक, युवतीं व नवीन उद्योजकांसाठी मराठा शक्ती आणि संस्कृती - २०२४ या उद्योग सत्राचे अयोजन करण्यात येत आहे.
Click here to amazon products. |
हे उद्योग सत्र रत्नागिरी जिल्हा तसेत मुंबई, पुणे, ठाणे व इतर शहरांचे ठिकाणी वास्तव्यास असणा-या रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व तरुण, तरुणी व नव उद्योजकांना उद्योग मार्गदर्शन व जागतिक बाजारपेठे करीता व्यासपीठ उभं करण्याचे ध्येय अवसान ठेऊन, अयोजित करण्यात येत आहे. त्याच प्रमाणे शेती, पर्यटन अश्या विविध उद्योगांसाठी, शासनाच्या वतीने राबविण्यात येणा-या योजना व त्याचे स्वरुप संबधी, जानकारां कडून सटीक व योजनाबद्ध माहीती, तसेच विविध उद्योग क्षेत्रातील मान्यवरांचे त्यांचे क्षेत्रातील अनुभव व उद्योग जगतात असलेले त्यांचे योगदान, उद्योगाकरीता येणा-या अडचणी व त्याचे निवारण या संबधीत विषयांवर चर्चा व संवाद हे या सत्राचे वैशिष्ट्य असणार आहे. हे उद्योग सत्र अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. राजेंद्रजी कोंढरे यांचे मार्गदर्शन व अध्यक्षतेखाली होत असून, याची संकल्पना श्री. संतोषराव शिंदे, दसपटी यांची आहे. त्याचे निर्देशन हे अखिल भारतीय मराठा महासंघ, रत्नागिरी अध्यक्ष श्री. लक्ष्मणजी बामने, उपाध्यक्ष श्री. संतोषराव शिंदे, दसपटी व संगमेश्वर तालुका अध्यक्ष श्री. संजयजी कदम यांचे अखत्यारीत होत आहे.
मराठा शक्ती आणि संस्कृती - २०२४ या उद्योग सत्रा करीता रत्नागिरी जिल्ह्यातील मराठा समाजाच्या विविध संघटना, उद्योजक व राष्ट्रीय प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार असून, या उद्योग सत्रामुळे कोकणात शेती, पर्यटन, व्यापार, औद्योगिकता अश्या विविध उद्योगाना चालना मिळेल. तरी आपण सर्व मराठा समाज बांधवानी एकत्र येऊन या कार्यक्रमाला आपले मोलाचे योगदान द्यावे. तसेच आपली उपस्थिती दर्शवून “अखिल भारतीय मराठा महासंघ” व “आम्ही दसपटकर” यांचे संयुक्त विद्यमानाने अयोजित “मराठा शक्ती आणि संस्कृती” - २०२४ या उद्योग सत्राला यशस्वी करण्यास सहकार्य करावे, असे आव्हान अयोजकांद्वारा मराठा समाजातील तरुण, तरुणी, नवीन उद्योजकांना करण्यात येत आहे. डिजीयुगंधरा प्रतिनिधी द्वारा.
Click here to amazon 70% off products. |
If you have any query, please let me know.