माजी सैनिक/विधवा यांनी हयातीचे दाखले वर्षातून दोन वेळा जमा करावेत

डिजीयुगंधरा (DgYugandhara)
0

 

दुसरे महायुद्ध आणि भारत

रत्नागिरी, दि. २८ जुन २०२४ (प्रतिनिधी डिजीयुगंधरा DgYugandhara) : दुसऱ्या महायुद्धाचे अनुदान घेत असलेल्या जिल्ह्यातील माजी सैनिक/विधवा यांनी त्यांचे हयातीचे दाखले वर्षातून दोन वेळा माहे जून २०२४ व डिसेंबर २०२४ पुर्वी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे जमा करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

            दुसऱ्या महायुद्धाचे अनुदान घेत असलेल्या लाभार्थ्यांनी आपले हयात असल्याचे व दाखल्यावर आपला एक फोटो लावून दाखले ग्रामसेवक/नगरसेवक अथवा बँकेकडून स्वाक्षरी घेवून सोबत या कार्यालयाने दिलेल्या ओळखपत्राची प्रत, आधारकार्ड, बँकेच्या पासबुकच्या पहिल्या व शेवटच्या पानाची छायांकीत प्रत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात जमा करावी.

            जे लाभार्थी मयत झालेले आहेत, त्यांचे मृत्यूचे दाखले त्यांच्या वारसदारांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात जमा करावे जेणेकरुन त्यांचे पुढील अनुदान कायमस्वरुपी बंद करण्यात येईल तसेच 10 हजार रूपयाची अंत्यविधी मदत देण्यात येईल याची नोंद घ्यावी. लाभार्थ्यांना कुठल्याही प्रकारची अडचण आल्यास त्यांनी कार्यालय दूरध्वनी क्र. ०२३५२-२२२२७१ वर संपर्क करुन आपल्या शंकेचे निराकरण करावे.

            हयातीचे दाखले माहे जून, २०२४ व डिसेंबर २०२४ पुर्वी जमा न केल्यास अशा लाभार्थींचे बंद अनुदान करण्यात येईल. हयातीचे दाखले वेळेत कार्यालयात प्राप्त न झाल्यास अनुदान बंद करण्यात येईल, याची नोंद घेण्यात यावी.

Post a Comment

0Comments

If you have any query, please let me know.

Post a Comment (0)