राज्याच्या एकूण खर्चासाठी ६ लाख १२ हजार २९३ कोटी रुपयांची तरतूद असलेला अतिरिक्त अर्थसंकल्प अधिवेशनात सादर, Maharashtra Budget 2024-25

डिजीयुगंधरा (DgYugandhara)

मुख्यसंपादक डिजीयुगंधरा विश्लेषण Maharashtra budget 2024-25,२८ जुन २०२४ः राज्याच्या एकूण खर्चासाठी ६ लाख १२ हजार २९३ कोटी रुपयांची तरतूद असलेला अतिरिक्त अर्थसंकल्पात घोषीत केलेले ठळक मुद्दे आज अधिवेशनात सादर.

सुरुवात वारकरी बांधवांपासून...

  • पंढरपूरच्या वारीचा  जागतिक वारसा नामांकनासाठी युनेस्कोकडे प्रस्ताव पाठवून, पंढरपूरच्या वारीला जाणाऱ्या मुख्य पालख्यातील दिंडींना प्रति दिंडी २० हजार रूपये, ‘निर्मल वारी’ साठी ३६ कोटी ७१  लाख रुपयांचा निधी देण्यात येणार.
  • मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या माध्यमातून देहू-आळंदी ते पंढरपूर या दोन्ही मुख्य पालखी  मार्गावरील  सर्व वारकऱ्यांची आरोग्य तपासणी,  मोफत औषधोपचार.

  • महाराष्ट्राची गौरवशाली आध्यात्मिक, सांस्कृतिक परंपरा असलेल्या वारकरी बांधवांसाठी ‘मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ’ घोषित.

  • पंढरपूर वारीचे जागतिक नामांकनासाठी युनेस्कोकडे प्रस्ताव पाठवण्याची घोषणा.

  • वारीतल्या मुख्य पालख्यांतील दिंड्यांना प्रतिदिंडी २० हजार रुपयांचे अर्थसाह्य.

  •  निर्मल वारी’साठी ३६  कोटींचा निधी. Maharashtra budget 2024-25,

  • २१ ते ६० वयोगटातील पात्र महिलांना प्रत्येकी दरमहा दीड हजार रुपये देणारी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना.

  • महिलांना रिक्षा व्यवसायासाठी आर्थिक मदत देणारी ‘पिंक ई-रिक्षा’ योजना.

  • ५२ लाख कुटुंबांना वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत देणारी ‘मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना.

  • महिला लघुउद्योजकांसाठी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी स्टार्टअप योजना.

  • लघुउद्योजक महिलांना १५  लाख कर्जापर्यंतच्या व्याजाचा परतावा योजना

  • ओबीसी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना चालू वर्षापासून अभियांत्रिकी, वस्तुशास्त्र, फार्मसी, मेडीकल, शेतीविषयक सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी शैक्षणिक आणि परीक्षा शुल्काची संपूर्ण प्रतिपूर्ती

  • राज्यातील दहा लाख युवकांना प्रत्यक्ष कामावर प्रशिक्षण आणि दरमहा दहा हजार रुपयांपर्यंत विद्यावेतन देणाऱ्या ‘मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजने’ची घोषणा

  • मुख्यमंत्री बळीराजा सवलत योजनें अंतर्गत राज्यातील ४४ लाख शेतकऱ्यांना मोफत वीजपुरवठा, दुधउत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर पाच रुपये अनुदान

  • अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना विदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती

  • नवी मुंबईत महापे येथे 'जेम्स अँन्ड ज्वेलरी पार्कची' निर्मिती

  • सिंधुदुर्ग येथे ६६ कोटींच्या आंतरराष्ट्रीय पाणबुडी केंद्राची तसेच स्कुबा डायव्हिंग केंद्राची निर्मिती

  • बारी समाजासाठी ‘संत श्री रुपलाल महाराज आर्थिक विकास महामंडळा’ची स्थापना.

  • स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर दरवर्षी शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन

राज्यात येणा-या विधानसभा निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचा अभिमान, स्वाभिमान उंचावणाऱ्या अनेक निर्णयांचा अर्थसंकल्पात समावेश केला असल्याचं कळत. तसेच शेतकरी, कष्टकरी, विद्यार्थी, युवक, महिला, मागासवर्गीय, आदिवासी, अल्पसंख्याक अशा सर्व घटकांना न्याय, शेती, उद्योग, शिक्षण, व्यापार, आरोग्य, पर्यटन अशा विविध क्षेत्रांच्या विकासाला बळ देणारा वर्ष २०२४ - २५ चा अतिरिक्त अर्थसंकल्प विधीमंडळात सादर झाला. थोडक्यात केलेल्या चुकांच परिमार्जन करण्याचा हा प्रयत्न असला, तरी तो गरजेचा होता. Maharashtra budget 2024-25,


निष्कर्षः Maharashtra budget 2024-25,


एकूण खर्चासाठी ६ लाख १२ हजार २९३  कोटी.


सन २०२४ - २५ मध्ये जिल्हा वार्षिक योजना १८  हजार १६५  कोटी रुपयांचा नियतव्यय. वार्षिक योजना २०२४ - २५ मध्ये कार्यक्रम खर्चासाठी एक लाख ९२  हजार कोटी रुपये, अनुसूचित जाती उपयोजनेकरीता १५  हजार ८९३ कोटी रुपये, आदिवासी विकास उपयोजनेकरीता १५ हजार ३६० कोटी रुपये नियतव्यय, सन २०२४ - २५ मध्ये एकूण खर्चासाठी ६ लाख १२ हजार २९३  कोटी रुपयांची तरतूद, महसूली जमा ४ लाख ९९ हजार ४६३ कोटी रुपये,महसुली खर्च ५ लाख १९  हजार ५१४ कोटी रुपये, महसुली तूट २० हजार ५१ कोटी रुपये, राजकोषीय तूट १ लाख १० हजार ३५५ कोटी रुपये.