भाजपा कोकण विकास आघाडी चे चिपळूण संपर्क प्रमुख व अखिल भारतीय मराठा महासंघ रत्नागिरी उपाध्यक्ष, दसपटीचे श्री. संतोषराव शिंदे (Konkan Graduate Election 2024) कोकण पदवीधर निवडणुकीच्या रिंगणात..

डिजीयुगंधरा (DgYugandhara)

 

 

श्री. संतोषराव शिंदे

 ३ जुन २०२४, डिजीयुगंधरा प्रतिनिधी द्वाराः भाजपा कोकण विकास आघाडी चे चिपळूण संपर्क प्रमुख व अखिल भारतीय मराठा महासंघ रत्नागिरी उपाध्यक्ष, दसपटीचे श्री. संतोषराव शिंदे (Konkan Graduate Election 2024) कोकण पदवीधर निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून, श्री. संतोषराव शिंदे हे भाजपाचे चिपळूण तालुक्यातील सक्रीय कार्यकर्ते असून, कोकण विकास आघाडीच्या माध्यमातून चिपळूण संपर्क प्रमुख म्हणून भाजपा पक्ष वाढीसाठी त्यांच मोठ योगदान असल्याचं कळत. त्यांनी चिपळूण दसपटी व शेजारील गावांमधील विभागात सामाजिक बांधीलकीचे कार्य केलं असून, त्याचप्रमाणे   भ्रष्टाचार मुक्त चिपळूण साठी, कामगारांच्या व भुमिपुत्रांच्या न्यायहक्कासाठी लढा ते देत आहेत. अवैध जंगलतोड, बेकायदेशीर जमिन खरेदी विक्री व्यवहार, प्रशासकीय व्यवस्थेतील भ्रष्टाचार, शैक्षणिक क्षेत्रातील भ्रष्टाचार अश्या अनेक मुद्यांवर ते कार्य करीत आहेत. व विभागातील जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांचे प्रयत्न चालू आहेत  


३ जुन २०२४, डिजीयुगंधरा प्रतिनिधी द्वाराः श्री. संतोषराव शिंदे, यांनी मुंबई विद्यापीठातून वाणिज्य शाखेमध्ये पदवी घेतली. त्यानंतर मराठी साहित्य तसेच कायदे विषयक अभ्यासात रुची ठेवत,  मेट्रोपोलीटन मँजिस्ट्रेट कोर्ट, अंधेरी, येथे अपराधीक तसेच कौटुंबिक विषयातील प्रकरणांचा स्वतंत्रपणे  सराव केला. तदनंतर  भारतीय दर्शन (Master Sp. In Indian Philosophy ) मधून पदव्युत्तर  पदवी संपादन करून  शिक्षण मिळविले.  त्याचप्रमाणे फिटनेस मँनेजमेंट, कॉम्प्युटर प्रोग्रामिंग यामध्ये डिप्लोमा मिळविला असून,  संतोषराव शिंदे यांनी मुंबई   विद्यापीठातून ‘Yoga SpecialisationFilm Philosophy अश्या अतिरिक्त विषयातून पदव्युत्तर पदवी मिळविली आहे. भारतीय दर्शनावर (Indian Philosophy)  आधारित ‘भारतीय न्याय संहिता’‘भारतीय नागरिक सुरक्षा संहिता’ या विषयात त्यांचा गाढा अभ्यास चालू आहे आणि समाजात घडणा-या गुन्हेगारी मानसिकतेवर ते आपले संशोधन व लिखान करीत आहेत.


सामाजिक योगदानः श्री.  संतोषराव पां.  शिंदे, हे गेली बावीस वर्ष कला-क्रीडा क्षेत्रातून सामाजिक क्षेत्रात अविरत कार्यरत आहेत.  युवांसाठी व्यायाम शाळा चालू करून,  त्यांना पोलीस, सैन्य भरतीसाठी व्यायामाचे पाठ देणे.  त्याचप्रमाणे शरिरसौष्ठव्य  क्षेत्रातून तरुणांना व्यायामासाठी प्रवृत्त करत,  त्यांना व्यायाम व स्वतःचे आरोग्य सांभाळण्यासाठी व्यायामासंबंधी जाग्रुकता आणन्याचं काम त्यानी केलं व आज देखील करीत आहेत.  तरुणांना   व्यायामाची आवड निर्माण होण्यासाठी   शरीरसौष्ठव्य स्पर्धा, योग शिबिर, मँँरेथाँन स्पर्धा अश्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करून, त्यामधून आरोग्य व व्यायाम यांचे महत्त्व समजावून सांगणे. त्याचप्रमाणे वैद्यकीय शिबिर यांचे आयोजन करून, गरजूना वैद्यकीय सेवा पुरवणे. इत्यादी प्रकारच्या कार्यक्रमात जातीने लक्ष देत, समाज कार्यामधील उपक्रमासठी स्वतःला  झोकून दिलं आहे. अश्या प्रकारे  कार्य करण्याची पद्धत, त्यांच्या आक्रमक व भ्रष्टाचार विरोधी धोरणांमुळे  त्यांना समाजात मान सन्मान मिळत असून, बहुजन समाजाच्या विवीध स्तरावर त्यांची मजबूत पकड आहे.


क्रिडाक्षेत्रात देखील  श्री. संतोषराव शिंदे यांनी कार्य केले असून, व्यायामाची आवड असल्याकारणाने शरीर सौष्ठव्य व मैदानी खेळात तरुणांना प्रोत्साहीत करण्यासाठी त्यांनी सदैव प्रयत्न केले.  स्वतः शरिरसौष्ठव्य या खेळामध्ये    राज्य व राष्ट्रीय स्तरावर स्पर्धा खेळून,  अनेक स्पर्धेमध्ये पारितोषिक मिळवली.  इंडियन बॉडी बिल्डिंग फेडरेशनचे  (IBBF) वतीने राज्य व राष्ट्रीय पंच म्हणून कामगिरी पार पाडली.  इंडियन बाँडी बिल्डींग फेडरेशन (IBBF) यांचे वतीने   आंतरराष्ट्रीय स्तरावर आयोजित स्पर्धा तसेच विवीध कार्यक्रमांचे  व्यवस्थापकिय समितीवर जबाबदारी स्विकारून, जिल्हा, राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेंचे यशस्वी अयोजन केले.    २०१५  मध्ये आयोजित झालेल्या “मिस्टर युनिव्हर्स” - २०१५ या आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे कार्यकारणी समितीवर  काम करत, जगातील ४८ देशांनी सहभाग घेतलेल्या या  स्पर्धेचे यजमान पद भारताकडे मिळवून, त्या स्पर्धेचे  यशस्वी अयोजन पार पाडण्यात संस्थेला महत्वाचे योगदान दिले व भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर शरिरसौष्ठव्य क्षेत्रात ख्याती मिळाली, हे करत असताना जगातील अनेक नामी शरीरसौष्ठव्य  खेळाडुंसोबत काम करण्याची संधी व अनुभव त्यांना मिळाला.  त्याकरीता इंडीयन बाँडीबिल्डींग फेडरेशन (IBBF)मुंबई बॉडी बिल्डिंग असोसिएशन (MBBA) वतीने त्यांच्या कार्याची दखल घेत उत्क्रुष्ट व्यवस्थापन व चांगल्या  कामगिरी साठी त्यांना  सन्मानित करण्यात आले.


निपक्ष पत्रकारिताः देशातील नागरीकांच्या न्याय हक्कासाठी, भ्रष्टाचार मुक्त व्यवस्थेसाठी, महिला व बाल संरक्षण व सक्षमीकरणासाठी, शिक्षण, आरोग्य, कला क्रिडा इ. क्षेत्रातील पारदर्शकता अबाधीत राखून, सक्षम, सम्रुद्ध व सामर्थ्यवान भारत उभा करण्याच्या उद्दिष्टांना सार्थ करण्साठी, निपक्ष पत्रकारीता चे कवच त्यांनी  परिधान केलं असून, सध्या ते “महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ”, मुंबई चे कार्यकारीणी सदस्य म्हणून जबाबदारी बघत आहेत. “डिजीयुगंधरा” या न्युज पोर्टलचे मुख्यसंपादक म्हणून देखील कार्य करीत आहे.


भविष्यातील ध्येयः कोकण विभागाचा सर्वांगीन विकास साधून, विभागाला  राज्याच्या व देशाच्या विकासाच्या स्त्रोताला जोडणे, कोकण विभागाचा सर्वांगीण विकास हे अंतिम ध्येय साधने हेतू.


    त्यासाठी येथील भूमिपुत्र, कामगार, शेतकरी, शिक्षीत, उच्च शिक्षीत यांचे न्याय हक्कासाठी लढा चालू आहे. कोकणातील  जनतेच्या  विकासासाठी ऑरगॅनिक शेती, ऍग्रो टुरिझम, लघुउद्योग इत्यादी सारख्या उपक्रमांविषयी जनजागृती करून, शिक्षीत तरुणांना उद्योगासाठी प्रोत्साहित करण्यात तालुक्याच्या व कोकण विभागाच्या विकासाचे ध्येय पूर्णत्वास नेण्यासाठी येथील समस्त पदवीधराना आपण विश्वस्त करीत असल्याचे ते म्हणाले. काँर्पोरेट सेक्टरला विभागातील विविध क्षेत्रात उद्योगासाठी संधी उपलब्ध करणे गरजेचे असून, ग्रामीण विभागाला सहकारातून औद्योगिकतेशी जोडत “सबका साथ..! सबका विकास”..!  या पंतप्रधान महोदयांच्या संकल्पनेतून साकार होत असलेल्या घोषणेला प्रत्यक्षात उतरविण्याचे लक्ष ठेऊन, ते पुर्णत्वास आणन्याचे  अक्षम्य प्रयत्न माझे कडून   सतत  होत राहतील आणि  त्यासाठीच पुढील जिवन समर्पित आहे. असे त्यांनी “डिजीयुगंधरा” दिलेल्या मुलाखतीय कळविले.


यासंबधात मी माझे प्रोफाइल पक्ष श्रेष्ठींना पाठवले असून, त्यांचे सहकार्य माझ्या सारख्या उच्च शिक्षीत, कायद्याचे अभ्यासक,  “भारतीय दर्शन” मध्ये पदव्युत्तर पदवी घेतलेल्या व समाजातील प्रत्येक घटकाशी जोडलेल्या जमीनी कार्यकरत्याला  लाभेल अशी मला खात्री वाटते. असे देखील त्यांनी पत्रकारांशी बोलताना कळविले. ३ जुन २०२४, डिजीयुगंधरा प्रतिनिधी द्वारा प्रकाशित. (Konkan Graduate Election 2024)

































Tags: