रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा निवडणूक २०२४ - सुरळीतपणे पार पडली.

डिजीयुगंधरा (DgYugandhara)


लोकसभा निवडणूक २०२४

 डिजीयुगंधरा प्रतिनिधी चिपळूण : ४६  वी लोकसभा निवडणूक आज दिनांक ७ मे २०२४ रोजी सुरळीतपणे पार पडली. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघासाठी आज सर्वत्र शांततेत आणि सुरळीत मतदान झाल्याचे कळते. अंदाजे ६५% टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून, सायंकाळी ५ वाजेपर्यंत  ४ लाख ८ हजार ७४५  इतक्या पुरुष तर ३ लाख ९८ हजार ८१६ इतक्या महिला अशा एकूण ८ लक्ष ७ हजार ५६२ इतक्या मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. मतदार संघात मतदानावेळी कुठेही अनुचित प्रकार झाला नसल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिली.


जिल्हा प्रशासनाच्या तसेच विवीध पक्षांच्या  आवाहनाला प्रतिसाद देत मतदारांनी विविध ठिकाणी आज अगदी सकाळपासूनच मतदान करण्यासाठी रांगा लावल्या होत्या. प्रशासनाने उन्हाची तिव्रता लक्षात घेऊन  मंडप, पाणी, दिव्यांगांसाठी रॅम्प आदींची सुविधा केली होती. त्यामुळे मतदाररांनी उत्स्फूर्तपणे बाहेर पडून आपला मतदानाचा हक्क बजावला असल्याचे कळते. आज सांयकाळी ५ वाजेपर्यंत झालेल्या मतदानामध्ये २६५ चिपळूण - ६९ हजार ७८३ पुरुष, ७२ हजार १७५ महिला असे एकूण १ लाख ४१ हजार ९५८,  ५२.६२% २६६ रत्नागिरी – ८० हजार ७०२ पुरुष, ८२ हजार २२४ महिला, इतर १  असे एकूण १ लक्ष ६२ हजार ९२७,  ५७.४६%,  २६७ राजापूर – ५३ हजार ९७१ पुरुष, ५६ हजार ६०४ महिला असे एकूण १ लक्ष १० हजार  ५७५,  ४७.३१%, २६८ कणकवली – ६४ हजार ७८९ पुरुष, ६० हजार ७८३ महिला असे एकूण १ लाख २५ हजार ५६२, ५५.१४%.


              

            कुडाळ – ६७ हजार ६३३ पुरुष, ६१ हजार ८१७ महिला असे एकूण १ लाख २९ हजार ५५०, ६६.९९ %, २७० सावंतवाडी  – ७१ हजार ८६७ पुरुष, 6५ हजार २१३ महिला असे  एकूण १ लाख ३७  हजार ८०,  ६१.०७%,.



लोकसभा मतदार संघातील एकूण १४ लाख  हजार ६३० मतदारांपैकी ८ लाख ७ हजार ५६७ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क सायंकाळी ५ वाजेपर्यंत बजावला. ही एकूण टक्केवारी ५५.६५% असावी.  



प्रशासन व विविध पक्षांच्या संगनमताने सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा २०२४ ही निवडणूक उत्सफुर्त व सुरळीतपणे पार पडली. जनतेचा कौल कोणत्या उमेदवारास जातो हे मत मोजणी झाल्यावरच माहीती होईल. डिजीयुगंधरा प्रतिनिधी द्वारा प्रस्तुत, लोकसभा निवडणूक २०२४.