शिमग्याचा गुलाल संपवून, निवडणुकीचा गुलाल उधळायला आत्मारामांची गर्दी..! निवडणूक पर्व - १

डिजीयुगंधरा (DgYugandhara)

 

गुलाल निवडणुकीचा..

DgYugandhara    डिजीयुगंधरा प्रतिनिधी निवडणूक पर्व विश्लेषणः  देशभर येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकांमुळे राजकिय बाजार सध्या गरम आहे. निवडणुकीसाठी इच्छुक असलेले हावशे-नवशे उमेदवारी मिळविण्यासाठी विविध पक्षांच्या दालणात गुडघ्याला बाशींग बांधुन उभे आहेत. तर दुसरीकडे सामान्यांमध्ये आपले वोट जगन्नाथ समजून, चिरीमिरीसाठी  गरम तव्यावर आपली पोळी शेकवण्यासठी कतार मध्ये उभे आहेत, तर काही मी पहीला आलोय म्हणून मला पहिला मोका, असे अत्रुप्त आत्मे देखिल जे टक लावून उमेद्वार निश्चित व्हावा म्हणून वाट बघत बसले होते, त्यांचा प्रवास  आता साहेबाच्या बंगल्या वर   चालू, इथे सभा लावुया, एवढ्या गाड्या आणतो, माझे तेवढे लोक आहेत,  एवढी मत निश्चित आहेत. फलाना फलाना..! निवडणुकीचा गुलाल उधळला आणि इथे अत्रुप्त आत्मारामांची, नेत्याने उधळलेला गुलालाची एक चुटकी क्वचीत आपल्या कपाळाला लागावी आणि त्या दिवशी बंद लिफाफ्यातील हिरवी एकादी तरी पत्ती आपल्या फाटक्या खिश्यात पढावी म्हणून या आत्मारामांची चाललेली जद्दोजहेद, ती रंगवलेलली नाही परंतु सत्य घटना आपल्या नेहमीच, म्हणजे प्रत्येक इलेक्शनला ऐकवात येतात. 


शिमग्याचा गुलाल उधळण़ संपतोय ना संपतोय तो आता निवडणुकींचा गुलाल उधळायला सुरवात देखील झाली. कोकणातील रत्नागिरी सिंधुदुर्ग इथे उधळणारा निवडणुकीचा गुलाल हा काहीसा अस्साच आहे. ना. श्रीमान नारायणराव राणे यांची उमेदवारी इथे निश्चित होणार, हि पुसटशी बातमी वा-यावर पसरली आणि  साहेबांच्या भेटीला या  आत्मारामांच्या गाड्या धावायला सुरुवात देखील झाल्या. रत्नागिरीतील रत्नागिरी, राजापुर, लांजा, अश्या ठिकाणी राणे साहबांचे समर्थक जोरात असले तरी, चिपळुण, गुहागर, खेड, संगमेश्वर दापोली या ठिकाणी विरोधक काहीशे जोमात आहेत. त्यात युतीमध्ये असलेली स्वकीयांची नाराजगी आणि पक्षांतर्गत आत्मारामांची वळवळ, हे सगळं काही साफ दिसत असलं तरी सोप नाही. 


मोदी लाटेमुळे कदाचित सर्व काही अलबेल होत आहे असं वाटलं तरी, पक्षातील आत्मारामांचे बुडबुडे  हे भाजपा उमेदवार व पक्ष श्रेष्ठींनां अवगत असलं,   तरी ही काहीशी तारेवरची कसरतच आहे. कारण हे बुडबुडेच म्रुगजाळ उभं करतात आणि त्यात एकादा अडकला की तो पार बुडाल्याशिवाय त्याचा थांगपत्ताच लागत नाही कारण तोवर त्या म्रुगजाळात सावट फसलेलं असतं.


अशी काहीशी परीस्थिती रत्नागिरी जिल्ह्यात दिसते. चिपळुण संगमेश्वर विधानसभेत तरी सध्या तशीच परिस्थिती आहे. सामान्य मतदार हा महाराष्ट्रात घडलेल्या न भुतो न भविष्यती परिस्थिती मुळे काहीसा संभ्रमात असला तरी त्या विभागातील कारभा-यांची पकड त्यांच्यावर मजबुत आहे. परंतु बहुतांश कारभारी हे आजदेखील  शिवसेनेचे (उबाठा) पदाधिकारी आहेत किंवा ते घडलेल्या परिवर्तनाला मान्य करावयास तयार नाहीत. अश्यात अत्रुप्त आत्मारांमांचे बुडबुडे मात्र   आपल्या नळ्या फेसाने भरून पिचका-या मारण्यासाठी सज्ज झाल्या आहेत आणि अश्या वेळी जर आपला उमेदवार जिंकुन आणावयाचा असल्यास या सगळ्याना हेरून, मोदी लाटेचा योग्य व मुद्सद्देगिरीने उपयोग करून घेणं, प्रदेशातील जेष्ठानी, जिल्हा तसेच तालुका स्तरावर जास्त विश्वास न ठेवता, सो काँल्ड प्रोटोकॉल च्या पलिकडे जाऊन या लोकसभा निवडणुकीत रणनीती आखली, तरच येणा-या निवडणुकीचा गुलाल विजयात परिवर्तीत होईल. DgYugandhara    डिजीयुगंधरा प्रतिनिधी निवडणूक पर्व विश्लेषणः 


आज मोदी लाट काही प्रमाणात असली तरी काही विधानसभा क्षेत्रांत आज देखील कारभा-यांचा बोलबालाच आहे. कारभारी बोलतील तिथे मतदान, चिपळूण विधानसभेतील दसपटी हा विभाग त्याच प्रथेतला. पुर्वी पासुन येथील ग्रामीण भाग हा कारभा-यांच्याच एकसत्ता हातात. आता थोडा बदल झाला, तो म्हणजे प्रत्येक समाजाचा पुढारी परंतु आज देखिल काहीसा मराठा आणि कुणबी समाज आपल्या गुटाचं राजकारण करीत आहेत. ज्या पक्षाचे या कारभा-यांशी सलोखे, त्याचा विजय निश्चितच. DgYugandhara    डिजीयुगंधरा प्रतिनिधी निवडणूक पर्व विश्लेषणः