श्री. संतोषराव शिंदे रेखांकीत दसपटकर घराण्याची ध्वजमुद्रा प्रतिक्रुती प्रकाशन सोहळा चिपळुणात श्री रमेशरावभाई व कुडाळकर शिंदे बंधू यांचे हस्ते पार पडला. हि ध्वज मुद्रा दसपटकरांच्या, सम्रुद्धि, सपन्नता, ऐश्वर्य व एकतेचं प्रतिक.

डिजीयुगंधरा (DgYugandhara)


श्री. संतोषराव शिंदे प्रकाशन सोहळ्याला संबोधित करताना

डिजीयुगंधरा DgYugandhara चिपळूण प्रतिनिधी  प्रकाशित: श्री. संतोषराव शिंदे शिंदे  रेखांकीत दसपटकर घराण्याच्या सम्रुद्धीच़ं प्रतिक असलेल्या ध्वज मुद्रा प्रतिक्रुतीचे प्रकाशन माजी आमदार व दसपटीचे सुपुत्र श्री. रमेशभाई कदम व दसपटकरांच्या स्नेह भेट तसेच कुलस्वामिनी श्री. रामवरदायिनी  दर्शनाचे औचित्य साधून आलेले कुडाळकर  बंधू श्री. मालोजीराव ना. शिंदे, श्री. उदयनसिंह वि. शिंदे  यांचे हस्ते रविवार दिनांक १४ एप्रिल २०२४ रोजी हाँटेल मिरा रेजंसी येथे दिमागात संपन्न झाले. हा सोहळा साता-याचे  कुडाळकर शिंदे देशमुख व दसपटकर शिंदे, कदम यांचे स्नेह भेटीचे औचित्य साधून साकारण्यात आला. यावेळी कुडाळ मधून श्री. उदयसिंह विठ्ठलराव शिंदे ( बापु), श्री मालोजीराव नारायणराव शिंदे ( आण्णा), श्री अमृतराव विठ्ठलराव शिंदे ( आण्णा), श्री शामराव गुलाबराव शिंदे, श्री विरेंद्र सुरेशराव  शिंदे ( माजी सरपंच कुडाळ), श्री. महेंद्रसिंह दत्ताजीराव शिंदे, श्री विरेंद्र विठ्ठलराव शिंदे , श्री. श्रीनिवास शिंदे, श्री अमोल शिंदे, श्री वैभव शिंदे, चि. इंद्रजित शिंदे, चि. मयुर शिंदे, चि. प्रसाद शिंदे , चि. कर्णसिंह शिंदे हे मान्यवर उपस्थित होते तर दसपटी मधून श्री. शंकरराव शिंदे, श्री चंद्रकांतराव शिंदे, श्री.  मोहनराव शिंदे, श्री. संभाजीराव शिंदे, श्री. आर. सी. शिंदे, श्री.     सदानंदराव शिंदे, श्री. हरीचंद्रराव शिंदे, श्री. सत्यवानराव शिंदे, श्री. दीलीपराव शिंदे, श्री. संजयराव शिंदे, श्री. राजेंद्रराव शिंदे, व श्री. संदिपराव शिंदे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. हा सोहळा मोठ्या दिमागात पार पडला असून, दसपटकरांची ही ध्वज मुद्रा म्हणजे, त्यांच्या सम्रुद्धीच़, संपन्नतेचं आणि ऐश्वर्यवान कुळाच प्रतिक असल्याचं श्री. संतोषराव शिंदे यांनी आपल्या संबोधनातून सांगितले, तर या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री. रमेशरावभाई कदम यांनी दसपटीच्या राजकीय विषेशतेचा संदर्भ देत, दसपटकरांच्या  त्यावेळच्या एकसंघाचा दाखला देत सगळ्यांनी संघटीत राहुन कार्य करणे ही आजची गरज असल्याचे सांगितले. तर श्री. चंद्रकांतराव शिंदे यांनी उद्योगिक, सामाजिक आणि राजकीय व्यवस्थेला संयुक्तिक पणे अवलंबून, दसपटीच्या विकासासाठी पक्षीय धोरणा पलिकडे जाऊन संघटीत होऊन कार्य कराव व परिवर्तनाने आता विकास साध्य करता येईल, असे त्यांच्या संबोधनात त्यांनी सागितले. या सर्व कार्यक्रमाचे संचालन श्रीं. शंकरराव शिंदे यांनी केलं असून श्री. मोहनराव शिंदे, श्री. संभाजीराव शिंदे, श्री. आर.  सी. शिंदे, श्री. सत्यवानराव शिंदे यांनी या सोहळ्याला मार्गदर्शन केल. तर श्री. दिलीपराव शिंदे, श्री. सदानंदराव शिंदे, श्री. संजयराव शिंदे, श्री. संदिपराव शिंदे यानी या सोहळ्याचे व्यवस्थापन केले व श्री. राजेद्रराव शिंदे यांनी फोटोग्राफी केली.


  या चैतन्यमय सोहळ्याच्या निमित्ताने “आम्ही दसपटकर” वतीने एका नव्या अध्यायाची सुरुवात कुडाळकर शिंदे परिवाराच्या साक्षीने झाली असून, त्यांच्या सहकाराच्या चळवळीला आपण स्विकारत असून, संघटीत होऊन यापुढे महाराष्ट्रातील सर्वात मोठा परिवार म्हणून सहकार उद्योग, सामाजिक  क्षेत्रात एकत्रित उभं राहावं, राजकीय व्यवस्थेत यापुढे पक्ष म्हणून वेगवेगळे न राहता, समाज म्हणून सक्रीय राहून दसपटीतील प्रत्येक घटकाचा विकास हेतूने कार्य करण्याचे निष्कर्षीत झाले. डिजीयुगंधरा DgYugandhara चिपळूण प्रतिनिधी  प्रकाशित:

दसपटकर घराण्याची ध्वज मुद्रा