शिदे परिवार स्नेह भेट आणि दसपटकर घरण्याची ध्वजमुद्रा प्रतिक्रुती प्रकाशन सोहळा.

डिजीयुगंधरा (DgYugandhara)
0

 

श्री. संतोषराव पां. शिंदे रेखांकीत दसपटकर ध्वज मुद्रा प्रतिक्रुतीचा प्रकाशन सोहळा.

कुलस्वामिनी श्रीरामवरदायिनी च्या आशिर्वादाने आणि क्रुपेने   विजयश्रुत केलेली आणि ज्यांच्या पराक्रमानं, पुरषार्थाने, पुण्याईनी पावन झालेली, पुण्यश्लोक पुर्वजांची, आदिप्रवर्तकाची भुमी म्हणजे दसपटी. कुंभार्ली ते दाभोळ हा ११७ गावांचा सुभा आजचा आधिकांश चिपळूण व गुहागर दापोलीचा काही प्रदेश होय. त्यात २८ गावचं मुळ वतन स्वतःसाठी व स्वतःच्या पाहुणे राहुणे, मुलांसाठी राखुन इतर सर्व प्रदेश १०% कर घेऊन प्रशासकीय आधिकार स्वतःकडे राखुन कार्यभार संभाळणारं श्रीमंत दसपटकर शिंदे सरकार, हि आमच्या महान पुर्वजांची ओळख तशी इतिहासात लुप्तच राहीली, ती चाटुगार इतिहासकार व काही अस्तनीतील निखा-यांमुळेच. छत्रपतिंच्या अगोदर शंभर वर्षे जवळ जवळ एक शतक,  इ.स. १५५२ ते इ.स. १६५० या काळात, कुंभार्ली- दाभोळ या सुभ्यातून बारभाई कोळ्याचं समुळ उच्छाटन करून, शिंदे, कदमांनी दाभोळ विजयश्री संपादन केली. पुढे शिद्यांनी आदीलशहीशी बगलबाजी (Diplomacy) ने तो प्रदेश स्वतःच्या अधिपत्याखाली आणला आणि केवळ भुमी नाही तर सागरावर देखील आपली सत्ता प्रस्थापित केली. परकीय आक्रमणं परतवून, ज्यांनी बाहुबलाच्या जोरावर सत्ता एकछत्री राखली ती भुमी म्हणजे दसपटी. दाभोळ हे त्याकाळाचं आंतरराष्ट्रीय बंदर, समुद्री चाचे आणि परकीय आक्रांतांच्या हल्ले आणि घुसखोरीपासून सुरक्षित ठेवत, परकीय आक्रमण परतवून लावणा-या  दुस-या पिढीतील नागोजीरावांची ती भुमी म्हणजे दसपटी. 

श्री. संतोषराव पां. शिंदे दसपटर ध्वज मुद्रेचं महत्व सागताना. ही  ध्वज मुद्रा आपल्या सम्रुद्धीच़ प्रतिक म्हणून प्रत्येक घरात यावी.

खरं पाहता कल्पनेने किंवा अंज्ञानाने अधोरेखीत केलेले आपल्या पुर्वजाचे  चारित्र्य बाजूला सारून, त्या पुण्यश्लोकांची खरीखुरी प्रतिमा धिटाईने लोकांपुढे मांडणे म्हणजे लोकक्षोभाला बळेच आव्हान देण्याइतकेच भयंकर काम आहे. पण ते कोणीतरी केंव्हातरी करणेच प्राप्त असल्यामुळे लोकक्षोभाची, समाजाची, भाऊबंदकीची पर्वा न बाळगता,  गांभीर्याने ते आम्ही आपल्या शिरावर घेत आहोत. आणि इतिहासाची पानं पुनः पुनः  चाळून दसपटीच्या नवीन अध्यायाचा श्रीगणेशा  रेखाटण्यांच, पुर्वजांच्या पुण्याईच स्मरण करण्यांच, पराक्रम आणि पुरषार्थ, ऐश्वर्याचं प्रतिक असलेली दसपटकरांची ध्वजमुद्रा गेली अनेक वर्षे जिर्ण अवस्थेत निद्रीस्त असताना तिचा आशय समजुन तिला नव्यांनं   डिजीटल छायाचित्रात व चांदीच्या प्रतिक्रुतीत रेखाटण्यांची शक्ति, स्फुर्ती व चेतना कुलस्वामिनी रामवरदायिनीने आम्हाला दिल्या मुळेच हे कार्य प्रत्यक्षात उतरलं आणि तिचां प्रकाशन सोहळा मोठ्या दिमागात हाँटेल मिरा रेजंसी, चिपळूण इथे रविवार, दिनांक १४ एप्रिल २०२४ रोजी,  आमचे जेष्ठ कुडाळकर शिंदे देशमुख बांधवांच्या साक्षीने पार पडलां, याला योगा योग म्हणावा की पुर्वजाचा साक्षात आशिर्वाद…! फारच सांकेतीक आहे.


आमचे जेष्ठ,  कुडाळकर शिंदे देशमुख यांच आगमन दसपटीच्या ऐतिहासिक भुमी वर झालं. कुलस्वामिनी श्रीरामवरदायिनी च्या दर्शनाने प्रफुल्लित होऊन, देवीचं महात्म व महिमा ज्ञात करत समस्त शिंदे कुडाळकर जेष्ठानी आशिर्वाद घेतला. रामवरदायिनी ट्रस्ट चे समस्त विश्वस्तानी या स्वागत संभाऱभांसाठी, बहुसंख्येने उपस्थित राहुन या स्नेह भेटीची शोभा वाढवली. रामवरदायिनी ट्रस्ट चे अध्यक्ष  श्री. प्रतापराव शिंदे यांनी  स्नेह भेटीला संबोधीत करून विश्वस्तांच्या वतीने योग्य तो आदरातिथ्य केला. “आम्ही दसपटकर” वतीने अयोजित या सोहळ्यात श्री. शंकरराव शिंदे, श्री चंद्रकांतराव शिंदे, श्री.  मोहनराव शिंदे, श्री. सभाजीराव शिंदे, श्री. आर. सी. शिंदे, श्री.     सदानंदराव शिंदे, श्री. हरीचंद्रराव शिंदे, श्री. सत्यवानराव शिंदे, श्री. दीलीपराव शिंदे, श्री. संजयराव शिंदे, श्री. राजेंद्रराव शिंदे, व श्री. संदिपराव शिंदे या “आम्ही दसपटकर”   मान्यवरांच्या श्रमाने हा सोहळा   उल्हासमय व चैतन्यमय वातावरणात पार पडला. माजी आमदार श्री. रमेशरावभाई कदम हे प्रमुख अतिथी म्हणून लाभले.  त्यांच्या व श्री. मालोजीराव शिंदे कुडाळकर, श्री. प्रतापराव शिंदे कुडाळकर यांचे हस्ते सम्रुद्धीच़ प्रतिक असलेलं, दसपटकर ध्वजमुद्रेच्या प्रतिक्रुतीच़ प्रकाशन करून मान्यवरांचा यथोचीत सन्मान सोहळा देखील हर्ष उल्हास वातावरणात पार पडला. इतिहास अभ्यासक श्री. श्रीनिवास शिंदे कुडाळकर यांनी कुळाच्या इतिहासाचं महत्व व महात्म्य समजावले तर चंद्रकांतराव शिंदे यांनी समस्त शिंदे परिवाराने एकसंघ होऊन भविष्यात करण्यात येण्यासारख्या  उद्योगिक, सामाजिक व राजकीय शक्यतेवर प्रकाष टाकला.


सुर्याच तेज, कुळाच प्रतिक, ऐश्वर्य, संपन्नता, संम्रुद्धीची साक्ष असलेली ही दसपटकर घराण्याच्या ध्वज मुद्रेचं प्रतिक्रुती माझ्या द्वारा रेखांकीत होणं, हे मी माझं भाग्य समजतो आणि हि ध्वज मुद्रा म्हणजे सम्रुद्धीच़ प्रतिक प्रत्त्येक दसपटकर तसेच शिंदे व त्यांचे पाहुणे यांचे घरा घरात पोचवूण पुर्वजाच्या मुळाशी जोडण्याचं सत्कार्य आपण प्रत्येक समाज बांधवाने केलं, तर  आपला समस्त समाज व बांधव सम्रुद्ध, सपन्न होतील असा मला विश्वास वाटतो. आपल्या सा-यांचे आभार आणि संम्रुद्धीच्या शुभेच्छा..! डिजीयुगंधरा DgYugandhara  प्रकाशित शिंदे परिवार स्नेह भेट.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

If you have any query, please let me know.

एक टिप्पणी भेजें (0)