आदिप्रवर्तक दसपटकर ते (नांदिवसे) मुंडेवाडीचे सौदागर..

डिजीयुगंधरा (DgYugandhara)
0

 


आदिप्रवर्तक दसपटकर ते मुंडेवाडीचे सौदागर.. संपादकीय विश्लेषण..






DgYugandhara डिजीयुगंधरा संपादकीय, Daspati Chiplun Land Fraud: संसाराच्या रोजच्या क्षुद्र दलदलीत सुद्धा ‘हे बरे का, ते खरे'.. 'असे करू का.. तसे करू’.. आणि कसे करू ?? काय करू ?? याचा अद्याप   ऊलगडा न झालेले आमचे  काही समाज बांधव आणि कदाचित बुद्धिभ्रष्ट झालेले आमचेच काही तथाकथित पुढारी,  आयारामांच्या लाचारीने उन्मद होऊन रक्तरंजित असलेल्या इतिहासाच्या, आपल्या प्रतापी पूर्वजांच्या पुण्याईचा सौदा करणा-या भिक्कार औलादींची मती मारली गेली असावी, जे पूर्वजांच्या भूमीचे सौदे करण्यासाठी सौदागरांना निमंत्रण देत आहेत आणि कवडी मोलानी पुर्वजाच्या पुरषार्थाने पावन झालेल्या ऐतिहासिक भुमीची बोली ७०,०००/-    ते १,५०,०००/-  लाख लावून, वरिल मलीदा बाहेरुन आलेल्या आयाराम शेठांकडून हातमिळवणी करुन, कारस्थान करून आपल्याच रक्तासोबत दगाबाजीचा सौदा करीत आहेत. यात पोटाची खडगी भरलेली असताना देखील जीभेचे अतिरिक्त चोचले  पुरविण्याची      चटक लागलेले काही  प्रशासकीय आधिकारी देखील घात घालून बसलेले आहेत. कायद्याची तमा न बाळगता बिंधास्त आपली पोळी भाजून घेताना समजते.   आपल्या बुद्धीचे तारे तोडून, दिशाभूल करण्याचा योजनाबद्ध कार्यक्रम आखून, दसपटी विभाग आपल्याला आंदन मिळाल्यासारखे, अधिकाराचा गैरवापर करत, कायद्याचे तीन तेरा वाजवत सौदागरांच्या या श्रुंखलेत मोलाचं योगदान देताना जरा सुद्धा कचरत नाही.


वडीलोपार्जीत जमीनी या अस्मिता आणि ऐतिहासिक ठेवा म्हणून जपणारी अनेक घराणी महाराष्ट्रात काय देशात आहेत आणि पदरचे पैसे घालून त्याचे जतन करीत आहेत परंतु या अनुशंगाने दसपटीच्या  तख्ताचे वारसदार समजणारे मात्र पक्षीय स्वार्थकारणात मगदुल होऊन, आपल्या ऐतिहासिक वारसाची तमा न बाळगता पक्षीय आयारामांच्या  दावनीला बांधून घेत, त्यांच्या तालावर नाचत आहेत आणि आमचा काय संबंध, ज्याच त्यान बघाव अश्या तुच्छ मानसिकतेत वावरत आहेत. पुर्वजाची अस्मिता गेली भाड मध्ये आणि समाजिक बांधीलकी आम्हाला आमच्या नेत्यांपेक्षा जवळची नसुन आयारामाच्या पाठीशीच आम्ही ठाम उभे राहणार अशी प्रतिज्ञाच यांनी घेतली  असावी. सामान्य दसपटकर शिंदे परिवार मात्र या अस्तनीतील  निखा-यांमुळे आणि आयारामांच्या भ्रष्ट करतुदी मुळे पोळुन निघतोय, याची जान देखील या दसपटीचा वारसा सांगणा-या तथाकथीत पुढा-यांना नसावी??  नाहितर या जमिनी हडपण्याच्या षडयंत्रात सामील  असलेल्या सौदागरांचं इथे  फावलं नसतं. भास्कर जाधव, सदा चव्हाण, अंनंत गीते, विनायक राऊत अश्या स्वार्थी आयारामांनी दसपटीची भुमी आपली राजकिय जहांगीर  समजून  भुमीपुत्रांमध्ये, समाजा समाजात तेड निर्माण करण्या इतपत त्यांची मजल गेलीच नसती. आणि हे सगळं कमी होतं म्हणून कि काय, त्यात भरीला नुकताच शरद पवार राष्ट्रवादी द्वारा दसपटीचं नेत्रुत्वाची माळा घालुन गुडग्याला बाशींग बाधून उभा असलेल्या कोण्या प्रशांत यादवाची भर, त्यात दसपटीचे जेष्ठ नेते रमेशराव भाईंचं मोठं योगदान असल्याचं कळालं आणि खरोखरच आमची मती मंद झल्याचा आभास झाला. छिद्र पडलेल्या जहाजातून उंदीर जसे इकडून तिकडे पळ काढतात, तसाच या प्रशांत यादवाचा काँग्रेस पर्यंतचा प्रवास, रात्रीत पक्ष बदलणारी ही आयारामांची पिलावळ दसपटी आणि उपविभागाचा विकास करण्यासाठी उतरली आहेत, की उद्योग, धंद्याच्या नावावर भुमिपुत्रांच्या न्याय, हक्कांचे चे सौदे करून स्वतःची राजकीय जमीन तयार करण्याच्या षड्यंत्राची ही सुरुवात करत, आदिप्रवर्तक दसपटकरांच्या अस्मिते वरील अतिक्रमणाचा हा अजून एक नवीन अध्याय सुरु करत आहेत ??. हे भूमिपुत्रांनी समजून घेतलं पाहिजे. त्यावेळी शिवसेनेने  आणि आता भाजपा, राष्ट्रवादी, काँग्रेस असे पक्ष भुमिपुत्रांचा वापर करत, स्वतःची पोळी भाजून घेत आहेत का? बर, इथे यांचे प्रतिनीधीत्व किंवा नेते हे बाहेरून आयात करायचे आणि भुमिपुत्रानी यांचे झेंडे पकडायचे?? हे अगदी गुप्त व योजनाबद्ध पद्धतीने यांनी राबवलं.


आमच्या तथाकथित पुढा-यांना, आजवर ही बुद्वीच झाली नाही की, महाराष्ट्रात ऐतिहासिक राजकीय योगदान असलेला हा दसपटी विभाग, (कुंभार्ली ते दाभोळ सुभा, ) आपल्या महान पुर्वजाच्या पुरषार्थाने पावन झालेला असुन, आदिप्रवर्तकाची भुमी म्हणून दसपटी हा विभाग  समजला जात़ो.   त्याची अस्मिता जपण्याचं  कांम हे जेष्ठ  समजणा-यांच प्रथम होत.  हे पक्ष तर नंतर आले आहेत, यांना इथे किती व कुठवर स्थान द्यावं आणि यांच्या लादलेल्या  नेत्यांची किती बडवेगीरी करावी, याचं भान देखील या कारभा-याना नसाव़?? आज ते एवढे उद्दाम झाले की, भुमीपुत्रांना झुंजवून, दगडं फेकायला लावून, स्वतः मात्र नेता म्हणून मिरवायचं आणि दुसरीकडे त्यांच्याच जमीनी कौडीमोलानी  खरेदी  करण्याची बोली यांच्या सौदागरांनी  लावावी ?? अश्या आयारामांच्या  मागे फीरून आपल्या सामाजिक बांधीलकीची विल्हेवाट लावण्याची चेष्टा करुन ही मंडळी गेली ६५० वर्षे खोलवर असलेली मुंळं उखडण्याची चेष्टा, आयारामांच्या बहेकाव्यात येऊन तर करीत नाहीत ?? किंवा या सा-याशी अनभिज्ञ आहेत??  परिणामतः  आज दसपटीतील सर्वच समाज, आणि भुमिपुत्र विवीध समस्सेन उत्पिडीत आहे. या नेते मंडळी व प्रशासकीय आधिक-यांच्या भ्रष्टाचाराचे बळी पडले आहेत. आणि हे घडतंय केवळ आयाराम नेत्यांचा येथील राजकिय व्यवस्थेवर झालेल्या  अतिक्रमणामुळे.


त्यामुळेच आमच्या या जमिनींचे सौदे म्हणजे पूर्वजांच्या अस्मितेचे सौदे करण्याचं धाडस या आयारांमाचं होत आहे, तर दुसरीकडे या संदर्भात कायद्याचं पुसट सुद्धा ज्ञान नसलेले शेतकरी, जमिनदार, बहुजन समाज, येथील भूमिपुत्र प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या   बेजबाबदार व बेकायदेशीर क्रुत्याला बळी पडत आहेत. हे आधिकारी त्यांंना योग्य ते मार्गदर्शन करण्याऐवजी, अगोदरच कोर्टात जाण्याचा थिल्लर सल्ला देऊन त्यांची दिशाभूल करण्याचा नियोजनबद्ध कार्यक्रम करीत आहेत. त्याचेच उदाहरण म्हणजे येथील नोंदनी विभागातील दुय्यम प्रबंधक 'सुतार' हा आधिकारी चौकशीकरीता आलेल्या भुमीपुत्राना प्रकरणाची योग्य ती चौकशी करण्याऐवजी, चुकिचे सल्ले  देऊन घडणा-या बेकायदेशीर प्रकरणांवर पडदा टाकत आहे. यासंदर्भात अश्या अधिकाऱ्यांची चौकशी करुन, आजवर या ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या दसपटीतील जमीनींचे वर्गीकरण व क्षेत्राचे विभाजन नकरता इतर हिस्सेदार व सहहीस्सेदार यांची चौकशी नकरता, कायद्याने अश्या जमीनी खरेदी करण्याचा प्रथम आधिकार हा त्यांच्या भाऊबंधकी व समाज बांधवाना असतो, अश्या अनेक बाबींची पडताळनी नकरता हे परस्पर व्यवहाराची नोंद करणा-या या 'सुतार' सारख्या आधिका-यांची व तहसीलदार सकट यात चुप्पी साधलेल्या संबंधीत आधिका-यांची, ऐतिहासिक वारसा असलेल्या जमीनींच्या या सर्व  प्रकरणात न्यायालयीन चौकशी समस्त दसपटकरांच्या वतीने केली जावी यासाठी तयारी चालु झाली आहे.


या संदर्भात एक समिती स्थापन करुन, सर्व प्रथम अश्या भ्रष्ट व बेजबाबदार आधिक-यांची चौकशी लावून, त्यांच्यावर व या जमीनीविक्रीच्या   षडयंत्रात सामील असलेल्या प्रत्येकावर गुन्हे दाखल करण्यासंदर्भात महसुल मंत्रालयाला कळविण्यात आले आहे. असे डिजीयुगंधराचे मुख्यसंपादक श्री. संतोषराव शिंदे यांनी स्पष्ट केले असुन, दसपटीतील बहुतांश भुमिपुत्रानी या क्रुत्याचा व यात सामील असलेल्या आधिकारी तसेच बिनापरवानाधारक एजंट यांचा निषेध केला आहे. अश्याप्रकारे आजवर सहहिस्सेदाराांना विश्ववासात न घेता, झालेले सर्व व्यवहार हे बेकायदेशीर असल्याने अश्या सर्व प्रकरणाची चौकशी करून महसूल मंत्रालयाला कळविले जाऊन, दोषीं विरोधात न्यायालयीन चौकशी करण्याचे निवेदन समस्त दसपटकर भूमिपुत्रां द्वारा देणार असल्याचे ते म्हणाले. त्याच प्रमाणे दसपटी विभागातील जमीनी कोणालाही बाहेरील व्यक्तीना विकु नये कारण दसपटीची ही भुमी 'आदिप्रवर्तकाची' असून त्याला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. अश्या प्रकारचे व्यवहार करुन आपली मुळ स्वतःच उखडून, येणा-या तुमच्या पुढील पिढीला नामशेष करु नका. असे आव्हान देखील त्यानी समस्त दसपटकर भुमिपुत्रांना केले आहे. या संदर्भात कोणतंही सहकार्य हव असल्यास DgYugandhara डिजीयुगंधराला संपर्क करण्याचे देखील त्यांनी सुचविले. DgYugandhara डिजीयुगंधरा संपादकीय, Daspati Chiplun Land Fraud. 

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

If you have any query, please let me know.

एक टिप्पणी भेजें (0)