चिपळूण विधानसभा आमदार शेखर निकमांच्या निषेधार्थ, दसपटी विभागात अंदोलनाचा इशारा.. (Protest against MLA Shekhar Nikam in Chiplun Legislative Assembly ?) चिपळूण विधानसभा क्षेत्र भ्रष्टचाराच्या विळख्यात..??

डिजीयुगंधरा (DgYugandhara)

 

आमदार शेखर निकम आणि चिपळूण विधानसभा क्षेत्रातील ग्रामीण व शहरात झालेली रस्त्यांची दुर्दशा..


DgYugandhara, डिजीयुगंधरा प्रतीनीधी प्रस्तूतः Protest against MLA Shekhar Nikam in Chiplun Legislative Assembly ? चिपळूण विधानसभेचे आमदार, शिक्षण सम्राट शेखर निकम यांचे विरोधात दसपटी विभागातून असंतोषाचे वातावरण अनेक दिवसापासून धुमसत असून, त्यांचे निषेधार्थ अंदोलन उभे करू. अडरे ग्रामपंचायत सदस्य व स्थानिक ग्रामस्थांचा इशारा.. 'डिजीयुगंधरा' DgYugandhara प्रकाशीत, (Protest against Corruption in Chiplun.)


'डिजीयुगंधरा' DgYugandhara ला मिळालेल्या माहितीनुसार, बरेच दिवसापासून आमदार शेखर निकम यांचे बद्दल चिपळूणच्या जनतेमध्ये त्यांच्या कार्यपद्धतीवर  नाराजगी असून, सामान्य जनतेचे प्रश्न, अडचणींं विषयी ते बहुतांश मौन राखत असून, चिपळूणच्या विकासाबाबत नेहमीच उदासीन असल्याचे येथील जनसामान्यांंचे मत आहे. जनतेमध्ये जाऊन जनतेचे प्रश्न, त्यांच्या मुलभूत गरजांचे निवारण, तसेच विविध अडचणी सोडवीणे, हे जनप्रतिनीधींच मुख्य काम असताना   त्याकडे येथील विद्यमान आमदार शेखर निकम यांचे दुर्लक्ष होत असल्याचे निदर्शनास येत असून, आता जनमानसात त्याची चर्चा होत आहे.   चिपळूण मधील जिल्हापरिषद शाळा असो किंवा सती, खेर्डी, चिपळूण इ. सारखे बहुलोक विभाग असो, विकास अगदीच रोडावल्याचे कळते. खेर्डी सारख्या लोकसंख्या असलेल्या विभागात अद्याप अनेक ठिकाणी पाण्याची गैरसोय असून, पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामप़ंचायतीला पंधरावा वित्त अयोगासारखे निधी येऊन सुद्धा अद्याप   खेर्डीतील जनतेला पिण्याचे पाणी मिळत नसल्याचे कळते. त्याचप्रमाणे मुफ्त पाण्याची सोय करणे हे ग्रामपंचायतीचे कर्तव्य असताना देखील अनेक नागरीकाकडून पाण्यासाठी, खेर्डी ग्रामपंचायतीचे वतीने ग्रामस्थांकडून पैसे उखळल्याची चर्चा येथील बहुतांश स्थानिक करतात. शिक्षण क्षेत्रात देखील चिपळूण तालुक्यात तीच बोंब असून डिजीटल शाळेसाठी तसेच इतर सुविधांसाठी शासन सकारात्मक असताना देखील, येथील आमदार व शिक्षण सम्राट शेखर निकम हे सदा उदासीन असल्याचेच निदर्शनास येत आहे.. ते स्वतः तालुक्यातील शिक्षण कार्यकारणीवर असताना, जर जिल्हापरिषद शाळांची अशी दुर्व्यवस्था होत असेल, तर आमदारांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह असून, त्यांंच्या या कार्यपद्धतीवर जनतेने आवाज उठवला पाहीजे असे तालुक्यातील उच्च शिक्षीत व जानकारांचे मत आहे. कारण एकीकडे या आमदारांच्या कार्यकाळात जिल्हापरिषद शाळांकरीता विवीध योजने अंतर्गत, सरकार पुरेसा निधी देत असताना बहुतांश शाळा ओसाड पडल्या असून, दुसरीकडे मात्र अश्या लोकप्रतिनिधींंच्या अखत्यारीत असलेल्या शाळा, काँलेजांमधून भरमसाठ फिज वसुल केली जात आहे. एकादा विद्यार्थी दारिद्र्य रेषेखाली असताना देखील, अश्या या शाळांमधून सरकारी योजनांपासून त्या विद्यार्थ्यांना वंचीत ठेवले जात आहे.


आमदार शेखर निकम यांच्या या दिशाभूल कार्यपद्धतीच्या अनेक घटना चिपळुण तालुक्यात घडत असून, आता निवडनुकींच्या पार्श्वभुमीवर   केद्र तसेच राज्य सरकारचे योजने अंतर्गत आलेले निधी देखील आमदार निधीतूनच मिळविल्याचे ते भासवत आहेत व जनतेची दिशाभूल करीत असल्याचे कळते. त्याचीच प्रचीती अडरे ग्रामस्थ व ग्रामपंचायत सदस्य यांना आल्याचे त्यानी डिजीयुगंधराला दिलेल्या माहितीनुसार कळते. 


अडरे ग्रुपग्रामपंचायत हद्दीतील अडरे हायस्कूल ते गावठण या रस्त्त्याचा निधी हा मुख्यमंत्री सडक योजने अंतर्गत सिद्धीविनायक नामे पनवेल येथील ठेकेदाराने मिळविला असून त्याने त्याचे काम चिपळूण येथील चिपळुणकर या ठेकेदाराला आपले कमिशन काढून वळविले, तदनंतर चिपळूणकर या ठेकेदाराने,  तेच काम गावतील स्थानीक बिना परवाना असलेल्या तथाकथीत ठेकेदाराला त्याचे कमिशन काढून देण्याची योजना केली असल्याच्या चर्चा जनमानसात होत आहेत. यात सत्यता असल्यास, चिपळूण मधील परिस्थिती फार गंभीर व चिंताजनक आहे कारण ठेकेदारांची चैन, आलेला निधी कमिशन काढून उरलेल्या शिल्लक निधिवर नियोजीत काम करत असल्याचे   कळते. याचाच संशय आल्याने अडरे गावातील जाग्रुक नागरीक, सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य असे एक प्रतिनिधी मंडळ, गावच्या वतीने आमदार शेखर निकम यांचे कडे तक्रार घेऊन गेले असता, त्यांना कमिशन साखळी बंद करून ज्याला हे टेंडर मिळाले आहे त्यानेच याचे काम करावे, म्हणजे सिद्धिविनायक या ठेकेदारानेच आमचे रस्त्त्याचे काम   करावे, तरच या रस्त्याच्ये काम दर्जेदार होईल व रस्ता जास्त वर्षे टिकेल आणि शासनाचा निधी कामी येईल.  अशी संबंधीत ठेकेदाराला तशी समज देण्याची विनंंती अडरे गावचे प्रतिनिधी मंडळाने या आमदार महोदयाना केली असता,  आमदार महोदयांनी ठेकेदाराची कान उघडनी करण्याऐवजी, गेलेल्या प्रतिनीधी मंडळालाच धारेवर धरून, उद्दामपणाची भाषा करावयास सुरुवात केली व तुम्ही जो रस्ता मिळेल तसा करून घ्यावा अन्यथा आलेला निधी मी दुस-या ठिकाणी फिरवतो असे उद्दामपणाची भाषा करत प्रतिनिधी मंडळाला गप्प करण्याचा प्रयत्न केला. परंतु आमदार शेखर निकमानीच आता याचे उत्तर ग्रामस्थाना द्यावे व    भोगस व कमिशनखोरीचे काम होत असताना एक लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचे पर्यंत अडरे गावठण रस्त्याचा विषय पोचवीला असल्याने त्याचे स्पष्टीकरण, त्यानी समस्त अडरे ग्रामस्थाना द्यावे.. अन्यथा आमदार शेखर निकम यांचे विरोधात अडरे ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच व सदस्य हे अंदोलन करतील असा इशारा देखील ग्रामस्थांनी दिला असल्याचे कळते.


अनेक गावात शेखर निकम हे त्यांचे बडवे व भरोश्यातील आधिकारी यांचे संगनमतानेच हे कामाचा निधी वितरीत करत असून, यांचा बहुतांश निधी हा कामाव्यतिरीक्त कमिशनखोरी मध्येच जात असल्याचे स्थानिक  आ. शेखर निकम यांचे भेटीला गेलेल्या प्रतिनीधी मंडळाने डिजीयुगंधरा ला दिलेल्या माहीवरून तसेच चिपळूण ग्रामीण मधील स्थानीक भुमीपुत्र यांचे सोबत चर्चा करुन मिळालेल्या सर्वेक्षणातून कळते.    यात आमदार, प्रशासकीय आधिकारी, आणि त्यांचे बडवे मंडळ अशी पुर्ण टिमवर्क कार्य करीत असल्याचे देखील डिजीयुगंधरा चे प्रतिनीधीना मिळालेल्या माहीती वरून समजले. लवकरच डिजीयुगंधराची अतिरिक्त  टिम आमदार व प्रशासकीय आधिकारी यांचे असलेले साठे लोटे व येथील कार्याचा आढाव घेण्यासाठी चिपळुणात दाखल होणार असून, सत्य जाणून, येथील प्रशासकीय व्यवस्थेत होणारा भ्रष्टाचार महाराष्ट्राच्या जनतेसमोर व मुख्यमंत्री, ग्रुहमंत्री यांचे समोर सादर केला जाईल, असे डिजीयुगंधराचे वतीने स्पष्ट करण्यात येत असून चिपळूण मधील जनतेने तालुक्याच्या विकासासाठी अश्या कमिशनखोरी करणा-या लोकप्रतिनिधी, प्रशासकीय आधिकारी व ठेकेदार याना त्वरीत जाब विचारून धडा शिकविला पाहिजे, अन्यथा पुनः तिवरे गावा सारखी पुनर्वुत्ती ह़ोण्यास स्थानीकच जबाबदार असतील, असे मत डिजीयुगंधराचे मुख्य संपादक श्री. संतोषराव शिंदे यांनी मांडले. तालुक्यातील अश्या घटना आढळल्यास त्वरित Contact करा.


Protest against MLA Shekhar Nikam in Chiplun Legislative Assembly?? by DgYugandhara News, डिजीयुगंधरा प्रतीनीधी प्रस्तूतः