ध्यान (Meditation) म्हणजे काय?
डिजीयुगंधरा, DgYugandhara प्रस्तुतः अष्टांग योग मधला ध्यान हा सातवा प्रकार होय. यम, नियम, प्रत्याहार, आहार, आसन, ध्यान, धारणा आणि समाधी. त्यातील ध्यान म्हणजे सतत पळणा-या अस्वस्थ मनाला स्वस्थ करणे. त्यासाठी आपण श्वास नियंत्रणात आणन्या पासून सुरूवात करतो. ध्यान करण्याची पध्दत अगदी सोपी आहे.
डोळे बंद करा व आपल्या नैसर्गिक श्वासाबरोबर रहा. ध्यान मनातील अस्वस्थ कंपने शांत करते, त्यामुळे त्यातून आत्मशक्ति, ऊर्जा जपली जाते, जी चांगले आरोग्य, मनःशांती व जीवनाला विवेक-ज्ञानाकडे नेते. जिवन स्वस्थ, शांत व निरोगी बनवते.
ध्यानाचे फायदेः Yoga & Meditation for stress relief.
आध्यात्मिक स्वास्थ्य हे मुळ आहे आणि शारीरीक आरोग्य हे फळ आहे. ध्यान हे आपल्या स्वत:च्या प्रयत्नांनी आपल्या जीवनाला दिलेले सर्वात मोठे बक्षिस आहे. आपण आपल्या स्वत:ला खूप काही देऊ शकतो.
सर्व शारीरिक पिडा या मानसिक तणावामुळे होतात. सर्व मानसिक तणाव बौध्दिक अपरिपक्वपणामुळे निर्माण होतात. बौध्दिक परिपक्वता ही आध्यात्मिक उर्जा कमी पडल्याने आणि आध्यात्मिक विवेकज्ञान कमी असल्याकारणाने येते. ध्यान करून आपल्याला भरपूर आध्यात्मिक उर्जा व आध्यात्मिक विवेकज्ञान मिळवीता येते, तेव्हा बुध्दीमत्ता पूर्ण विकसित होते, लवकरच सर्व मानसिक चिंता संपतात. मनावरील तणाव ओसरतो, परिणामस्वरूप सर्व शारीरिक आजार नाहीसे होतात. सर्व आजार बरे करण्याचा ध्यान हाच एकमेव मार्ग आहे. पूर्वी केलेल्या वाईट कर्मांमुळे रोग होत असतात. दुष्कृत्यांचे निराकारण झाल्याविना रोग नाहिसे होणार नाहीत. दुष्कृत्यांचे परिमार्जन होण्यासाठी कोणत्याही औषधांचा उपयोग होणार नाही. मनाला शुन्यत्वा कडे नेऊन, अनगनीत विचारांच्या श्रुखला रोखण्याचा सराव म्हणजेच ध्यान. ध्यानाचे अनेक फायदे आहेत. ते कोणते ते आपण पाहु.
Yoga & Meditation मुळे स्मरणशक्ती उन्नत होतेः
ध्यानातून मिळविलेली भरपूर आध्यात्मिक उर्जा मेंदूला उत्तम प्रकारे व जास्तीत जास्त क्षमतेने कार्य करण्यास मदत करते. ध्यानाने स्मरणशक्ति जबरदस्त वाढते म्हणून सर्व विद्यार्थ्यांसाठी ध्यान नितांत आवश्यक आहे. शाळा आणि विद्यापीठ या दोन्ही पातळ्यांवर ध्यानाचा नियमित सराव विद्यार्थ्यांनी केला, तर निश्चितच सकारात्मक परिणाम विद्यार्थ्यांच्या जिवणावर होईल.
Yoga & Meditation मुळे वाईट सवयी नष्ट होतातः
खूप खाणे, जास्त झोपणे, खूप बोलणे, अती विचार करणे, अती मद्यपान करणे, तंबाखू खाणे, इ. अनेक वाईट सवयी असतात. ध्यान करून मिळवलेले भरपूर विवेकज्ञान आणि आध्यात्मि्क ऊर्जा यामुळे सर्व वाईट सवयी आपोआप सुटतात.
Yoga & Meditation मुळे मन प्रसन्न होतेः
कोणत्याही व्यक्तीसाठी आयुष्य हे पराभव, अपमान आणि वेदना यांनी पूर्ण भरलेले असते. तथापि आध्यात्मिक ज्ञानाने, आध्यात्मिक ऊर्जा प्राप्त केलेल्या व्यक्तींचे जीवन सर्व पराभव, अपमान आणि वेदना असूनही नेहमी शांत व आनंदी असते.
Yoga & Meditation मुळे कार्यक्षमता वाढतेः
भरपूर आध्यात्मिक उर्जा आणि आध्यात्मिक विवेकज्ञान यांच्या अस्तित्वाने सर्व कामे, मग ती शारीरिक असोत वा मानसिक, अधिक कार्यक्षमतेने केली जातात. थोड्या वेळात जास्त कामे पूर्ण होतात. किमान साधने वापरून कौतुकास्पद कामे केली जातात.
Yoga & Meditation मुळे झोपेची वेळ कमी होतेः
ध्यानात मुबलक आध्यात्मिक उर्जा मिळविली जाते. त्यामानाने झोपेत फक्त काही अंश-फार कमी ऊर्जा मिळते. शरीराला मिळणारी विश्रांती आणि मनाला मिळणारी ऊर्जा यांचा विचार करता अर्ध्या तासाचे सखोल ध्यान हे सहा तासांच्या झोपेबरोबरचे असते.
Yoga & Meditation मुळे दर्जेदार नातेसंबंध विकसित होतातः
आध्यात्मिक विवेक, ज्ञानाची कमतरता हे परस्पर हितसंबंध समाधानकारक व दर्जेदार नसल्याचे एकमेव कारण आहे. आध्यात्मिक विवेकज्ञान प्राप्त झाल्याने परस्पर नातेसंबंध अतिशय दर्जेदार व पूर्ण समाधानकारक होतात.
Yoga & Meditation मुळे विचारशक्ती उन्नत होतेः
आपल्या लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी विचारांमध्ये उर्जेची गरज असते. मनाच्या अस्वस्थ अवस्थेत निर्माण होणारे विचार, किमान शक्तीचे असतात. त्यामुळे ते आपापल्या लक्ष्यापर्यंत पोहोचत नाहीत. तथापि मन शांत असलेल्या स्थितीत विचार मोठी शक्ति मिळवितात आणि सर्व इच्छा नाटयपूर्ण रितीने प्रत्यक्षात येतात.
Yoga & Meditation मुळे जीवनाचा उद्देशः
आपण सर्व जन्म घेतो तो विशिष्ट हेतू ठेऊन, विशेष कामाकरीता, विशिष्ट रचना व विशिष्ट योजनेसह. हे फक्त आध्यात्मिकतेने परिपक्व झालेले लोकच समजू शकतात व त्यांच्या जीवनाचा विशिष्ट हेतू, विशेष कार्य, रचना आणि योजना जाणून घेऊ शकतात. जिवनाचे हे उद्दिष्ट ज्याला कळाले, त्याला यशस्वी होण्या पासून विश्वातली कोणतीही सत्ता आढवू शकत नाही.
If you have any query, please let me know.