DgYugandhara डिजीयुगंधरा प्रस्त्तू्तः
शिवाजी महाराजांचे व्यक्तीत्व कसे होते ?? Personality of Shivaji
शिवाजी महाराजांना प्रत्यक्ष पाहिलेली अनेक माणसे त्यावेळी होती. पाश्चिमात्यात हेन्री ऑक्झेडन , निकालो मनुची, थेव्हनॉट, उस्टीक इ. तर भारतीयात परमानंद, परकलदास इ. परंतू फारच थोड्या व्यक्तीँनी शिवरायांच्या व्यक्तिमत्वाबद्दल किँवा शारीरिक ठेवणीबद्दल प्रत्यक्षात नोंद करुन ठेवली आहे.
शिवछत्रपती कसे दिसत होते?
इ.स. १६६४ मध्येसुरतेच्या लुटीच्या वेळी वखारीतल्या इंग्रज अधिकारी एस्केलिऑट याने केलेले वर्णन:
"His personality is described by them , who have seen him , to be of mean stature (medium height) lower some what than i am (when) erect and of an excellent proportion . Actual in exercise ane whenever he speaks seems to smile , a quick and piercing eye and witter than any of his people."
अर्थ-
'शिवाजी आपल्या दक्षिणेकडील इतर मावळ्यांपेक्षा उजळ वर्णाचा असून मध्यम बांध्याचा आहे. त्याची मान व खांद्याचा भाग पुढे झुकलेला दिसतो; परंतु शरीर मात्र अत्यंत प्रमाणबध्द आहे. कोणतीही गोष्ट नजरेत तत्काळ पकडणारी भेदक दूरदृष्टी हे त्याचे खास लक्षणीय वैशिष्ट्य आहे.'
इ.स. १६६६ साली फ्रेँच प्रवासी थेव्हनॉट वर्णन करतो..
"This Raja is short and tawny, with quick eyes that show a great deal of wit. He eats but ones a day commonly and is in good health ."
अर्थ-
"हा राजा ठेँगणा व पिवळसर गौर वर्णाचा आहे. नेत्र तेजस्वी असून बुध्दीमत्तादर्शक आहेत. तो दिवसातून फक्त एकदाच भोजन करतो आणि (तरीही) त्याची प्रकृती उत्तम आहे."
इ.स. १६६६ मध्ये राजे आग्र्यात गेले असताना तिथे परकलदास याने राजांना पाहिले . तो लिहितो..
"अर सेवाजी डेल तो हकीर छोटो सो ही देखता दीस जीI अर सुरती बहुत अजाइब गौरो रंग अपुछो राजवी देसौ जी। हिम्मती मरदानगी ने देखता ही असौ दिसो जू बहुत मरदानो हिम्मतबुलंद आदमी छो। सेवाजी के दाढी छै।"
अर्थ-
"प्रथमदर्शी दिसण्यात शिवाजी हा बांध्याने किरकोळ आहे . पण त्याचा रंग विलक्षण गोरा आहे. त्याचे राजतेज असे की कोणीही त्याला पाहिले की आपोआपच वाटावे की हा राजाच असला पाहिजे, त्याची हिम्मत आणि मर्दुमकी पाहिली की हा बुलंदहिमतीचा मर्द माणूस असला पाहिजे असे वाटूलागते. शिवाजीला दाढी आहे."
कॉस्मा द गार्द या पोर्तुगीजाने केलेले वर्णन (१६९५)
"With a clear and fair nature had given him the greatest perfections specially that they seemed to dart rays to fire . To these was added a quick, clear and acute intelligence."
अर्थ-
"राजांचा चेहरा मोहक होता . निर्सगाने त्याला असावी तशी चेहरेपट्टी दिलेली होती. विशेषतः त्याचे काळेभोर व विशाल नेत्र एवढे तेजस्वी होते की जणू त्यातून अग्निस्फुल्लिँग बाहेर पडत आहेत.
"राज्याभिषेक प्रसंगी प्रत्यक्ष पाहून इंग्रज वकील हेन्री ऑक्झेडने शिवरायांचे लिहिलेले वर्णनः
"शिवाजी महाराज ४७ वर्षाचे असून देखणे होते . त्यांच्या चर्येवरुन त्यांची बुध्दीमत्ता व चाणाक्षपणा सहज ध्यानात येई. त्यांचा वर्ण इतर मराठ्यांपेक्षा पुष्कळच गौर होता. त्यांची दृष्टी तीक्ष्ण असून नाक सरळ व बाकदार होते . त्यांच्या दाढीस निमुळतेपणा असून मिशी बारीक म्हणजे विरळ होती. त्यांचे बोलणे निश्चयात्मक, स्पष्ट पण जलद होते."
DgYugandhara डिजीयुगंधरा द्वारा प्रस्त्तू्त..
If you have any query, please let me know.