नितेश राणेंना रिफायनरी समर्थन भोवले? रामेश्वर ग्रामपंचायतीवर रिफायनरी विरोधी पॅनलचा झेंडा - नितेश राणे रिफायनरी वाद

डिजीयुगंधरा (DgYugandhara)
0

 

 
DgYugandhara डिजीयुगंधरा न्युजः नितेश राणे यांच्या  हातात असलेली देवगड तालुक्यातील रामेश्वर ग्रामपंचायतीवर रिफायनरी विरोधी पॅनलचा झेंडा फडकला आहे. सरपंच व ७ सदस्य निवडून आल्याने राणे कुटुंबियांना हा मोठा धक्का मानला जात आहे.

  हल्लीच देवगड भाजप चे स्थानिक आमदार नितेश राणे यानी दिलेल्या काही मुलाखतीत रिफायनरीचे समर्थन केले होते. नाणार रिफायनरी वेळी गिर्ये व रामेश्वर ही देवगड तालुक्यातील दोन गावे प्रकल्पग्रस्त होती व कट्टर रिफायनरी विरोधक होती. नितेश राणे यांच्या रिफायनरी समर्थनाच्या भूमिकेने स्थानिक ग्रामस्थांमध्ये रोष निर्माण झाला होता.


रामेश्वर ग्रामस्थांनी भाजपा पुरस्कृत पॅनल विरुद्ध रिफायनरी विरोधी पॅनल उभे करण्याचा निर्णय घेतला. यात त्यांना शिवसेना ठाकरे गटांनी साथ दिली  असल्याचे कळते.


 यावरून हे नक्कीच दिसून आले आहे की, कोणत्याही निवडनुकीत  भुमीपुत्रांनी आवाज उठवला की, रिफायनरीसारखा मुद्दा असो किंवा इतर कोणत्याही मुद्ययाच्या जनप्रक्षोभाचे सामोरे गेल्यास, कोकणी जनता पक्षनिष्ठा न संभळता, स्वतःला काय योग्य वाटेल तोच निर्णय घेते. मग तो विषय निसर्ग रक्षणाच्या संबंधातील असो अथवा खुद्द भुमीपुत्रांच्या तत्वांचा असो, जनमताच्या  बाजूने उभी राहते. याचा बोध प्रत्येक पक्षाने घेणे गरजेचे आहे. DgYugandhara डिजीयुगंधरा न्युज 

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

If you have any query, please let me know.

एक टिप्पणी भेजें (0)