जरांगेनीच मराठा क्रांती मोर्चा अंदोलन व मराठा आरक्षणाचा (Maratha reservation) मुद्दा भरकटवला ?? याला जबाबदार कोण ??

डिजीयुगंधरा (DgYugandhara)
0

  

DgYugandhara डिजीयुगंधरा प्रकाशीत, Maratha reservation:

मराठा समाजातील आंदोलनामुळे मनोज जरांगे पाटील यांचे नाव महाराष्ट्राला कळले. खरं तर त्यांनीच थंड झालेले हे आंदोलन गरम केलं आणि राज्यभर पसरवले.  आणि भरकटवले..? असे हे मनोज जरांगे पाटील आहेत तरी कोण?

मराठा समाजाचे आंदोलन पुन्हा पेटले. या आंदोलनामुळे महाराष्ट्राचे लक्ष जालना शहराकडे गेले. गेल्या काही दिवसांपासून जालना मराठा आंदोलनाचे केंद्र झाल्याने, मराठा आंदोलनास पुन्हा जिवंत करणारे केवळ मराठवाड्याला परिचित असणारे नाव   महाराष्ट्रभर पसरले. ते नाव म्हणजे मनोज जरांगे पाटील.  

कुठले आहेत मनोज जरांगे पाटील ? 

हे पाटील मुळचे बीड जिल्ह्यातील रहिवाशी. मोतोरी हे त्यांच गांव. काही वर्षांपूर्वी त्यांनी बीडमधून जालनाकडे आपला मुक्काम ठोकला. जालना जवळ असलेल्या अंबडमधील अंकुशनगर मध्ये ते स्थायिक झाले. त्यांच्या घरची परिस्थिती तशी नाजूकच. त्यामुळे उपजिविकेसाठी त्यांनी एकेकाळी हॉटेलमध्ये काम केल होत असं म्हणतात परंतु समाजसेवेची आवड त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. ते समाजात उठ बस करू लागले. चर्चा करु लागले आणि सुरूवात झाली मराठा अंदोलनाला. मराठा समाजाला न्याय देण्यासाठी कित्येक मोर्चे काढले. आमरण उपोषणे केली. रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे मनोज जरांगे पाटील हे नाव संपूर्ण मराठवाड्यात पसरले. 

२९ आँगस्ट २०२३ ला मराठा समाजाच्या आरक्षणा करीता त्यांनी आमरण उपोशन केले. त्यादरम्यान झालेल्या पोलीस आणि अंदोलक यांच्या चकमकीतून जरांगे पाटील संपूर्ण महाराष्ट्राला माहीत झाले आणि सरुवात झाली वेगवेगळ्या सभांनी, यासभांमधून त्यानी मागनी केली की, सर्व मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन आरक्षण द्यावे. त्यांच्या या मागणीने सरकार सकट अख्खा महाराष्ट्र गोंधळात पडला. आणि मराठा समाजात आरक्षणावरून संभ्रम निर्माण झाले, कारण विषय मराठा समाजाच्या आरक्षणाचा असताना कुणबी प्रमाणपत्राचा हा अट्टाहास करण्याचे कारण तरी कोणते?? काय गौडबंगाल आहे या मागे ??  यावर नाही कोणत्या विचारवंतांनी, विश्लेषकांनी किंवा पत्रकारांनी आपले विश्लेषण मांडले, नाही राजकिय नेत्यांनी आपली भुमीका मांडली. सा-याच राजकीय पक्षांमध्ये गोधळ बघावयास मिळाला. 

कारण जरांगे पाटलांनी जो काही मुद्दा ठेवला तोच तत्वाना बगल देणारा आणि तर्कविरहीत असल्याने, सामाजिक व्यवस्थेचा इतिहास आणि निर्माण झालेली वर्तमान परिस्थिती याचा कोणत्याही राजकिय पक्ष किंवा पुढा-यांचा अभ्यासच नसल्याने, आज देखील ही गोंंधळाची परिस्थिती जैसे थी तशीच आहे.  जरांगेनी कोणत्या तर्काने सरसकट कुणबी प्रमाणपत्र नुसार आरक्षणाचा अट्टाहास धरला, त्यासाठी किती सर्वेक्षण आणि संशोधन केली, हे  जरांगे पाटलानी मराठा समाजाला प्रथम स्पष्ट कराव. अन्यथा मारठ्यांनी उभ केलेलं क्रांती मोर्चाचं अफाट स्वरुप आणि त्याला मिळालेलं मराठ्यांचं योगदान व त्याचं यश लाटण्याचा हा केवीलवाणा प्रयत्न जरांगे करत आहेत का?  किंवा मग जरांगे पाटलांच्या मागे ही कोण शक्ती आहे, ती हे  सर्व करवीत असून जरांगे केवळ कटपुतली आहेत?? असे अनेक प्रश्न आम्हा मराठ्यांच्या मनात उपस्थित रहात असतील तर नवल नाही. कारण जरांगेंच एकदरीत बोलणं आणि वागणं हे संशया स्पद असून, मराठा क्रांती मोर्चाच्या मुद्यानाच तडा देणारं आहे यात शंका नाही. कारण या क्रांती मोर्चा अदोलनात आमच्यासारख्या अनेक सखल मराठ्यांनी आपला वेळ, पैसा आणि बुद्धी खर्च केली असताना, एका जरांगेंनी त्या अंदोलनाच अपहरण करूण, स्वतःचा चेहरा त्याला लावून, मराठ्यांचा नेता बणन्याची जी चेष्टा चालवली आहे का?? आणि असं असेल तर मग त्याला आमचा विरोध आहे आणि कायम राहील. कारण ज्या अंदोलणाच्या तत्वाना मुळात बगल देऊन, तर्क विरहीत आरक्षणाला पाठिंबा देण हा सखल मराठयांचा  अजेंडा नव्हता आणि आज देखील नाही.  होय आम्हाला आरक्षण हवे आहे, ते कोणाचाही हक्क न मारता, असलेल्या गर्दित आम्हा म-हाठ्यांची कोंबाकोंबी नकरता, आमच्या शान आणि आमच्या तत्वाना बगल न देणार आरक्षण आम्हाला हवच आहे. नाहीतर आर्थिक निकशावर द्या ते आरक्षण किंवा जे काही ५०℅ बाकी आहेत त्यात आता वाढ होऊ शकत नाही, तर मग त्या ओपन ५०℅ मध्ये आरक्षण वाल्यांचे प्रवेश बंद होऊ देत. म्हणजे ज्या जातींना आरक्षण दिल्या गेले आहे, त्याना ओपन मधून ताबडतोप सरकारने स्थगीती द्यावी, ते दरवाजे सरकारने बंद करावे. त्याना कोणालाही उरलेल्या ५०℅ ओपन मधून प्रवेश देऊ नये. असे जरी झाले तरी यामुळे अनेक आरक्षण विरहीत मंडळींना त्याचा फायदा होईल.

DgYugandhara डिजीयुगंधराचे सर्वेक्षणा नुसार असे निदर्शनास आले की, आरक्षणाद्वारे काहीनी अगोदर फायदा घेतला व आपला कोटा पूर्ण केल्यावरही, ओपन मधून पुन्हा त्यानी आपल्याच समाज बांधवाची भरती करून घेऊन ओपन वाल्यांचा भरना केलाच नाही. त्यामुळे जर आरक्षण मधून ही १०℅ मंडळी सरकार मध्ये घुसली असल्यास ओपन मधून त्यानीच आपले समाज बांधवच ९०℅ घुसवल्याच कळतं. तेव्हा सरकारने प्रथम आरक्षण मिळालेल्यांचे ओपन मधील प्रवेश बंद केले पाहिजेत. मग हे जरांगेना का कधी सुचलं नाही?

म्हणजेच ज्या जरांगेने या कोणत्याही बांबींचा अभ्यास नकरता, कोणीतरी मातेफिरूनी किंवा कदाचित दिशाहीन राजनेत्यानी ठरवलेल्या त्या कुणबी प्रमाणपत्र पुरस्क्रुत  अजेंडा माणने, म्हणजे  वासरात लंगडी गाय शहाणी आणि त्या शहाणपणाला स्वीकारून खड्यात जाणा-या मानवी गुराढोरांच्या कळपासारख झालं आणि ज्यांनी हे माणलं, असेच कळप आज जरांगेच्या पाठिमागे असावेत ? हे सत्य असेल तर हे असं मानवी गुरढोर (Human Cattles) होणं आम्हा सखल मराठ्यांना  कदापी स्विकार नाही. 

यात एक अजून सत्य विसरून चालणार नाही, जे क्रांती मोर्चाच्या रुपाने एवढ मोठं मराठ्यांच आंदोलन उभ राहीलं होतं, ते आज विभागलं गेलं, ते केवळ जरांगे आणि जरांगेसारख्या क्षुद्र विचार करणा-या मानसिकतेमुळे ? आणि आज मराठ्यांच हे अंदोलन याच क्षुद्र मानसिकतेचं शिकार झालं?? विरोधकानी डाव साधला आणि मराठ्यांचं या आरक्षणाच्या बाबतीत पाणिपत झालं… परंतु पुन्हा वाटतं, "एक मराठा.. लाख मराठा"..! DgYgandhara डिजीयुगंधरा द्वारा प्रकाषीत, Maratha reservation:.


एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

If you have any query, please let me know.

एक टिप्पणी भेजें (0)