कोकण विकास अभियानाला सार्थ करण्यासाठी चिपळूण, दसपटी व दसपटी उपविभागात संतोषराव शिंदे यांचे नेत्रुत्वाखाली लोकाभिमुख भारतीय जनता पार्टी कार्यकारीणी सज्ज..

डिजीयुगंधरा (DgYugandhara)
0

 

लोकाभिमुख भारतीय जनता पार्टी, दसपटी (चिपळूण) कार्यकारीणी चिपळणच्या सर्वांगीण विकासासाठी सज्ज.

डिजीयुगंधरा, DgYugandhara प्रतिनीधीः   दिनांक ८ नोव्हेबर २०२३ रोजी, कोकण विकास अभियानाला सार्थ करण्यासाठी, दससपटी व उपविभागाचे  सर्वेक्षण करून दसपटी विभागातील जुण्या व जेष्ठ मंडळींच्या मार्गदर्शनाखाली व श्री. संतोषराव शिंदे यांचे नेत्रुत्वाखाली लोकाभिमुख भारतीय जनता पार्टी कार्यकारीणीची नियुक्ती करण्यात आली. भारताचे  पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांचे सबका साथ..सबका विकास.. सबका विश्वास..! याला अनुरुप कार्य करण्याचे उद्देशाने या कार्यकारीणी ची वाटचाल होत असुन, कोकण विकास अभियानाच्या कार्यसुची वर चिपळुण दसपटी व उपविभागात ही कार्यकारीणी काम करेल. गेल्या तीस वर्षात चिपळुणचा विकास जाणून बुजून खूंटला गेला होता, त्याला जबाबदार येथील राजकीय व्यवस्था आहे आणि ही व्यवस्था बदलण्याच्या उद्देशाने आता दसपटकर पाऊलं उचलत आहेत. भुमीपुत्रांच्या न्याय व हक्क याला अबाधीत करणारं चिपळुण, व्यसन मुक्त व भ्रष्टाचार मुक्त चिपळूण, संम्रुद्ध व संपन्न चिपळुण यासाठी लोकाभिमुख भाजपा, श्री. संतोषराव शिंदे यांचे नेत्रुत्वाखाली सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचे लो. भाजपा चिपळूण अध्यक्ष श्री. पांडुरंगराव शिंदे, दसपटकर यांनी डिजीयुगंधराचे DgYugandhara प्रतिनिधींशी बोलताना सांगितले. आमची कोणावरही नाराजगी नसून, चिपळुण तालुक्यातील बहुसंख्य भुमीपुत्रांच्या न्याय, हक्क व सर्वांंगीन विकसाच्या अधिष्ठानाची ही वाटचाल असून, या अधिष्ठानात दसपटी व उपविभागातील अनेक भुमीपुत्र जुडत आहेत. दसपटी विभागातील सामाजिक, सहकारी संस्था, ग्रामपंचायती, प्रस्थापित पक्षांचे कार्यकर्ते, महीला बचत गट   व जेष्ठ नागरीक अश्या अनेकांनी या कार्यसूचीचे स्वागत केले असून, दसपटीच्या उभारणीसाठी सर्व प्रकारचे योगदान देण्याचे नेत्रुत्वाला कळविले आहे. असे ते म्हणाले. दसपटकरांची ही ताकद चिपळुण पुरतीच मर्यादित नसून, मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, कल्याण, डोंबिवली व त्या पुढील शहरांत देखील पसरलेली आहे. त्याला संघटीत व एकछत्र करण्याचे द्रुष्टीने युद्धपातळीवर कार्य चालू असून,  हे संघटन कोकण विकास अभियानाच्या गोल्डन प्रिंंटवर  काम करेल, हि विकासाची गोल्डन प्रिंट आम्ही लवकरच प्रकाशित करणार असल्याचे, श्री संतोषराव शिंदे यांनी डिजीयुगंधरा, DgYugandhara सोबत बोलताना सांगितले.



श्री. विजयराव कदम, श्री. संदिप महाडीक, श्री. संतोष स. शिंदे कादवडकर, श्री. एन जी कदम, श्री. बाबाराम सुर्वे, श्री. विजयराव शिंदे हे लोकाभिमुख भाारतीय जनता पार्टी चिपळुण उपाध्यक्ष म्हणुन संघटनेच़ं काम बघतील तर श्री. चंद्रशेखरराव कदम हे सरचिटणीस, श्री. अभिजीत शिंदे, श्री. सुशिल शिंदे, श्री. सुधीर सुतार, श्री. निलेश पोसनाक, श्री. हेमंत शिंदे यांची अनुक्रमे सचीव व सहसचीव पदासाठी नियुक्ती करण्यात आली तर श्री. चंद्रकातराव शिंदे हे संघटनेचे खजिनदार म्हणून काम बघतील. त्याचप्रमाणे श्री. जीवाजी कांबळी हे ओबीसी मोर्चा प्रमुख म्हणून काम बघणार असूूून, अनुसूचीत जातीचे दसपटी विभागाचे प्रमुख म्हणून श्री. सुभाष गम्रे काम संभाळतील. लवकरच चिपळूण शहर, युवा व महीला मोर्चा कार्यकारीणी ची घोषणा होणार असून, भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश नेत्रुत्वाला देखील चिपळूण मधील सध्य स्थिती कळविण्यात येईल, असे भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस श्री. चंद्रशेखरराव कदम यांनी DgYugandhara डिजीयुगंधराशी बोलताना सांगितले. आताच्या या घडामोडीत दसपटी विभाग व उपविभागातील अनेक ग्रामपंचायती, सहकार संस्था, सामाजिक संस्था, महीला बचत गट, मुंबई, पुणे, ठाणे जिल्ह्यातील दसपटकर  चाकरमानी,  मंडळे, उद्योजक संस्था  आमचे सोबत असून येणा-या पुढील काळात एकसंघ होऊन चिपळुण तालुक्याच्या सर्वांगीन विकासाच्या परिवर्तनाला (सामाजिक, औद्योगिक व राजकीय) साथ  देणार असल्याचे देखील ते DgYugandhara डिजीयुगंधरा प्रतिनीधींशी बोलले.





एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

If you have any query, please let me know.

एक टिप्पणी भेजें (0)