Health Tips.. उन्हात त्रास झाल्याने, अती उष्मँमूळे जीवाला धोका होऊ शकतो.. Fitness Funda - 4

डिजीयुगंधरा (DgYugandhara)
0

 

Ready for Fitness Fanda

डिजीयुगंधरा, DgYugandhara Fitness Funda: Health Tips..

आपण सगळेच उन्हात फिरतो. पण काही जणांचा उन्हात गेल्यामुळे अचानक त्रास का होतो कारण..

१)  आपल्या शरीराचं तापमान नेहमी ३७° अंश सेल्सियस असतं, या तापमानातच शरीरातले सर्व अवयव नीट काम करू शकतात.

२)  घामाच्या रूपाने पाणी बाहेर काढून शरीर ३७° अंश सेल्सियस तापमान कायम राखतं, सतत घाम निघत असताना पाणी पीत राहाणं अत्यंत गरजेचं आणि अत्यावश्यक आहे.

३)  पाणी शरीरात इतरही अधिक महत्त्वाची कामं करतं, त्यामुळे शरीरातला पाण्याचा साठा कमी झाला, तर शरीर घामाच्या रूपाने पाणी बाहेर टाकणं टाळतं.

४)  जेव्हा बाहेरचं तापमान ४५°अंशाच्या पुढे जातं आणि शरीरातली कूलिंग व्यवस्था पाण्याच्या अभावाने ठप्प होते, तेव्हा शरीराचं तापमान ३७°च्या पुढे जाऊ लागतं.

५)  शरीराचं तापमान जेव्हा ४२° डिग्री सेल्सियसपर्यंत पोहोचतं, तेव्हा रक्त तापू लागतं आणि रक्तातलं प्रोटिन अक्षरशः शिजू लागतं (उकळत्या पाण्यात अंड उकडतं तसं.)

६) स्नायू कडक होऊ लागतात, त्यात श्वास घेण्यासाठी लागणारे स्नायूही निकामी होतात.

७) रक्तातलं पाणी कमी झाल्यामुळे रक्त घट्ट होतं, ब्लडप्रेशर अत्यंत कमी होतं, महत्त्वाच्या अवयवांना (विशेषतः मेंदूला) रक्त पुरवठा थांबतो.

८) माणूस कोमात जातो आणि त्याचे एक-एक अवयव अवघ्या काही क्षणांत बंद पडतात आणि त्याला मृत्यू ओढावतो.

९) उन्हाळ्यात असे अनर्थ टाळण्यासाठी सतत थोडे थोडे पाणी पित रहावे, व आपल्या शरीराचे तापमान 37° अंशच कसे राहिल याकडे लक्ष द्यावे.

आपल्या माहीती साठी उष्ण व शीत(थंड) गुणधर्माची फळे..

सफरचंद - थंड, चिकू - थंड, संत्री- उष्ण, लिंबू - उष्ण, कांदा- थंड, बटाटा - उष्ण, पालक - थंड, टॉमेटो- उष्ण कारले - उष्ण, कोबी - थंड, गाजर - थंड, मिरची - उष्ण मका - उष्ण, मेथी - उष्ण, वांगे- उष्ण,भेंडी - उष्ण, बीट  - थंड, बडीशेप- थंड, वेलची - थंड, पपई -उष्ण,अननस - उष्ण, डाळींब - थंड, ऊस - उष्ण, मीठ  - थंड, मूग, डाळ  - थंड, चणा डाळ  - उष्ण, गुळ  - उष्ण, तिळ - उष्ण, शेंगदाणे / बदाम / काजू / अक्रोड / खजूर - उष्ण, हळद  - उष्ण, कॉफी  - थंड, दूध / दही / तूप / ताक / तांदूळ  - थंड.

उन्हाळ्यात थंड पदार्थ जास्त खाल्ल्यास होणारा त्रास कमी होतो . डिजीयुगंधरा, DgYugandhars द्वारा फिटनेस फंडा प्रकाषीत.

All Fitness and Facility Services..

Post a Comment

0Comments

If you have any query, please let me know.

Post a Comment (0)