नियमीत Meditation ध्यान करा (Meditate everyday) .. Mind Spirit वाढावा.

डिजीयुगंधरा (DgYugandhara)
0

DgYugandhara, डिजीयुगंधरा प्रस्तुतः Meditation ध्यान का करावे?

ध्यान Meditation ची काय ताकद आहे? ध्यान केल्याने मनाची शक्ती Mind Spirit वाढते. मनुष्य स्थिर व सद्विवेकी बनतो. त्यामुळे त्याच्या भौतीक शरिर तसेच इतर भौतीक घटकांवर सकारात्मक परिणाम होतो व यश संपादन करणे त्याला सहज शक्य होते. जीवनातील तणाव (Stress) कमी होण्यास मदत होते. जीवन Stress Free होते.


सामुहिक ध्यान Meditation साधनेचे महत्व काय आहे?

जेव्हां १०० लोक एकत्रितपणे साधना करतात तेंव्हा त्यांच्या लहरी जवळजवळ ५ कि.मी. पर्यंत पसरतात आणि  नकारात्मकता नष्ट करून सकारात्मकता निर्माण करतात.

आइन्स्टाईनने शास्त्रीय दृष्टिकोनातुन सांगितले आहे की एका अणुचे विघटन केल्यास तो त्याच्या शेजारील अनेक अणूंचे विघटन करतो. त्यालाच आपण अणुविस्फ़ोट म्हणतो.

हीच गोष्ट आपल्या ऋषी-मुनीनी आपल्याला हजारो वर्षांपूर्वी सांगितली आहे की पृथ्वीवरील केवळ ४% लोकच ध्यान करतात, त्याचा फायदा उर्वरीत ९६% लोकांना होतो. आपणसुद्धा जर ९० दिवस सलग ध्यान केले तर आपल्या कुटुंबातील इतर  व्यक्तींवरील सकारात्मक परिणाम  आपल्यास  दिसून येईल. जर पृथ्वीवरील केवळ १०% लोक ध्यान करतील तर पृथ्वीवरील सर्व समस्या नष्ट करण्याची ताकद ध्यानामध्ये आहे.

महर्षी महेश योगी यांनी १९९३ मध्ये शास्त्रज्ञांपुढे हे सिद्ध केले आहे. त्यांनी ४००० शिक्षकांना वॉशिंग्टन डी सी मध्ये बोलावून त्यांना एक महिना ध्यानाभ्यास करावयास सांगितले. त्यामुळे त्या शहरातील गुन्ह्यांचे  प्रमाण ५० टक्क्यांनी कमी झाले. शास्त्रज्ञाना याचे कारण कळले नाही म्हणुन त्यांनी याला "महर्षी इफेक्ट" असे नाव दिले.  ध्यानामधील ही ताकद आहे.

आपण आपली भौतिक तसेच अध्यात्मिक प्रगती ध्यानामुळे कमी श्रमात साधु शकतो. गरज आहे ती फक्त ध्यानातून स्वत:चा शोध घेण्याची. हा शोध घेतल्याने, तुम्ही तुमच्या जिवनातील अनेक समस्या दुर करू शकता आणि प्रगती होते. ध्यानाचे Meditation चे अनेक प्रकार आहेत. ध्यानाने तुमची ७ चक्र जाग्रुत करता येतात. ज्यामुळे देखील अनेक समस्यांचे निरसन करता येते, सुष्म शरिराद्वारा हे बदल घडुन येतात. तेव्हा ध्यान साधन्यासाठी सर्वप्रथम योग अंगिकारणे जरुरी आहे. ध्यान Meditation हे योग मधीलच पाचवा घटक असून, योग क्रमवार अंगीकारले की साधकाला ध्यान साधने शक्य होते. या संदर्भात आपणास अधिक अभ्यास करावयाचा असल्यास डिजीयुगंधरा, DgYugandhara च्या Contact us ला भेट देऊन तुमची नाव व मोबाईल नं. नोंदवा व कमेंट्स मध्ये तुमची समस्या थोडक्यात कळवा.
डिजीयुगंधरा, DgYugandhara द्वारा प्रकाशीत, ध्यान, Meditation.


एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

If you have any query, please let me know.

एक टिप्पणी भेजें (0)