ब्लड प्रेशर आणि त्याच्या नियंत्रणाचे घरगुती उपाय (Blood pressure and home remedies) Fitness Funda - 6

डिजीयुगंधरा (DgYugandhara)
0

 

 

डिजीयुगंधरा, DgYugandhara Fitness Funda:

ब्लड प्रेशर  आणि त्यावर  नियंत्रणाचे घरगुती उपाय (Blood pressure and home remedies):

ब्लडप्रेशर असलेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. धकाधकीच्या जीवनात फास्ट फूड आणि अनियमित दिनचर्या या कारणामुळे या आजाराचे रुग्ण भारतातही मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. ब्लडप्रेशरमुळे हृदयाचे आजार, स्ट्रोक अशा समस्या निर्माण होण्याची दाट शक्यता असते. ब्लडप्रेशरच्या रुग्णाला दररोज औषध घ्यावे लागते. आज  तुम्हाला काही घरगुती उपायांची माहिती देत आहोत. तुम्हालाही ब्लडप्रेशरचा त्रास असेल तुम्ही हे घरुगुती उपाय अवश्य करून पाहा. या उपायांनी तुमचे ब्लडप्रेशर नियंत्रणात राहील.

लसूणः
ब्लडप्रेशरच्या रुग्णांसाठी लसूण अमृतासमान औषधी आहे. यामध्ये एलिसीन नावाचे तत्त्व असते, जे नायट्रिक ऑक्साइडचे प्रमाण वाढवते आणि यामुळे आपल्या मासपेशींना आराम मिळतो. ब्लडप्रेशरच्या डायलॉस्टिक आणि सिस्टॉलिक कार्यप्रणालीला आराम मिळतो. यामुळे ब्लडप्रेशरच्या रुग्णांनी दररोज लसणाची एक पाकळी अवश्य खावी.

शेवगाः
यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आणि व्हिटॅमिन तसेच खनिज लवण आढळून येतात. एका संशोधनानुसार, या झाडाच्या पानांचा अर्क पिल्यास ब्लडप्रेशरच्या डायलॉस्टिक आणि सिस्टॉलिक कार्यप्रणालीवर सकारत्मक प्रबाव पडतो. ब्लडप्रेशरच्या रुग्णाने मसूरच्या डाळीसोबत शेवग्याचे सेवन करावे.

जवसः
जवसामध्ये अल्फा लिनोनेलिक अ‍ॅसिड भरपूर प्रमणात असते. हे एक प्रकारचे महत्त्वपूर्ण ओमेगा-३ फॅटी अ‍ॅसिड आहे. विविध संशोधनामध्ये समोर आले आहे, की ज्या लोकांना हायपरटेन्शनची समस्या असेल त्यांनी जेवणात जवसाचा उपयोग अवश्य करावा. यामुळे कॉलेस्टेरॉलची मात्रा कमी होते आणि याच्या सेवनाने ब्लडप्रेशर नियंत्रणात राहते.

विलायचीः
एका संशोधनानुसार विलायचीचे नियमित सेवन केल्यास ब्लडप्रेशर व्यवस्थित राहते.  यात पोटॅशिअम आणि फायबर अधिक प्रमाणात असतं जे ब्लड सर्कुलेशन योग्य प्रकारे करतं. यात पोटॅशिअम, मॅग्नेशिअम, व्हिटामिन B1, B6 आणि व्हिटामिन C शरीरातील अतिरीक्त चरबी कमी करतं. यात असलेल्या फायबर आणि कॅल्शिअममुळे वजन कमी करण्यात मदत होते.

  
हळद   Turmeric
हळद ही तिखट,  कडवट,  रूक्ष,  गरम,  जंतुनाशक,  रक्तशुद्धीकारक,  वात,  पित्त,  कफ  शमन  करणारी असून, तीचा उपयोग खालील प्रमाणेः.

१)  जखमेवर  किंवा  मुका  मार  लागणे.  हळद  लावा.
२)  रक्ती  मुळव्याध  -  बकरीचे  दूध  +  हळद  घ्या.
३)  सर्दी,  कफ,  खोकला -  गरम  दूध  +  तूप  +  हळद  घ्या.
४)  जास्त  लघवी  -  पांढरे  तीळ  +  गुळ  +  हळद  घ्या.
५)  आवाज़  बसणे  -  हळद  +  गुळ  गोळ्या  करून  खा.
६)  काविळ  -  ताक  +  हळद.
७)  ताप  -  गरम  दूध  +  हळद  +  काळीमिरी  पुड.
८)  लघवितून  पू  जाणे  -  आवळा  रस  +  हळद  +  मध.
९)  मुतखडा  ( स्टोन )  -   ताक  +  हळद  +  जूना  गुळ.

हे आणि असे अनेक घरगुती उपाय आहेत जे तुमचे Blood Pressure आटोक्यात ठेऊ शकते.
डिजीयुगंधरा, DgYugandhara Fitness Funda:






एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

If you have any query, please let me know.

एक टिप्पणी भेजें (0)