दसपटीचे आदिप्रवर्तक, The Great Maratha, दगलबाज.. ते जगण्याच्या धडपडीचे आत्माराम, बुद्धीभ्रष्ट बगलबाज, पक्षीय आयारामांचे झेंडे घेऊन मिरवणारे बडवे.. आम्ही दसपटकर - भाग १

डिजीयुगंधरा (DgYugandhara)
0

 

 

  दसपटकर योद्धा इ.सन १५५१
DgYugandhara डिजीयुगांधरा संपादकीयः The Great Maratha, दसपटकर आदीप्रवर्तक कसे होते ? कल्पनेने किंवा अंज्ञानाने अधोरेखीत केलेले आपल्या पुर्वजाचे  चारित्र्य बाजूला सारून, त्या पुण्यश्लोकांची खरीखुरी प्रतिमा धिटाईने लोकांपुढे मांडणे म्हणजे लोकक्षोभाला बळेच आव्हान देण्याइतकेच भयंकर काम आहे. पण ते कोणीतरी केंव्हातरी करणेच प्राप्त असल्यामुळे लोकक्षोभाची, समाजाची, भाऊबंदकीची पर्वा न बाळगता, गांभीर्याने ते आम्ही आपल्या शिरावर घेत आहोत.

ज्या राष्ट्राला स्वातंत्र्य नाही, परकीयांच्या राजसत्तेखाली जे जगत असते, त्या राष्ट्राच्या माणसांना ‘ह्युमन कॅटल‘ (माणसी गुरेढोरे) हीच संज्ञा यथायोग्य शोभते. शिवाजीच्या हृदयात राष्ट्रधर्माच्या या तीव्र भेदाची विद्युलता चमकेपर्यंत सतराव्या शतकाच्या मध्यापर्यंत आपल्या देशातील हिंदू म्हणजे ‘ह्युमन कॅटल’ बनलेला होता.

छत्रपती शिवाजी महाराज 

अर्जुन ‘बगलबाज’ होता. काका, मामा, आप्पा, बाबा यांना कसे मारू या क्षुद्र कल्पनेला बळी पडून विहित कर्तव्याला बगल मारून पळत होता. पण  शिवाजी तसा न्हवता. तो वाकड्या दाराला वाकडी मेढ ठोकून समोर येईल त्या मुकाबल्याचा फडशा पाडणारा ‘दगलबाज’ होता.
परंतु त्या आधी  ऐंशी ते शंभर  वर्षे आगोदर, शिंदे घराण्याच्या त्या योध्याने, पुंडाईकर बारभाई कोळ्यांचा खात्मा केला, ज्या बारभाई कोळ्यांनी एकदा नव्हे, दोनदा नव्हे तब्बल तीन वेळा फौजेसकट

श्रीमंत सोमाजीराव रामाजीराव शिंदे, (सौजन्य AI)
बुडवलेल्या विजापूरकर इब्राहीम आदिलशहा - पहिला याला देखील दगलबाजाने जेरिस आणून, दख्खन मध्ये विजापुर आदिलशाही सोबत तह करून स्वतःची राजसत्ता उभी केली.. केवळ तीनशे खाजगी अंगरक्षक उरलेल्या विजापूर आदिलशहा,  ह्याला आपल्या बाहुबलाच्या अफाट सामर्थ्याने, अद्भूत रणनितीने आणि सशक्त राजनितिने नाममात्र सत्तेत ठेवले, व संपूर्ण सुभा कुंभार्ली ते दाभोळ, ११७ गांवे व दाभोळसारखे आंतरराष्ट्रीय बाजारपेठ असलेल बंदर, कदमांंच्या मदतीने स्वबळावर स्वतःच्या अधिपत्याखाली आणले आणि केवळ दहा टक्के कर सामान्य जनतेला लावून नवीन संस्थान उदयास आलं, ते म्हणजे दसपटी. जो आजचा चिपळूण तालूका आहे. दख्खनच्या युद्धात सर्वस्व हरलेला इब्रहीम आदिलशहा पहिला याला नाममात्र ठेवले, ते केवळ नैतिक युद्धनिती कर्तव्य खातीर.. त्या महान योद्धा, कुशल राजनितीकार व मुद्सद्दि नेता, The Great Maratha, आदीप्रवर्तक दसपटकर संस्थापकाचं नाव होतं, "श्रीमंत सोमाजीराव रामाजीराव शिंदे". पुढे अल्पावधीतच सोमाजीराव शिंदे यांचे निधन झाले आणि आपसी वाद, कट कारस्थान, भाऊबंदकी ऊदयास आली आणि सत्ता परीवर्तनाचे वारे वाहु लागले..

बारभाई कोळी

आदीलशाहीला घर लागली आणि पुनः एक दगलबाज  उदयास आला. नाव होते "शिवाजी"..! बगलबाज अर्जुन ते दगलबाज सोमाजीराव शिंदे आणि शिवाजी या तुलनेत विचारांचे ब्रह्मांड आहे. भारतीय समरभूमीवरील अर्जुन आणि दख्खन मध्ये बारभाई, विजापूरचा आदिलशाह आणि त्यानंतर प्रतापगडावर अफझलखानासमोर उभा ठाकलेला शिवाजी, यांची तुलना केली, तर अर्जुनापेक्षा सोमाजीराव शिंदे दसपट आणि शिवाजी शतपट श्रेष्ठ ठरतो. दगलबाज’ आणि ‘दगाबाज’ यातील भेदच लोकांना समजत नाही. दगलबाज म्हणजे ‘डिप्लोमॅट', मुद्सद्दी.. दगाबाज म्हणजे ‘ट्रेचरस’. इरसाल मुत्सद्दी हा दगलबाजच असावा लागतो..!


प्रबोधनकार म्हणतात..

यत्र योगेश्वर: कृष्णो यत्र शिवराय भूपती ।।
तत्र श्रीविजयो भूतिध्रुर्वा नीतिर्मतिर्मम ।।”

अर्थात..
श्रीकृष्णाने गीता सांगितली अर्जुनाला, पण ती प्रत्यक्षात आचरणात आणून महाराष्ट्राचा राष्ट्रधर्म भगवतगीतेत आहे, हे सप्रमाण सिद्ध केले शिवाजीने. गीतेचे पांग पांडवांनी फेडले नाहीत, ते शिवाजीने फेडले. महाभारतीय इतिहासाला आपल्या बुद्धिप्रभावाने रंगवून चिरंजीव करणाऱ्या दगलबाज श्रीकृष्णाला अर्जुनापेक्षा दगलबाज शिवाजी हाच खरा शिष्य व अनुयायी लाभला, यात मुळीच संशय नाही. असे मला वाटते...
The Great Maratha, आदीप्रवर्तक दसपटी संस्थापक श्रीमंत सोमाजीराव शिंदे देखील ह्याच दगलबाज प्रांतीचे.. जे दख्खनच्या इतिहासात दुर्लक्षीतच राहीले. ते राम क्रुष्ण ह्या यच्चयावत राज्यसंस्थापकांचे पुरस्कर्ते होते आणि म्हणून विराट  आदिलशाहीत आपली सत्ता स्थावर केली आणि जिवंत असे तोवर टिकवली.. परंतु सध्या पक्षीय स्वार्थकारणामुळे आयारामांची जत्राच दसपटीमध्ये भरली आणि त्यानीच स्वतःची राजकिय बस्तान स्थावर व्हावी म्हणून दसपटीचा इतिहासच बदलण्याची चेष्टा करण्याच्या प्रयत्नातून, दसपटी हा विभाग केवळ दहा गांव शिदे म्हणून दसपटी अश्या संकोचीत विचारांनी भुमीपुत्रांंना संभ्रमात टाकले आणि बाहेरून आलेल्या आयारामांनी त्या त्या वेळी स्वतःची पोळी शेकवून घेतली आणि दसपटी संस्थापकांचे वंशज पक्षीय झेंडे फडकावत कधी या पक्षात तर, कधी त्याच्या दारात करत राहीले. म्हणून दसपटी म्हणजे चिपळूण चा विकास अद्याप झाला नाही. कारण आम्ही आमचं घर बनवण्यासाठी करीता शेजा-याची अपेक्षा करतोय, हे अद्याप आम्हाला कळलच नाही, कारण आमचे काही लोक आपले पुर्वज आपले मुळ, त्या मुळापासून दुरावलो. असो यावर विस्तृत पणे पुढील भागात चर्चा करूच.


झाडाच्या मुळाप्रमाणे आणि ऋषीच्या कुळाप्रमाणे कोणत्याही राजसत्तेचे मूळ शोधण्यात अर्थ नाही. या मुळात कसकसली खते पडलेली असतात, त्याचे पृथ:करण भल्याने करू नये परंतु त्यांच्या कर्तृत्वाचा भावी पिढीने विसर देखिल पडून देऊ नये कारण त्याचे मूळ त्यांच्या आनुवंशिक संस्कृतीत, संस्कारात आहेत.

आणि आजचे त्यांचे आम्ही वंशज, आयाराम राजकारण्यांच्या चाकरी आणि दिशाभूलतेचे शिकार.. संसाराच्या रोजच्या क्षुद्र दलदलीतसुद्धा, 'हे बरे का ते खरे’, ‘असे करू का तसे करू’ आणि ‘कसे करू काय करू’ याचा अद्याप   ऊलगडा न झालेले कदाचित बुद्धिभ्रष्ट झालेले आमचेच काही तथाकथित पुढारी असावेत, वा लाचारीने उन्मद होऊन रक्तरंजित झालेल्या आपल्या प्रतापी पूर्वजांच्या पुण्याईचा सौदा करणा-या भिक्कार औलादींची मती मारली गेली असावी. जे पूर्वजांच्या भूमीचे सौदे आणि नेत्रुत्व करण्यासाठी कधी परप्रांतीयांना निमंत्रण देत आहेत, तर कधी आयाराम साहेबाचे बडवे बणून पक्षीय स्वार्थासाठी बळीचे बकरे बनत आहेत.

 
बारभाई कोळी
जीवो जीवस्य जीवनम..! मोठ्या माशाने धाकट्या मासोळीला मटकावून जगावे. शान्यांनी अज्ञानाची घरेदारे लुटून आपली घरे शृंगारावी. जबरदस्तांनी, कमकुवतांना जिंकून दास बनवावे. सत्य, न्याय, प्रेम, अहिंसेची कास बळकट धरणाऱ्या नामर्द षंढांचा युक्तिबाज पेराव, हरामजाद्यानी हसत हसत चिरडून आपल्यानाच जमीनदोस्त करावे. ज्याच्या हाती शिकार त्याने पारधी म्हणून मिरवावे. हाच जेथे सृष्टीत चाललेल्या ‘जगण्याच्या धडपडी’ चा आत्माराम, तेथे एका चोराने दुसऱ्या चोराकडे बोट दाखवावे, काहीनी मुंग गिळून गप्प बसावे, अस़च कहीसं चित्र दसपटीच्या या आदिप्रवर्तकाच्या भुमीत दिसत आहे. त्याचे कारण म्हणजे अज्ञान व भुलभूलैयात  रममाण झालेले आताचे आमचे विचार आणि आचार..!

बगलबाज, आयारामांनी सत्तेची चटक धरून, आदी आमच्या काका, मामांच्या, आजोबांच्या पायाशी लोटांगण घातली, अनुयायी म्हणून मिरवणारे आज त्यानाच परागंदा करून, चिपळुणच्या सत्तेसाठी लोण्याचा गोळा हडप करणा-या बोक्यांंसारखे एकमेकास फिसकारत असताना, आमचे आताचे पुढा-यांनी, जानकारांनी, तरूणांनी, अभ्यासकांनी, बुद्धीजीवीनी आणि समस्त बहजन भुमिपुत्रानी, यांचे स्वार्थकारण समजावे व  आतातरी भानावर यावे आणि होणाऱ्या षड्यंत्रांचे शिकार न बनता आपल्या पूर्वजांच्या भूमीचे अस्तित्व, त्यांंच्या रक्ताने पावन झालेल्या भूमीचे, झाडे, वेली, वसुंधरेचे जतन - रक्षण  करावे. स्वतःच्या आणि दसपटी विभागाच्या सर्वांगीण विकासासाठी समग्र बहुसमाजांंनी एकजूट व्हावे. त्यासाठी बगलबाजी सोडून पूर्वजांच्या दगलबाजीचेच अनुकरण करावे आणि सर्वप्रथम बाहेरून राजकारणात आणल्या गेलेल्या किंवा आलेल्या सर्व आयारामांना त्यांच्या घरी पोचवावे, परतवून लावावे. तरच आपले आणि आपल्या भावी पिढीचा विकास साध्य होईल आणि दसपटीचं अस्तित्व टीकेल..! कारण हे सारे आयाराम तुमच्या उद्धारासाठी नव्हे, दसपटकरांच्या विकासा करिता नव्हे, तर त्यांंच्या आणि त्यांच्या मुलाबाळांच्या विकासासाठी, दसपटीची जमीन राजकिय स्वार्थासाठी वापरून, तुच्छ लालसेने जमा झालेली ही गिधाडे, गेले तीस पस्तीस वर्षे भुमीपुत्रांंचे लचके तोडत आहेत, हे नकळण्या इतके दसपटकर आणि दसपटी उपविभागातील भूमिपुत्र आता अनभिज्ञ नाही, हे पन सत्तेसाठी झुंजणा-या आयारामानी समजून घ्यावे व आपापल्या घरी जाऊन जे काही राजकारण करावयाचं ते करावं, अन्यथा दसपटीचा बहुजन भुमिपुत्र तुम्हाला माफ करणार नाही, हि चेतावनी दसपटीच्या वतीने आम्ही दसपटकर तुम्हाला देत आहोत. या लेखा संदर्भात तुमचे मत Contact us मध्ये Click करून आम्हाला कळवा. हा लेख, संपादकीय डिजीयुगांधरा (DgYugandhara) द्वारा प्रस्तूत


एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

If you have any query, please let me know.

एक टिप्पणी भेजें (0)