परशुरामाची भुमी, चिपळुण भ्रष्टाचाराच्या विळख्यात (Chiplun Corruption - Corruption in Rural), आम्ही दसपटकर - भाग - २

डिजीयुगंधरा (DgYugandhara)
0


DgYugandhara प्रकाशीत Chiplun Corruption: चिपळूण, परशूरामांची पवित्र भूमी म्हणून प्रसिद्ध असलेल्या ह्या चिपळूणला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. नैसर्गिक व भौगोलिक विषेशता आहे. सह्याद्रीच्या कड्याकपा-यां मध्ये वसलेले हा परिसर १६७ गावांचा मिळून चिपळूण तालुका बनतो. ऐतिहासिक पा्र्श्वभूमी असलेला हा चिपळूण तालूका दसपटी ह्या नावाने देखील संबोधीला जातो. दसपटी म्हणजे कुंभार्ली ते दाभोळ या दरम्यान ११७ गावांचा हा सुभा १५५१ पासून ते पेशवाई पर्यंत दसपटकर शिंदे यांच्या अधिपत्त्याखाली होता. दसपटचे मुळ संस्थापक हे कै. श्रीमंत सोमाजीराव रामाजीराव शिंदे हे असून. इसवी सन १५५१ मध्ये बारभाई कोळ्यांचा खातमा करून अली इब्राहीम आदिलशहा याच्या कडून राजकीय मुद्सद्देगिरीने हा प्रदेश आपल्या आधिपत्या खाली आणला व आदिलशाह तिसरा हा मात्र नाममात्र राहीला. हा काळ म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आगोदरचा ८० वर्षांचा काळ होता. त्या काळात बहुतांश हिंदूस्थान हा इस्लामिक आक्रांतांच्या विळख्यात असताना इथे तळकोकणात मात्र इस्लामिक विळख्यातून कुंभार्ली ते दाभोळ हा आदिलशाहीच्या गुलामगिरीत असलेला हा सुभा स्वतंत्र केला तो सुभा म्हणजेच दसपटी. या सुभ्याचे सर्व प्रशासकीय  व व्यवस्थपकिय आधिकार हे दसपटकर शिंदे घराण्याकडे होते. पुढे भाऊबंदकी मुळे या घराण्यात तेड निर्माण झाले आणि त्या भाऊबंदकीतूनच सत्तेची गणिते बदलली. पुढे शहाजी महाराज यांनी आदिलशाहीला सावरण्याचा प्रयत्न केला परंतु तो अयशस्वी राहीला. छत्रपती शिवाजी महाराजांचा उदय झाला आणि त्यावळेचा संपूर्ण महाराष्ट्र जो वेगवेगळ्या गणराज्यात विभागला होता तो हिंदवी स्वराज्य या छत्रपतींच्या संकल्पनेतून एकवटला आणि एका बलाढ्य अश्या मराठा साम्राज्याचा उदय झाला ज्यांनी अखेरपर्यंत इस्लामीक आक्रांताना सळो की पळो केलं. मराठा साम्राज्य उभ करण्यामध्ये दसपटकर शिंद्यांचे फार मोठं योगदान आहे. छत्रपतींसोबत दक्षिण विजय ते बालाजी विश्वनाथ यांना सोबत घेऊन, शाहु महाराज्यांना पुनः गादीवर बसवणे असो किंवा अटकेपार झेंडे फडकवून मराठा साम्राज्याला नवीन ओळख करवून देण्यात, दसपटकर शिंद्याचे फार मोठ योगदान आहे. इतकंच नव्हे तर ब्रिटिशांच्या विरोधात पेशव्यांना मदत करुन मराठा साम्राज्याला नवीन दिशा देण्याच्या कार्यात देखील दसपटकर शिंद्याचं योगदान हे फार मोठं आहे. परंतु आपल्याच काही दुशीत मानसिकतेच्या आणि ब्रिटीशांच्या बहकाव्यात येऊन फितुरी झालेल्या तथाकथित योध्यांच्या गद्दारी  मुळे बेसावध मराठा सैन्य मारल्या गेलं.  परंतु आज कोरेगाव भिमा सारखं  बगलबाज प्रकरण विजयाचं प्रतिक मानलं जाव यासारखं मराठा साम्राज्याचं दुर्दैव ते कोणतं?? 

दसपटी Chiplun Corruption : असं ऐतिहासिक राजकीय कारकीर्द असलेला हा दसपटी विभाग म्हणजे आजचां चिपळूण तालुका, जिथे स्वातत्र्या नंतरही जवळ जवळ चाळीस वर्षे दसपटी आपला लोकप्रतिनिधी ठरवून, राज्यात व केंद्रात निवडून देत असे. अ्श्या या दसपटी विभागात आज पक्ष निष्ठेपायी बाहेरून आणलेल्या आयारामांची गर्दी वाढली आणि चिपळूणच्या दुर्दशेला सुरुवात झाली. पक्षीय नेत्यानी भुमीपुत्रांना डावळून  आपल्या आवडीचे बाहेरील लोकप्रतिनीधी पाठविले आणि शेजा-यांनी भाकरी भाजून द्यावी तशी चिपळुणकरांची अवस्था झाली. आलेल्या लोकप्रतिनिधीनी स्वतःच्या भरोस्याचे आधिकारी नेमावे आणि होईल तितका मलिदा गल्ली पासून ते दील्ली पर्यंत लुटून घ्यावा. भुमीपुत्र मात्र उपेक्षित.  इथुनच राजकारणातील भ्रष्टाचाराला सुरुवात झाली…आणि दसपटीची ऐतिहासिक भुमी स्वार्थी आणि काहीही संबंध नसलेल्या आयारामांचे राजकीय क्रिडांगण बणली, ती आजतागायत..

विकासाच्या नावाखाली रस्ते, पुल आणि पाण्याच्या विहिरी एवढाच काय तो विकास साधला, स्वतःच्या आणि बडव्यांच्या पोटापाण्याची सोय व्हावी म्हणून. आज केलेले रस्ते आणि पुल पुढील पाऊसा पर्यंत टिकतील याची शाश्वती ना ठेकेदारांनी दिली, ना आधिका-यांनी घेतली व ना लोकप्रतिनीधींनी विचारली.. कारण यामध्ये यांच्या कोणाच्याही बापाचं काही गेंलं नाही, यांनी काही दिलं नाही. होय, भरडला तो बिचारा भुमिपुत्र, जो सगळी कडे विखुरला आहे. अगदी स्वतःच्या जन्मगावं चिपळुण ते ठाणे, डोंबीवली, कल्याण, त्या पुढे देखिल असणारा आमचां माणूस आणि मुंबई उपनगरात या ठिकाणी देखील. असे असताना राजकिय पक्ष मात्र हे, आपल्याला पडणा-या मतांची गोळा बेरीज करण्यात व्यस्त आहेत. एकाद्याच्या घरात शेजारी घुसून दिवे लावतोय परंतु याचे यात्रेकरुंना जसे घेणे देणे नसते, तसंच काहीसं या काही राजकीय पक्षांच असावं.. 


DgYugandhara च्या निदर्शनास आले नुसार, चिपळुणात भ्रष्टाचाराचा उद्रेक एवढा की, छोट्या छोट्या कामांसाठी जसे बाजारात फेरिवाले टपरी टाकून बसतात, तसे तहसीलदार कार्यालय इथे बारदान किंवा टेबल टाकून बसलेले फिरते एजंट आढळतील आणि कधी एकादा बकरा तावडीला लागतोय याची वाट बघत असल्यासारखी ही म़ंडळी सावट शोधत असताना पावलो पावली दिसतील. तहसीलदार कार्यालयात तर चहा पेक्षा किटली गरम असलेले काही भाऊसाहेब मंडळी,   जणू काही मुफ्त सेवा पुरवत असल्याचे आव आणून, दिवसें दिवस, महीने त्या खेडुत्याला, जो भूमीपुत्र आहे त्याला फेरे मारावयास लावायच्या आणि मेहरबान झाल्याचा आव आणून अगदी चिरीमिरी दहा वीस रुपयाची देखील त्याच्या कडून चहापाणी खुलेआम घ्यावी, इथपर्यंत यांची ही मजल जाते.


अगदी शेतक-याना मिळालेली नुकसान भरपाई इथे देखील भुमिपुत्रांना अंधारात ठेवल्यांच निदर्शनास आलं असून, सर तुम्ही तुमचं बघा, बाकिच्यांच आम्ही बघतो इथपर्यंत जबाब देणारी कार्यक्षम मंडळी चिपळूण प्रशासकीय कार्यालयात डजनात भेटतील. पोलीस प्रशासन, आरोग्य खाते, वनखाते, पाठबंधारे विभाग, पंचायत समीती, महसुल या इ. सर्व विभागात अंदाधुंदी कारभार चालू असून, कशाचीही चिंता नबाळगता काही अपवाद सोडता, बहुतांश कर्मचारी हे, शासनाच्या मार्गदर्शन सुचीच्या विपरीत कामकाज करताना आढळतात.


 वनखात्याच्या वरदहस्ताने दसपटीत होणारी  अवैध जंगलतोड.

 येथील वनखात्याचा कारभार एवढा भयान आहे की, जणू सर्व काही चिपळुण तालुक्यातील सह्याद्री आणि येथील वन यांचे स्वतःच्या खाजगी मालकीची असल्यासारखे यांचे वर्तन असून, प्रचंड अवैध जंगलतोड एथील आधिका-यांच्या वरदहस्ताने होत असून, एक अद्रुश्य सिंडिकेट या अवैध जंगलतोड करीता कार्यरत असून, वनखात्याचे काही आधिकारी यात सहभागी आहेत, या सिंडिकेट ला कार्यरत ठेवण्यासाठी म्हणून का, अद्याप या आधिका-यांना वर्षानुवर्षे एकाच जागेवर पदनियुक्त्या दिल्या गेल्या आहेत??  हे अता गुलदस्त्यात राहिलेले नसले तरी चिपळूण ग्रामीण साठी फार धोकादायक आहे.  खोटे कागदपत्राचे आधारावर, खोटी प्रकरण बणवून शासनाला त्याच्या अन्वये जमा दंड दाखवून, अवैध मार्गाने जंगलतोडीतून येणारा हा करोडोंचा व्यवहार वनखात्याच्या काही भ्रष्ट आधिका-यांच्या वरदहस्ताने खुले आम चालू  असून, मंत्रालय ह्वाया कोल्हापूर असा हा यांचा अवैध व्यवसायाचं प्रवास आहे. 


दसपटी Chiplun Corruption, या सर्वावर रोख लागण्यासाठी, आम्ही दसपटकरस्किल्ड मोअर फाउंडेशन सध्या जोमाने कार्यरत असून, पर्यावरण व जंगल सुरक्षित करणेसाठी विवीध मार्गाने कार्य करीत आहे. याकरीता स्थानिक रहिवाश्यांच देखील सहकार्य लाभने गरजेचं आहे.  जे आधिकारी भ्रष्ट आहेत, त्यांचेवर    युगांधराची नजर असून,  अवैध जंगलतोडीवर वन खात्याने गांभीर्याने नाही घेतले, तर डिजीयुगांधराचे वतीने वनखात्याचे या  भ्रष्ट कारभाराचा    पर्दाफाश केला जाईल.  अशी चेतावनी युगांधराचे मुख्य संपादक व स्किल्ड मोअर प्रतिष्ठान, दसपटी विभागाचे अध्यक्ष श्री. संतोषराव शिंदे यांनी दिली असून, ते पुढे म्हणाले की दसपटी म्हणजे आमच्या महान, पराक्रमी पुर्वजाच्या पराक्रमाने पावन झालेली भूमी आहे, भगवान परशुरामांची ही भुमी

आहे. तिला कलंकीत करणा-या त्या प्रत्येक भ्रष्ट निशाचरांवर लगाम घातला जाऊन,   येथीँल पावित्र्य व पर्यावरण राखण्यासाठी अभियान छेडलं असून, सर्व प्रशासकीय कर्मचारी व आधिका-यांनी आत्मचिंतन करून आपल्या कार्यप्रणालीत सुधारणा करावी, अन्यथा "आम्ही दसपटकर" वतीने नाकाबंदी करून अवैध जंगल तोडून होणारी वहातुक नाक्यानाक्यांवर अडवली जाऊन, संबंधीत वहाने संस्थेचे वतीने जप्त करुन, न्यायालयीन खटले चालवले जातील. त्याचप्रमाणे वनखाते, स्थानिक पोलीस प्रशासन व महसूल यांचे संबधीत आधिक-यांना जबाबदार धरून, त्यांचे विरोधात देखील अवैध जंगलतोड प्रकरणात न्यायालयीन चौकशी लावण्या संबंधित, ग्रुहमंत्रालय व वनमंत्रालय यांचे कडे संतोषराव शिंदे यांनी निवदन दिलं असल्याचे DgYugandhara च्या चौकशीमधून कळते. तेव्हा संबधित प्रशासकीय आधिका-यानी आपल्या कर्तव्यात कसूर न करता अवैध जंगलतोड प्रकरण आधिक-यांनी गांभीर्याने घ्यावे, असे देखील त्यांनी सुचित केले. DgYugandhara प्रकाशीत Chiplun Corruption. Corruption in rural..








 

 

 

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

If you have any query, please let me know.

एक टिप्पणी भेजें (0)