"मेरी माटी मेरा देश" दहिसर रेल्वे स्टेशन, श्री. सुहासजी आडिवरेकर, श्री. सुभाष शिंदे, श्री. हनुमंतजी सावंत |
डिजीयुगंधरा, DgYugandhara प्रतिनिधीः आपल्या मातृभूमीचे उपकार आपण कधीच फेडू शकत नाही; परंतु भारत सरकारने "मेरी माटी मेरा देश" हे अभियान राबवून आपल्या देशाच्या मातीला व वीरांना वंदन करण्याची सुवर्णसंधी सर्व देशवासीयांना उपलब्ध करून दिली.
देशाचे पंतप्रधान आदरणीय श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून साकार झालेले "मेरी माटी मेरा देश" हे अभियान संपूर्ण देशभरात सुरू आहे. या अभियाना अंतर्गत संपूर्ण देशभरातून मातीचे पूजन करून भारतमातेला गौरवण्ययत येत आहे.
"मेरी माटी मेरा देश" जोगेश्वरी पुर्व, श्री. सुहासजी आडिवरेकर, सौ. प्रिया लाड, श्री. राजेद्रजी कुरतडकर. |
भारतीय जनता पार्टी, मुंबईने देखील या उपक्रमात सहभाग घेऊन ठीक ठिकाणी अभियान राबवले. भाजपा कोकण विकास आघाडी मुंबई अध्यक्ष श्री. सुहासजी आडिवरेकर यांचे नेतृत्वाखाली दहिसर पूर्व, जोगेश्वरी पूर्व, चिंचपोकळी रेल्वे स्थानक येथे हे अभियान यशस्वीपणे राबविले गेले. श्री. सुभाष रमाकांत शिदे (लांजा संपर्क प्रमुख) , सौ. प्रिया परब लाड (कोविआ सचिव) सौ. श्रावणी पारकर, श्री. राजेंद्र कुरतडकर या कोकण विकास आघाडीच्या पदाधिकारी व त्यांच्या सहकाऱ्यांनी या कार्यक्रमाचे उत्तम अयोजन केले व हजारो मुंबईकर नागरिकांनी या कार्यक्रामाला आपली उपस्थिती दाखवून कोकण विकास आघाडीच्या कार्यकर्ते व अयोजकांसोबत सेल्फी काढून आभार मानले. यावेळी कोकण विकास आघाडी मुंबई अध्यक्ष श्री. सुहासजी आडिवरेकर यांचे योगदान व मार्गदर्शन या मुळे कार्यक्रम अधिक उत्स्फुर्त बनला, असे अयोजक कार्यकर्त्यांनी युगांंधराचे मुख्य संपादक श्री. संतोषराव शिंदे यांचेशी बोलताना सांगितले. त्याचप्रमाणे बीजेपी मुंबई आध्यक्ष, अँड श्री. आशिशजी शेलार व कोकण विकास आघाडी, मुंबई अध्यक्ष यांचे देखील अयोजकांनी कौतुक केले. सरचिटणीस हनुमंतजी सावंत, जोगेश्वरी विधानसभा अध्यक्ष आनंतजी परब यांची देखील उपस्थिती मोलाची ठरली, असे कोकण विकास आघाडी, लांजा संपर्क प्रमुख श्री. सुभाष शिंदे यांनी युगांंधराशी बोलताना सांगितले.
डिजीयुगंधरा, DgYugandhara ला मिळालेल्या माहीतीनुसार कोकण विकास आघाडी, मुंबईत तसेच मुंबईत राहणा-या चाकरमान्यांचे गावोगावी आपल्या कार्याचा वेग वाढवत असून, सामाजिक कार्याअन्वये, अडचणीच्या काळात वेगवेगळ्या मदतकार्याने, कोकणाण आपला वेगळा ठसा उमटवला आहे. आणि आता देशवासियांंनकरीता मोदी सरकार राबवित असलेल्या विविध योजनांद्वारे शहर तसेच ग्रामीण जनतेपर्यंत लाभ पोचविण्याचे कार्य कोकण विकास आघाडी वतीने, श्री. आशीशजी शेलार यांचे अध्ययक्षते खाली सुरू केल्याचे, कोकण विकास आघाडी, मुंबई अध्यक्ष श्री. सुहासजी आडिवरेकर यांनी युगांधराचे मुख्य संपादक व कोविआ अध्यक्ष, चिपळुण श्री. संतोषराव शिंदे यांचे सोबत बोलताना सांगितले.. त्यांच्या या कार्याला डिजीयुगंधरा DgYugandhara द्वारा शुभेच्छा..!
If you have any query, please let me know.