चिपळूणच्या सर्वांगीन विकासाकरीता दसपटी तयार, सबका साथ..! सबका विकास..! सबका विश्वास..! Agro Tourism साठी सज्ज , आम्ही दसपटकर भाग - ३

डिजीयुगंधरा (DgYugandhara)
0


पशुसंवर्धन आधिका-यांंसोबत दसपटीत अँग्रो टुरीजमच्या नियोजन बैठकिचे क्षण.


DgYugandhara प्रतिनीधी: Agro Tourism साठी सज्ज.. आम्ही दसपटकर. मानवी जीवन म्हणजे मुलाच्या भ्रूण अवस्थेपासून मृत्यूपर्यंतच्या विकासाचा प्रवास.   मानवी जीवन जन्मापासून सुरू होत नाही, तर गर्भधारणेच्या काळापासून जीवन सुरू होते. अशा प्रकारे, मनुष्याचा जन्म हा मानवी विकासाच्या ओघात होणारा बदल आहे. विकास हा
प्रक्रुतीच्या परीवर्तनाचा नियम आहे. पर्यावरण हा त्याचा आधार आहे, पृथ्वीवरील सार्‍या सजीव सृष्टीचा आधार हे येथील पर्यावरण आहे. पृथ्वी सोडून इतर कोणत्याही ग्रहावर व विश्वात इतरत्र असे पर्यावरण नाही. त्यामुळे येथील पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन करणे मानव जातीस नव्हे तर सर्व सजीव सृष्टीस अत्यावश्यक आहे. कोट्यावधी वर्षांच्या स्थित्यंतरानंतर येथील हवा, पाणी व जमीन यांचे असे पोषक वातावरण झाले  आणि मानवाची उत्पत्ती झाली. ती याच पर्यावरणाच्या आधारावर..

आज आपण सारे अश्या पर्यावरण सद्रुष्य भागातून येतो, की जिथे निसर्गाची अप्रतिम कलाक्रुती याच मानवी मनाला भुरळ घालते. कारण साक्षात प्रक्रुतीने फुरसतीने केलेली ही निसर्गाची कलाक्रुती म्हणजे आभासी दुनियेतल्या स्वर्गाचे सफर..!

असा हा आपला विभाग, दसपटी.. कुंभार्ली ते दाभोळ अश्या ११७ गावात विभागलेला आपला हा दसपटी विभाग, म्हणजे निसर्गाने केलेली मुक्त हस्त उधळण. सागर किनारे, ऐतिहासिक बंदरे, किल्ले, लेणी, ऐतिहासिक ठिकाणे, गरम पाण्याची कुंडे, धबधबे, मंदिरे, जत्रा, उत्सव, विविध जाती-प्रजातींचे पशु, पक्षी, वैविधतेने नटलेला हिरवागार निसर्ग, विशाल सह्याद्रीच्या पर्वत रांगा आपल्या या विभागात येतात, ज्याला ऐतिहासिक आणि पौराणिक वारसा लाभलेला असताना, आपली अवस्था मात्र कस्तुरीमृगासारखी व्हावी त्याला कारण म्हणजे, राजाने निद्रिस्त असावे, महाली पाळलेल्या मर्कटाने त्याचेच तलवारीने धाक दाखवून राज्य उपभोगण्याची चेष्टा करावी, आणि राजाला जाग यावी तेव्हा, घ्राणेद्रियाचा (नासिका, नाक) घात व्हावा. श्वासंद्रीय बंद पडाव आणि मर्कटाने राज्य कराव, अशीच काहीशी अवस्था दसपटी विभागाची गेल्या तीस वर्षांत करवली आणि भुमिपुत्रानी ती सहन केली. परंतु एकाद्या घातपाती स्वप्नातून जाग यावी आणि डोळे उघडल्यावर ते स्वप्नच होत याची जानीव होऊन, क्षणात त्या निद्रिस्त अवस्थेचा त्याग करून, मडगळ झटकून  ते स्वप्नच असल्याच्या विश्वासाने, हकिगतेत याव, सत्य जानाव..सत्य हे की, आपणच आपल्या जिवनाचे, भविष्याचे शिल्पकार होत. त्या भविष्याला जोडण्यासाठी दसपटीच्या आणि उपविभागाचा सर्वांगीण विकास दडला आहे, तेथील सामाजिक, औद्योगिक आणि राजकीय व्यवस्थेत.


त्याच उदिष्टाने झपाटून दसपटीतील काही उद्योजक, व्यावसायिक, उच्चशिक्षित, विद्याविभूषित यांनी ठाणे येथे संघटीत होऊन, दसपटीच्या सर्वागीण विकासासाठी प्रयोजन केले व त्या श्रीगणेशाची सुरवात चिपळुणातून झाली आणि त्याला जोड मिळाली पशुसंवर्धन विभाग व क्रुषी खात्याची.


आजवर चिपळूणमध्ये आयारामांच्या गर्दित, दुरद्रुष्टी नेत्रुत्वच नसल्याने, अनेक गोष्टींचा कोणालाच  थांगपत्ता न्हवता. परंतु सध्या सर्वांगीण विकासाची चर्चा भुमिपत्रांंमध्ये सुरू असून, अँग्रो टुरिजम Agro Tourism .. क्रुषी पर्यटन..या करीता संधी उपलब्पध करण्याच्या द्रुष्टीने, उपलब्ध असलेल्या नैसर्गिक घटकांच्या मदतीने  आपल्या जवळच्या ठेव्याची जाण करून घेत, ती दुस-याला सांगण्यात आपण यशस्वी झालो, तर आपला दसपटी विभाग, हे जागतीक पर्यटनस्थळ बनेल यात तिळमात्र शंका नाही.


कोकंण कॅलिफोर्निया करू अशा घोषणा अनेक नेते अनेक वर्षे करत परंतु रासायनिक कारखान्यांना उत्तेजन देत, ते करत असलेल्या पर्यावरण विरुद्ध हरकती मुळे  दसपटी विभाग, भकास करण्यावर भर देण्यापेक्षा, दसपटीचे शाश्वत स्वरुप जपणे त्याला प्राधान्य देणे, दसपटीच्या या विकासातून समस्त कोकणप्रांताची ओळख जगभर पसरविणे हाच खरा कोकण पर्यटनाचा मुख्य कणा आहे.


श्री. संतोषराव पां. शिंदे

तो जपण्या करीता दसपटीतील सर्व जाती जमातीचे भूमिपुत्राना एकसंघ करून "दृष्टी " - SKILLED MORE FOUNDATION वतीने, अखिल भारतीय मराठा महासंघसहकार उद्योग संस्था, क्रुषी व पशुसंवर्धन विभाग, भारत सरकार  यांचे मार्गदर्शन दसपटी, चिपळुण तालुक्यातील तरुणां करीता व्यवसाय शिबीर घेण्यात येत आहे. सहकार उद्योग, पर्यटन, क्रुषी इ. क्षेत्रात तरूणांना व्यवसाय उभा करूण देण्यासाठी दसपटीचे सुपूत्र श्री. संतोषराव पां. शिंदे, दसपटी यांनी पुढाकार घेतला असून, दसपटी व उपविभागातील तरुणांसाठी व्यवसाया करीता विवीध उपक्रम राबविण्यात येत आहेत, या उपक्रमाना दसपटी व उपविभागातून सर्व जाती वर्गातून तरूणांचा चांगला प्रतिसाद लाभत असून, भविष्यात या तरूणांंना उद्योग क्षेत्रात उभ करण्याचा आमचा मानस असून, त्याअनुशंगाने दसपटी विभाग व उपविभागात श्री. संतोषराव पां. शिंदे, दसपटी यांचे नेत्रुत्व व मार्गदर्शनाखाली अनेक दसपटकर भुमीपुत्र एकसंघ होऊन, संघटनात्मक बांधनी करीत आहेत अशी माहीती श्री. शिंदे यांचे मुंबई कार्यालयातून मिळाली. त्याचप्रमाणे मुंबई, ठाणे, डोंबिवली व त्यापुढील शहरातून देखील, तरुणांचा वाढता प्रतिसाद मिळत असून. चिपळूण मध्येच, तरुणांंचे व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र उभारण्याची तयारी दसपटकरांनी, " "दृष्टी " - स्किल्ड मोअर फाउंडेशन" च्या माध्यमातून सुरू केली असून, Agro Tourism साठी दसपटकर सज्ज झाले आहेत. गेले तीस वर्षे आमचे विभागातील तरूण, या आयारामांच्या बडबोल्या भुलभुलैयाला बळी पडत होता. या तरूणांना एकतर देवाच्या वर्गण्या, चिरीमिरी काँट्रॅक्ट, नाहितर सोमरसातील बंद बाटलीत बंदिस्त करून स्वतःसाठी दसपटीची भुमी काही आमच्याच चंग तथाकथीत, दिशाहीन पुढा-यांच्या मदतीने राजकिय व्यासपीठ करून घेत, हे आयाराम आजवर निश्चिंत होते. परंतु आता दसपटीची ही जमिन केवळ भुमिपुत्रांंना ताठ माणेने उभं करण्यासाठी आपण साफ करत असून, नव्याने पेरणी करत आहोत, असे "स्किल्ड मोअर फाउंडेशन दसपटी", अध्यक्ष श्री. संतोषराव शिंदे यानी सांगितले असून, दसपटी व दसपटी उपविभागातील सर्व तरुण, तरुणी संघटीत होऊन सामाजिक, औद्योगिक व राजकीय परिवर्तन घडवू असे आव्हान देखील त्यांनी दसपटी विभागाला केले.


 .

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

If you have any query, please let me know.

एक टिप्पणी भेजें (0)