सावधान.. सावधान.. चिपळूण..! भुरट्या रिअल इस्टेट एजंट पासून सावधान. चिपळुणात Land Fraud चा उद्योग जोरात..

डिजीयुगंधरा (DgYugandhara)
0

 


DgYugandhara प्रस्त्तू्त्त, (Land Fraud).. चिपळुण तालुक्यातील सर्व नागरीकांना सतर्क केले जात आहे की, सध्या चिपळुण ग्रामीण भागात दसपटीतील नांदिवसे, स्वयंदेव, राधानगर, आकले, कादवड, तिवरे, अडरे इ. व शेजारील पंचक्रुशीत, काही फ्राँड रिअल इस्टेट एजंटचा ( Without *RERA* Regi.) सुळसुळाट चालू आहे. अश्या एजंट कर्वें स्थानिक नागरीक,  मुळ जमिनदार व त्यांची कुळ, यांची दिशाभूल होत असल्याचे समजते. बनावट कागदपत्र बनवून जमिनींचे खरेदीविक्री चे बनावट व्यवहार केले जात असून, जमिन खरेदी दारांकडून  खोटे बोलून, पैसे उकळले जात असल्याचे समजत आहे.  दसपटीतील   सर्व जमिनी या ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या असून त्या सामाईक मालकीच्या आहेत आणि दसटीतील अश्या सामाईक जमिनींचे व्यावसायिक प्रकरण करण्यास सर्वच दसपटकर मुळ मालक राजी नसल्याचे देखील कळते, त्यामुळे अश्या सर्व जमिनीं व जंगल विक्रीवर पंचक्रुशीत संभ्रम आहे. त्याचबरोबर कुळांच्या नावावर असलेल्या जमिनी व जंगल, हे संबंधीत कुळांना विकण्याचा कारदेशीर आधिकार नसल्याने, त्या संबंधीतील   कोणतीही मुखत्यारपत्रे ही, त्या जमिनी व जंगल विक्री करीता कायदेशीर नसल्याने, त्याची संबधीतानी शहानिशा करावी. व ज्या मध्यस्थी करवे हे व्यवहार केले जात आहेत, ते मध्यस्थी RERA चे अधिक्रुत आहेत, याची देखील खात्री खरेदी विक्री करणा-या संबंधीतानी   करावी.   त्याच बऱोबर चिपळुणातील हे भुरटे दलाल, जमिनदारांची देखील मोठ्या प्रमाणात फसवणुक करीत असल्याचे कळते. जमिनी भावाच्या १००% ते १५०% पर्यंत हे एजंट एकरी खाचा काढत आहेत, म्हणजे जमिनीच्या किमतीच्या दुप्पट-तिप्पट कमिशन खरेदीदाराकडुन घेत आहेत.. यात मुळ जमिनदाराला कोडीमोलाचा भाव मिळत असून या सर्व जमीनी या वडीलोपार्जीत सामाईक असून त्या सहहिस्सेदाराच्या नाहरकत, संमती पत्रकाशिवाय विकणे, म्हणजे बेकायदेशीर व फसवणूकीचा व्यवहार केल्यासारखे आहे. यावर स़ंबंधितावर फौजदारी गुन्हा दाखल होऊ शकतो.. याची देखील असे व्यवहार करणा-यांनी काळजी घ्यावी व अश्या भुरट्या एजंट, दलालांपासून, फसवणुकदारांपासून सावध रहावे. कारण हा एक मोठा Land Fraud आहे, तुमची फसवणूक आहे.


सध्या स्थितीत मौजे नांदिवसे, स्वयंदेव, राधानगर इ. व दसपटी पंचक्रुशीत कोणत्याही सामाईक मालकीतील अधिदक्रुत कुळांच्या व त्यांच्या मुळ मालकांच्या ना हरकत पत्रा शिवाय, जमिनी व जंगल विकण्यास संपूर्ण रोक असून, असे आढळल्यास ते बेकायदेशीर व फसवणूक समजून संबंधीतांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, याची   नोंद घ्यावी. व नागरीकानी क्रुपया हा मेसेज जास्तीत जास्त फाँरवर्ड करावा, की रिअल इस्टेट च्या नावावर ठगां द्वारा होणारी जनतेची फसवणूक थांबण्यास आपलं योगदान मिळेल. हा Land Fraud थांबविण्यास सहकार्य लाभेल,धन्यवाद..! अधिक माहिती करीता DgYugandhara डिजीयुगंधरा संपर्क करा आणि तुमची फसवणूक टाळा..

 

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

If you have any query, please let me know.

एक टिप्पणी भेजें (0)