दसपटी व उपविभागातील मराठा समाज आणि बहुजन समाजासठी उद्योग मार्गदर्शन शिबीराच, आम्ही दसपटकर पुरस्क्रुत, स्किल्ड मोअर प्रतिष्ठान व अखिल भारतीय मराठा महासंघ यांचे संयुक्त विद्यमानाने चिपळुण शहरात अयोजन, विषय : Small Business Schemes

डिजीयुगंधरा (DgYugandhara)
0


 DgYugandhara प्रतिनिधीः द्रुष्टी - स्किल्ड मोअर फाउंडेशन वतीने Small Business Schemes वर चर्चा. गेले तीस ते पसतीस वर्षे, पक्षीय स्वार्थकारणामुळे विकासापासून वंचित राहिलेला दसपटी विभाग, म्हणजे आजचा चिपळूण तालूका होय. मराठा, कुणबी तसेच इतर ओबीसी समाज गेले पाचशे वर्षेहुन अधिक काळ एकत्र राहत असून, इथला मुळ भुमिपुत्र म्हणून त्यांची ओळख असताना देखील ते गुमनाम राहिले आणि त्यामुळेच हा विभाग विकासाच्या द्रुष्टीने आजवर मागासलेलाच राहीला. त्याला मुळ कारण   येथील राजकीय परिस्थिती कारणीभूत होती, आयारामांची गर्दी कारणीभुत होती. पोटापाण्यासाठी बाहेरील तालुक्यातून आलेले   हेच गरजू आयाराम पुढे  लोकप्रतिनिधी बनले, कोणी आमची जंगले चोरी करून पोटं भरली, कोणी पाठबंधारे, नाले, रस्ते इ. वाळू, माती खाऊन पोटं भरली, तर कोण तथाकथीत शिक्षण सम्राट बनून पोट भरत आहेत. ज्यांच्या कडे कधीही भुमिपुत्रांच्या   विकासाचं स्वप्न न्हवतं,  ध्यास नव्हता.  ध्येय होत फक्त दसपटीची भुमी स्वतःच्या राजकिय स्वार्थाकरीता वापरायची, स्वतःचे जुमले बनवायचे आणि भुमीपुत्राला गाजर द्यायच. हि राजकीय गणित जुळविण्यासाठी पक्षीय सुत्रांचा वापर करायचा आणि  भोळ्याभाबड्या लोकांना चंग पैशांच, त्यांच्या गरजांपुरत अमिश दाखवून त्यांचा आवाज दाबून  आपली राजकीय व व्यावसायिक पोळी भाजून घ्यायघी व आज देखील तीच परिस्थिती चिपळूणात आहे..! 

हिच परिस्थिती बदलण्याच्या उद्देशाने, भुमिपुत्राला त्यांचा आधिकार व  सन्मान परत मिळवून देण्यासाठी, त्यांच्या भुमीवर त्यांच वर्तमान व भविष्य स्थिर करण्याचा ध्येय व ध्यास घेतलेंलं उच्चशिक्षित व दुरद्रुष्टी व्यक्तीत्व असलेलं, दसपटीतील नेत्रुत्व कार्यशील झालं असून, दसपटीतील प्रत्येक समाजाच्या तरूण, जेष्ठ, अबला, बालक यांना त्यांचा न्याय, हक्क मिळवून देण्यासाठी सज्ज झालं आहे, पक्षीय निष्ठेपलीकडे जाऊन ही वाटचाल, दसपटीला पुनः स्वद्रुढ, स्वयंभू बनवेल. त्यासाठी दसपटीच्या विकासाची 'बल्यु प्रिंट' तयार झाली असून, दसपटीतील प्रत्येक होतकरू तरूण त्याचा हक्कदार आहे. यासाठी Small Business Schemes चा भुमीपुत्रांना उभ करण्यासाठी आमच्या संस्थेच्या वतीने प्रयत्न केला जाईल.


श्री. संतोषराव शिंदे, दसपटी

दसपटीचे सुपुत्र श्री. संतोषराव शिंदे, यांचे नेत्रुत्वाखाली दसपटीतील सामाजिक, औद्योगिक व राजकीय परिवर्तनाची ही हाक, चिपळूण तसेच जिथे जिथे दसपटकर राहत आहेत, तेथील विभागात कार्यान्वीत होणार असून, भुमीपुत्रांच्या पुनर्वसनाची ही हाक, भुमीपुत्रांचा साथ देऊन श्री. संतोषराव शिंदे, दसपटी यांचे नेत्रुत्वाखाली कार्यान्वीत होत आहे. त्याचीच सुरुवात म्हणजे..


अण्णासाहेब पाटील महामंडळ योजना अंतर्गत व्यवसायिकांसाठी व्याज परतावा कर्ज योजना राबविण्यात येत असून, मराठा तसेच इतर समाजातील उद्योजकांसाठी, अखिल भारतीय मराठा महासंघ "आम्ही दसपटकर" पुरस्क्रुत    "स्किल्ड मोअर प्रतिष्ठान"  यांचे संयुक्त विद्यमानाने चिपळुण मध्ये व्यवसाय मार्गदर्शन मेळावा घेण्यात येत आहे. ज्यामध्ये तरूण व नवीन व्यावसायीकांना विवीध योजनांचे मार्गदर्शन केले जाईल.


व्यवसायासाठी घेतलेल्या कर्जावरील १२% पर्यंतच्या व्याजाचा परतावा "अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास"  महामंडळाकडून केला जातो. त्याची व्याज परतावा  मुदत ५ वर्षे असून, कर्ज रक्कम : १५ लाखपर्यंत मर्यादीत आहे.


 त्यासाठी पात्रता खलील प्रमाणे असावी.

१) लाभार्थी मराठा असावा. २५%  इतरांसाठी

२) वयोमर्यादा : १८ ते ५० वर्षे

३) उत्पन्न मर्यादा : ८ लाखच्या आतील .


     पशुसंवर्धन,   क्रुषी पर्यटन,  सहकार उद्योग, अश्या विवीध व्यवसाय करण्याची इच्छा असलेल्या दसपटी, चिपळूण विभागातील सर्व तरुण, तरुणी तसेच प्रौढ यांच्याकरीता विवीध उद्योगांविषयी तसेच अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ अंतर्गत देण्यात येणाऱ्या व्याज परतावा योजनेविषयी, खादी ग्राम उद्योग, सहकार उद्योग विषयी सविस्तर माहिती देण्यात येणार असून, उपस्थित राहणाऱ्या उद्योजकांचा एकमेकांचा परिचय व एकमेकांचा व्यवसाय वाढी विषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. 


या कर्ज वितरण योजनेअंतर्गत कोणत्याही मराठा उद्योजकांना यासंबंधी माहिती हवी असल्यास,  बीजेपी कार्यालय, पंचायत समिती जवळ, चिपळूण   येथे संपर्क करावा अथवा या पोर्टल द्वारा व्यवसायासाठी आपली नोंद करावी. नोंद झालेल्या उमेद्वारास मंडळाचे Int. Form दिला जाईल व मोफत मार्गदर्शन शिबीरा करीता नोंदनी केली जाऊन, आमचे कडे उपलब्ध असलेल्या बँक द्वारा गरजूंच्या योग्यते व आवश्यकते प्रमाणे बँक सहकार्य दिले जाईल. त्यामुळे चिपळण तालुक्यात Small Business Schemes च्या मदतीने विवीध क्षेत्रातील उद्योगांना चालना मिळेल


हि माहिती आपल्या दसपटी, चिपळूण तालुक्यातील ओळखीच्या जास्तीत जास्त उद्योजकांपर्यंत पोहोचवावी. त्याच प्रमाणे अश्या वेगवेगळ्या योजना व माहीती करीता डिजीयुगंधरा, DgYugandhara ला फाँलो करा. आणि तुुुमची नोंद इथे Contact us वर Click करून करा.

 


 

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

If you have any query, please let me know.

एक टिप्पणी भेजें (0)