नांदिवसे चिपळुण तलाठी, आश्विन नंदगवळीला लाच घेताना रंगेहात पकडले. Anti Corruption Bureau raid in Chiplun, Nandivase Talathi Arrested.. DgYugandhara ने केला परदा फाश..

डिजीयुगंधरा (DgYugandhara)
0
 
डिजी युगांधरा, Dgyugandhara प्रतिनीधी चिपळुण (Anti Corruption Bureau raid in Chiplun Nandivase Talathi Arrested):    लाचलुचपत प्रतिबनध विभाग द्वारा, आरोपी तलाठी अश्विन नंदगवळी, वय 33 वर्षे, हा नांदिवसे या ठिकाणी कार्यरत होता आणि पिंपळी खुर्द चा अतिरिक्त पदभार  त्याचे कडे होता.  त्याला गुरवार दिनांक, २२ जुन २०२३ रोजी ४५ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंध विभाग पथकाने  रंगे हात पकडले असून दिनांक १ जुन २०२३ रोजी त्याने तक्रारदाराकडे ४५ हजार रुपयाची मागणी केली असल्याचे कळते. आरोपी लोकसेवक तलाठी आश्वीन नंदगवळी यांने   तक्रारदार व त्यांचे सहहिस्सेदार यांच्या नावे असलेल्या बिनशेती जमिनीचे दोन समान हिस्से करून उप विभागीय अधिकारी कार्यालय, चिपळूण यांच्याकडून बिनशेती जमिन विभाजनाचे आदेश प्राप्त करून घेण्याकरिता उप विभागीय अधिकारी कार्यालय, चिपळूण येथील कर्मचारी यांच्यासाठी रु. ४० हजार  व वेगळा सातबारा देण्याकरिता मंडळ अधिकारी संदेश आयरे याच्यासाठी रु. पाच हजार असे एकूण रु. ४५ हजार लाच रक्कमेची मागणी केल्याचे पडताळणी दरम्यान निष्पन्न झाले आहे. त्या अनुषंगाने, आज गुरवार दि. २२ जुन २०२३ रोजी लाचलुचपत प्रतिबंध विभाग पथका द्वारे  सापळा रचून,  कारवाई दरम्यान आरोपी  लोकसेवक तलाठी अश्विन नंदगवळी याला रु. ४५ हजार रुपयांची  लाच रक्कम स्वीकारल्यानंतर तलाठी कार्यालय, पिंपळी खुर्द येथे पंचांसमक्ष रंगेहाथ पकडण्यात आले. या कारवाईत लाचलूचपत प्रतिबंध विभाग रत्नागिरी सापळा पथक पीआय. श्री.प्रविण ताटे, श्री. संतोष कोळेकर, श्री. हेमंत पवार, श्री. राजेश गावकर, श्री. प्रशांत कांबळे ( चालक) यांनी अंजाम दिला असून पुढील कारवाई करीता त्यास अटक करण्यात आले आहे. 


         Dgyugandhara ने यासंबंधात अधिक चौकशी केली असता तलाठी नंदगवळी व सर्कल संदेश आयरे यांचे द्वारा त्यांचे अखत्यारीत असलेल्या नांदिवसे, पिंपळी खुर्द इ. गावातून विवीध दाखले, सातबारा इ. छोट्या कामांसाठी देखील ग्रामस्थांकडून सर्रास पैस्यांची मागणी केली जात असे परंतु आपले काम बिनाविलंब व्हावे याकरीता काही ग्रामस्थ पैसे देऊन काम करून घेत असत. त्याचप्रमाणे विभागातील जंगल माफीया, वाळू माफिया अश्या महसूल खात्याशी संबंधित असलेल्या अवैध प्रकरणाशी देखील यांचे लागे बंधे असल्याचे आता उघड होत आहे. कारण येथील अवैध जंगलतोड, नदीतील अवैध वाळू उत्खनन या संदर्भात स्थानिक नागरीकांनी   संबंधीतांना लेखी तक्रार दिल्या होत्या, तसेच दसपटी पुर्व विभागातील जाग्रुक नागरीकांच्या वतीने डिजी युगांधरा कडे देण्यात आलेल्या निवेदनवरून, डिजी युगाधराचे संस्थापक, संपादक व कोकण विकास . अध्यक्ष श्री.  संतोषराव शिंदे यांनी देखील तलाठी नंदगवळी व सर्कल यांना संबधीत प्रकरणा विषयी समज दिली होती व तहसीलदार चिपळुण यांना देखील कळविले होते, त्याप्रमाणे मा. तहसिलदार चिपळुण यांनी देखील या दोघांना त्यांचे कार्यालयात बोलावून चौकशी करून समज दिली होती परंतु या भ्रष्ट आधिका-यांनी वेळोवळी आपल्या आधिकारांचा गैरवापर केला असल्याने, या विभागात अश्याप्रकारच्या अनेक अवैध प्रकरणाना यांचे वरद हस्तानेच अंजाम दिला गेला असल्याचे आता या कारवाई वरून सिद्ध होत आहे.

   

         चिपळुण तालुक्यात  सध्या बेकायदेशीर पणे बेदखल कुळाना कागदोपत्री कायदेशीर मालकी दाखवून   त्या जमिनींची बेदखल कुळांद्वारे बेकायदेशीर विक्री , अवैध जंगलतोड, अवैध वाळू उत्खनन अश्या अनेक बेकायदेशीर घटनां भ्रष्ट प्रशासकीय आधिकारी, व बाबू यांचे वरदहस्ताने राजरोस चालू असताना, ही मोठी कारवाई चिपळूण तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे वतीने केल्यामुळे, अश्या अनेक भ्रष्ट आधिक-यांचे धाबे दनानले आहेत. 


     चिपळूणातील सामान्य जनतेला जर अश्या प्रकारे वेठीस धरून, बेकायदेशीरपणे जर आधिकारी काम करणार असतील, तर पुढील काही दिवसांत चिपळुण तालुक्यातील अश्या अनेक भ्रष्ट आधिकारी व त्यांचे सहकारी यांचे वर आमचे प्रतीनिधी देखील लक्ष ठेवत  असून, अश्या कारवाया होत राहतील, अशी माहीती डिजी युगांधरा चे  संपादक व कोविअ अध्यक्ष श्री. संतोषराव शिंदे यांनी दिली आणि चिपळुणातील अश्या  आधिका-यांनी व त्यांचे सहका-यानी त्यांच्या कामकाजात सुधारणा करुन जनतेला उत्तम, जलद व निशुल्क सेवा द्यावी अन्यथा पुढील ह़ोणा-या परीणामांसाठी सज्ज रहावे असा बख्खड इशारा देखील DgYugandhara च्या या बातमी द्वारे दिला आहे..

DgYugandhara Present, Anti Corruption Bureau raid in Chiplun Nandivase Talathi Nandavali Arrested..

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

If you have any query, please let me know.

एक टिप्पणी भेजें (0)