चिपळूण, दसपटी विभागात पाणीटंचाई, कोविअ, अध्यक्ष श्री. संतोषराव शिंदे यांचे प्रशासनाला निवेदन..

डिजीयुगंधरा (DgYugandhara)
0


कोविअ अध्यक्ष श्री. संतोषराव शिंदे समवेत जेष्ठ बीजेपी कार्यकर्ते श्री. पांडुरंगराव शिंदे तिवरेकर, विनोदजी सुर्वे,  मा. युवा चिपळूण तालुका अध्यक्ष श्री. अभिजीतराव शिंदे, सुशिलराव शिंदे, श्री संतैषराव शिंदे कादवडकर आणि रमेश अंबोले, गटविकास आधिकारी श्रीमती पाटील यांना निवेदन देताना.कोविअ अध्यक्ष श्री. संतोषराव शिंदे समवेत जेष्ठ बीजेपी कार्यकर्ते श्री. पांडुरंगराव शिंदे तिवरेकर, विनोदजी सुर्वे,  मा. युवा चिपळूण तालुका अध्यक्ष श्री. अभिजीतराव शिंदे, सुशिलराव शिंदे, श्री संतैषराव शिंदे कादवडकर आणि रमेश अंबोले, गटविकास आधिकारी श्रीमती पाटील यांना निवेदन देताना.

अति उष्म्यामुळे चिपळूण, दसपटी विभागात   पाणी टंचाई. पाणीटंचाई मुळे त्रस्त असलेल्या गांवात टँकर द्वारे पाणीपुरवठा होणे बाबत, कोविअ अध्यक्ष श्री. संतोषराव शिंदे यांचे द्वारा तहसीलदार, चिपळूण व गटविकास अधिकारी, चिपळूण यांना निवेदन.. टँकर अन्वये तातडीने पाणीपुरवठा.

दसपटी,   हा ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेला विभाग म्हणजे आजचा चिपळूण तालुका होय,  ज्यामध्ये १६६ गांवे व १३४ ग्रामपंचायत असून हा प्रदेश   सह्याद्रीच्या डोंगर द-यानी विभाजलेला आहे. हा प्रदेश निसर्गरम्य असलातरी सध्या अति उष्म्या मुळे येथील  परिस्थिती पाण्या आभावी चिंताजनक आहे. अतिव्रुष्टी काळात तात्कालीन लोकप्रतिनिधी व आधिकारी यांच्या भ्रष्ट कारभारामुळे तिवरे येथील धरण फुटुन जीवीत हानी देखील झाली होती. परंतु तदनंतर प्रशासनाच्या  व्यवस्थापन त्रुटी व  दुर्लक्षते मुळे या परिसरातील अनेक गावातील जनता पाणी टंचाई मुळे त्रस्त झाली असून, स्थानीक लोक प्रतिनीधींचे देखील दुर्लक्ष झालेले दिसते.


या संदर्भात कोविअ अध्यक्ष श्री. संतोषराव शिंदे यांनी माहीती घेऊन त्वरीत बीजेपी चे जेष्ठ कार्यकर्ते श्री. पांडुरंगराव शिंदे, तिवरेकर, श्री. विनोदजी सुर्वे, श्री अभिजित शिंदे, श्री. संतोष शिदे कादवडकर, श्री. सुशील शिंदे, श्री. राहुल अंबोले इ. समवेत चिपळूण चे नायब तहसीलदार शेजल, गटविकास आधिकारी श्रीमती पाटील, पाणीपुरवठा आधिकारी श्री. जाधव यांची भेट घेतली व   पाणी टंचाई असलेल्या गावांत ट्रँकर पाठविणे बाबत निवेदन दिले. येथील संबंधित आधिका-यां सोबत संवादा दरम्यान पाणीटंचाई संबंधात आधिका-यांनी गाभीर्यपुर्ण चर्चा केली असून, चिपळुणातील अनेक गावातील पाण्याची पातळी खोलवर गेल्याचे त्यानी सांगितले, त्यामुळे   यावर गांभीर्याने नियोजन होणे गरजेचं असून, ट्ँकर ने पाणीपुरवठा हा तात्पूरता पर्याय आहे आणि त्यासाठी स्थानीक पुढारी व ग्रामस्थ यांनी सहकार्य करणे गरजेचं आहे. अन्यथा ही पाणी टंचाई अधिक वाढु शकते. निसर्ग व पर्यावरणाचा समतोल राखून जमिनीत जोपर्यंत पाणी जिरवल जात नाही, तोपर्यं पाण्याची पातळी वाढू शकत नाही. त्याकरीता सगळ्यानी मिळूण सकरात्मक धोरण अवलंबणे ही कळाची गरज आहे. असे ही या चर्चे अंती निष्कर्षीत करण्यात आले. यावर कोविअ अध्यक्ष श्री. संतोषराव शिंदे यानी ही अश्वासीत केले की, दसपटी म्हणजे आजचा चिपळूण तालुका, ही आमच्या पुर्वजांची भुमी असून आज येथील भुमीपुत्र पिण्याच्या पाण्यासाठी देखील हतबल झालेला आहे, त्याचे कारण म्हणजे येथील आयारामांच्या (तालुक्या बाहेरून विवीध पक्षानी आणलेले स्वार्थी लोकप्रतीनिधीं) अधिन केली गेलेली राजकीय व्यवस्था कारणीभूत असून, तिला परीवर्तीत करणे ही आज काळाचीच गरज आहे. यावर आम्ही आमच्या भुमीपुत्रांसाठी योग्य ती दीशा ठरवुच परंतु पर्यावरण संबंधात " आम्ही दसपटकर"  सकारात्मक असून आपणास योग्य ते सहकार्य मी व माझ्या संघटनेंच्या वतीने निश्चित करू परंतु सध्या तातडीने पाणी टंचाई असलेल्या गावांमध्ये ट्रँकर ने पाणी पुरवठा व्हावा म्हणून संबंधित आधिका-याना निवेदन दिले असता, त्यांनी त्यावर तातडीने दखल घेऊन पाणी टंचाई भागात सध्या ट्रँकर ने पाणी पुरठा होत असून, तेथील ग्रामस्थाना पिण्याचे पाण्याची सोय केली गेली आहे. याकरीता श्री. संतोषराव शिंदे यांनी संबधीत आधिक-यांचे आभार मानले असुन, चिपळुण च्या विकासासाठी "आम्ही दसपटकर" सकरात्मक असून, त्याकरीता आधिक-यांना आमच्या कडून आम्ही योग्य ते सहकार्य करू असे देखील त्यांनी आश्वासीत केले.



एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

If you have any query, please let me know.

एक टिप्पणी भेजें (0)